Back
बारामती विमान हादसे: गहन जांच की मांग, VSR कंपनी के विरुद्ध कार्रवाई की तैयारी
JMJAVED MULANI
Feb 25, 2026 13:31:47
Baramati, Maharashtra
ऑन_रोहित पवार गुन्हा दाखल करणार*
सखोल चौकशी झाली पाहिजे.
रोहित दादा असतील किंवा जय असेल वहिनी पार्थ दादा किंवा मी असेल महाराष्ट्रात दादांवर प्रेम करणारी सर्व जनता आहे त्या सर्वांची इच्छा आहे सखोल चौकशी झाली पाहिजे.
लवकरात लवकर ही चौकशी व्हावी अशी जनतेची इच्छा आहे.
*ऑन_घातपात?*
चौकशी होऊ द्या
मुख्यमंत्र्यांनी ही चौकशी सीबीआय कडे दिली आहे.
डीजीसीएच ऑडिट कालच आलो आहे.
त्यामध्ये व्ही एस आर कंपनीचे लेयर जेट आहेत त्याच्या उड्डाणाला बंदी घातली आहे
माझा असं मत आहे त्यांच्या सर्वच विमानांच्या उड्डाणाला बंदी घातली पाहिजे
पूर्ण चौकशी व्हावी. सीआयडी चौकशी करत आहे पुरोहित पवारांनी देखील प्रायव्हेट एजन्सी नेमली आहे.
तयावेळी कळेल की नक्की घातपात झालाय की काय.
*ऑन_ब्लॅक बॉक्स*
परवा जायचं ट्विट तुम्ही पाहिले असेल.
ब्लॅक बॉक्स डिझाईनच त्या पद्धतीने केला जातो, त्या ब्लॅक बॉक्स ला काहीही होत नाही.
त्या ब्लॅक बॉक्सचं कामच डेटा रेकॉर्ड करून असतं.
एवढं सहजासहजी त्यात काय होत नसतं.
त्यात काय झालं असेल असं मला वाटत नाही.
जरी ब्लॅक बॉक्स ला काय झालं असेल तरी अमेरिकेत ज्या कंपन्या आहेत त्यांच्याकडे ती टेक्नॉलॉजी आहे की ब्लॅक बॉक्स मधील ती सर्व माहिती शोधून काढू शकतात.
मला विश्वास आहे किती संपूर्ण माहिती आपल्याला समजेल
*ऑन_घटनास्थळी आपण काय पाहिलं*
या घटनेला आता एक महिना होत आला आहे.
तरीपण मन मानायला तयार नाही असं काहीतरी झाल आहे.
एवढी भयानक घटना झाली आहे कोणाच्याच कुटुंबावर अशी वेळ येऊ नये अशी वेळ आमच्या कुटुंबावर आली आहे.
मी तेव्हा बारामतीत होतो. दुसऱ्या कार्यक्रमासाठी मी निघालोलो.
मला ८:५५ मिनिटांनी एक फोन आला अजित पवारांच्या विमानाचा अपघात झालाय.
या कंपनीची जी विमान आहेत त्याचे रिपोर्टेशन नेहमीच खराब होतं.
असंच एक विमान मुंबईमध्ये क्रॅश झालं होतं.
त्यामुळे मलाही वाटलं क्रॅश लँडिंग झालं असेल त्यामुळे मी लगेच पहिल्यांद्या बारामती एअरपोर्टवर पोहोचलो.
बारामती एअरपोर्टवर गेलो मला तिथे काहीच दिसलं नाही.
मि माझी गाडी रनवे वरती घेतली.
अकरा नंबर रनवे वरती मी पोहोचलो.
50 फूट खोल मला दादांचे विमान दिसलं.
त्यावेळी विमान जळून खाक झालं होतो.
विमानाची मागची बाजू फक्त दिसत होती.
*ऑन_अतिरिक्त इंधन*
असं माझ्याही कानावर आलं आहे.
ते विमान बारामती ला आले नंतर लगेच ते मुंबईला जाणार होतं.
मी असही ऐकलं आहे की पैसे वाचवण्यासाठी VSR कंपनीने त्यामध्ये अतिरिक्त इंधन टाकलं होतं.
कंपनीचे पैसे वाचले पाहिजेत, त्या कंपनीचा मेंटेनन्स रेकॉर्ड खूप काही चांगला नव्हता
आता या संदर्भातील डीजीसीए ने त्या संदर्भातील स्पेशल ऑडिट केलं आणि त्याचा रिपोर्ट देखील काल आला आहे.
*ऑन_रोहित पवार*
त्यांनी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला
तिथे त्यांचा गुन्हा दाखल करून घेतला नाही.
उद्या ते बारामती पोलीस ठाण्यात जाणार आहेत मी ही त्यांच्यासोबत जाणार आहे.
VSR कंपनीच्या विरोधात आम्ही गुन्हा दाखल करणार आहोत.
हा अपघात आहे की घातपात आहे.आमची किंवा महाराष्ट्राच्या जनतेचे एवढीच इच्छा आहे सत्य लवकरात लवकर बाहेर यावं.
*ऑन_राष्ट्रवादी विलीनीकरण*
आपला पक्ष एक होणार होता आहे खर आहे.
नगरपालिकेत जरी आपण वेगळं होतो तरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र आले.
पुणे जिल्ह्यासह बाहेरच्या जिल्ह्यातही आपले बरेच उमेदवार तुतारी सोडून घड्याळ चिन्हावर लढले.
दादांची ती इच्छा होती. साहेबांसाठी आपण ते केलं पाहिजे सर्व ठरलं होतं.
बारामती मध्ये देखील आपण एकत्र आलो.
घड्याळ चिन्हावर आपले सर्व उमेदवार निवडणुकीत होते.
आपण एकत्र येणार नसतो तर असं हे सगळं झालं असतं का.
*आमचे जे ज्येष्ठ नेते असतील किंवा या चर्चेत असणारे लोक तुम्हाला उत्तर देतील*
*कुटुंब म्हणून आम्ही एकत्र आले पाहिजे दोन्ही पक्षांनी पण एकत्र आले पाहिजे ही फक्त युगेंद्र पवार यांचीच इच्छा नाही तर पवार कुटुंबाची पण इच्छा आहे आणि महाराष्ट्र मधील अनेक लाखो कार्यकर्त्यांची इच्छा आहे जनतेची इच्छा आहे, एकत्र येणं ही काळाची गरज आहे आपल्या पक्षाला गरज आहे दोन्ही पक्षाला त्याचा फायदा होणार आहे आणि ती माझी वैयक्तिक इच्छा आहे जो निर्णय होईल त्या निर्णयाशी आम्ही सहमत असू*
*ऑन_शरद पवार प्रकृती*
मी कालच त्यांना भेटलो ते काल मुंबईच्या शोक सभेला येऊ शकले नाहीत.
डीहायड्रेशन झाल्यामुळे ते त्या ठिकाणी येऊ शकले नाही.
साहेबांची तब्येत खूप चांगली आहे.
त्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय थोडी त्यांना विश्रांतीची गरज आहे
*ऑन_पार्थ पवार राज्यसभा*
तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे कोणाला राज्यसभेवर पाठवायचं.
पार्थ पवार हे माझे मोठे भाऊ आहेत त्यांना जर पक्षाकडून संधी मिळेल तर मला आनंदच होईल.
*ऑन_शरद पवार राज्यसभा*
फॉर्म भरण्याची वेळ आणखीन दहा-बारा दिवस आहेत.
बहुतेक आज साहेब मुंबईला जातील.
पुढे काय होतंय आपले तिन्ही पक्ष आहेत महाविकास आघाडीचे एकत्र बसतील आणि ठरवतील.
राजकारण बाजूला ठेवलं तरी आपल्या countryला साहेबांची गरज आहे, साहेबां एवढा अनुभव दुसऱ्या कुठल्याच नेत्याला नाही.
परवाच साहेबांची 60 वर्ष राजकारणात पूर्ण झाली.
एवढा मोठा अनुभव असणारा नेता आपल्या भारतात नाही.
त्यामुळे सर्वच पक्षांना साहेबांसारख्या नेतृत्वाची गरज आहे.
जर तिथे गेले तर आपल्या देशाला फायदा होईल आणि त्यांनी तिथे जावं.
बाईट - युगेंद्र पवार
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KJKunal Jamdade
FollowFeb 25, 2026 15:47:210
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 25, 2026 14:02:370
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 25, 2026 13:36:200
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 25, 2026 13:03:580
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 25, 2026 12:52:200
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowFeb 25, 2026 12:35:180
Report
JMJAVED MULANI
FollowFeb 25, 2026 12:34:410
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 25, 2026 11:40:39Malegaon, Maharashtra:मालेगाव महानगरपालिकेत नमाज पठणानंतर वादाची ठिणगी, हिंदुत्ववादी संघटनांकडून हनुमान चालिसाचे पठण
0
Report
SGSagar Gaikwad
FollowFeb 25, 2026 11:37:590
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 25, 2026 11:34:440
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 25, 2026 11:32:210
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 25, 2026 11:03:460
Report
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 25, 2026 10:21:310
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 25, 2026 10:20:170
Report