Back
संजय राऊत पर टिप्पणी के बीच आनंद परांजपे की तीखी प्रतिक्रिया
SKShubham Koli
Oct 28, 2025 07:57:59
Thane, Maharashtra
आनंद परांजपे पॉइंटर
संयाज राऊत यांच्यावर टीका:
कुबड्या टाका: हिंदुत्वाचा आणि स्वाभिमानाचा विचार जिवंत असेल, तर संजय राऊतांनी (शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे) त्वरित काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्या 'कुबड्या' टाकून द्याव्यात.
बाळासाहेबांचे विचार: 'ज्या दिवशी माझी शिवसेना काँग्रेस होईल, त्या दिवशी दुकान बंद करेन,' हे बाळासाहेब ठाकरेंचे विचार राऊतांनी आठवावेत.
आत्मपरीक्षण करा: 'भांडुपच्या भोंग्यांनी' (राऊत) दुसऱ्यांना फुकटचे सल्ले देण्यापूर्वी शिवसेनाप्रमुखांचे हिंदुत्व आणि मराठी माणसाचा स्वाभिमान यावर आत्मचिंतन करावे.
रोहित पवार यांच्यावर टीका:
अति घाई: रोहित पवार हे 'नेतृत्व बनायची अती घाई' असलेले व्यक्तिमत्त्व आहे.
पक्षाकडे लक्ष द्या: त्यांनी दुसऱ्यांवर बोलण्याऐवजी स्वतःच्या पक्षाची पडझड आणि पक्षातून बाहेर चाललेली लोक यावर लक्ष द्यावे, ते हिताचे ठरेल.
ज्योतिषी आहे का? संग्राम जगताप हे अजित पवार यांचे नेतृत्व मानणारे आमदार आहेत. त्यांची काळजी रोहित पवारांनी करू नये; ते काय ज्योतिषी आहेत का?
समजूत: अजित पवार आणि तटकरे यांनी संग्राम जगताप यांना जी समज द्यायची होती, ती दिलेली आहे.
मतदार याद्या आणि बोगस मतदारांवर आरोप:
आदित्य ठाकरेंना प्रश्न: आदित्य ठाकरेंना वरळीत १९,००० बोगस मतं असल्याचं आता आठवलं, पण जेव्हा अरविंद सावंत दक्षिण मुंबईतून लोकसभेची निवडणूक लढले, तेव्हा ही १९,००० मतं बोगस आहेत हे आठवलं नाही का?
संभ्रम: लोकसभेच्या विजयानंतर मतदार याद्या योग्य वाटतात आणि विधानसभेतील दारुण पराभवानंतर त्यांत घोळ वाटतो, अशा प्रकारे विरोधी पक्षांकडून सातत्याने संभ्रम निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
On जितेंद्र आव्हाडांवर निशाणा
जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी-शरद पवार गट) कळवा-मुंब्रामध्ये दुबार नावांवर बोलत असतात, पण त्यांच्याच मतदारसंघात (विधानसभेत) १९,००० दुबार नावं आहेत.
मुंब्रा-कळवा आणि कल्याण ग्रामीणमध्ये १४,००० दुबार नावं आहेत. याबद्दल त्यांनी कधी आवाज उठवला नाही.
धक्कादायक आरोप: आव्हाड यांच्या मतदारसंघातही बोगस मतदारांचा सहभाग आहे, हे त्यांनी मान्य करावे.
साखर संस्था (VSI) चौकशी आणि मुख्यमंत्री:
चौकशी योग्य: মুখ्यमंत्र्यांनी शासनाकडून अनुदानाचा (Grant) योग्य वापर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये (VSI) होतो की नाही, याची चौकशी लावली आहे.
अधिकार: मुख्यमंत्र्यांनी चौकशी लावली यात काही गैर नाही; तो त्यांचा अधिकार आहे.
घाबरू नका: तक्रारी आल्या असतील म्हणूनच चौकशी लावली असेल. 'ज्याला कर नाही, त्याला डर कशाला?' जर काही गडबड नसेल, तर इन्स्टिट्यूटने चौकशीला सामोरे जावे.
जितेंद्र आव्हाड यांच्यावर (दुसऱ्यांदा) टीका:
नकलाकार: जितेंद्र आव्हाड हे 'नोटंकीकार' आहेत.
आधी स्वपक्ष पाहा: आव्हाड म्हणतात 'आमच्या पक्षाचे बारा वाजले', पण त्यांनी त्यांच्या शहरात त्यांच्या पक्षाचे बारा वाजले आहेत का, हे पाहावे.
जागरूक व्हा: त्यांचा जिल्हाध्यक्ष, युवक अध्यक्ष, आणि जळगावमधील नऊपैकी सात नगरसेवक सोडून जातात, मग आमच्या पक्षाचे बारा वाजले की तुमच्या शहरात तुमचे बारा वाजले हे नकलाकार जितेंद्र आव्हाड यांनी पाहावं.
खंबीर नेतृत्व: अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खंबीर उभी आहे.
लाडकी बहीण योजना: महायुती सरकारने आणलेली ही योजना निरंतर चालू राहील.
मोर्चा: लोकशाहीत सगळ्या पक्षांना मोर्चा काढण्याचा अधिकार आहे.
ठाण्यात युती: ठाण्यामध्ये युतीबाबतचे अधिकार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेले आहेत..
निवडणूक धोरण: महायुती म्हणून जिथे शक्य होईल तिकडे लढावं, ही मानसिकता आहे. काही ठिकाणी स्वतंत्रपणे लढत होऊ शकते, मात्र एकमेकांवर टीका करू नये या मूलमंत्रांनी निवडणुका लढल्या जातील.
जागावाटप: महापौर पदाचे आरक्षण आणि प्रभागाचे आरक्षण निघाल्यावर पालिका निवडणुकीसाठी योग्य निर्णय नेते घेतील.
3
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKShubham Koli
FollowOct 28, 2025 10:00:550
Report
GMGANESH MOHALE
FollowOct 28, 2025 09:57:220
Report
APAMOL PEDNEKAR
FollowOct 28, 2025 09:56:310
Report
GMGANESH MOHALE
FollowOct 28, 2025 09:31:270
Report
TTTUSHAR TAPASE
FollowOct 28, 2025 09:30:320
Report
TTTUSHAR TAPASE
FollowOct 28, 2025 08:49:541
Report
SNSWATI NAIK
FollowOct 28, 2025 08:49:272
Report
SMSATISH MOHITE
FollowOct 28, 2025 08:37:370
Report
KJKunal Jamdade
FollowOct 28, 2025 08:16:330
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 28, 2025 07:52:220
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowOct 28, 2025 07:51:080
Report
SNSWATI NAIK
FollowOct 28, 2025 07:35:370
Report
AKAMAR KANE
FollowOct 28, 2025 07:34:020
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowOct 28, 2025 07:31:270
Report
