Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik423401

येवला में भुजबळ ब्रिगेड ने 2026 येवला प्रीमियर लीग का उद्घाटन किया

SKSudarshan Khillare
Mar 30, 2026 01:00:32
Yeola, Maharashtra
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा मतदारसंघ असलेल्या येवल्या शहरात नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ व आमदार पंकज भुजबळ यांच्या संकल्पनेतून भुजबळ ब्रिगेड आयोजित येवला प्रीमियर लीग 2026 चे उद्घाटन दिमागदार सोहळ्याद्वारे संपन्न झाले सर्वेगमप गायिका श्वेता दांडेकर ने आपल्या अदाकारीने व गायनाने सर्वांची मने जिंकली यानंतर समीर भुजबळ यांनी सर्व संघांशी हस्तांदोलन करत वायपीएल ट्रॉफी चे अनावरण केले तसेच व क्रिकेट खेळाडूंना शुभेच्छा दिल्या
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ADANIRUDHA DAWALE
Mar 30, 2026 01:46:20
Amravati, Maharashtra:धक्कादायक मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार; भाणखेडा जंगलात घटना, पाच नराधमांना अटक अँकर :- फ्रेजरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या भानखेडा जंगल परिसरात एका तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मित्रासोबत दुचाकीने फिरायला गेलेल्या तरुणीला काही अज्ञात आरोपींनी जंगलात ओढून नेले व तिच्यावर अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ तपास शुरू करून पाच जणांना अटक केली आहे. पीडित तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत असून आरोपींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
880
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 30, 2026 01:45:31
771
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Mar 30, 2026 01:30:42
1072
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 30, 2026 01:15:47
Akola, Maharashtra:अकोल्यातील अकोट फाईल पोलिस ठाण्याच्या हद्दीत एमआयएम आणि काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये आपसी संघर्ष झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून या प्रकरणाला आता स्पष्टपणे राजकीय किनार मिळाल्याचे चित्र दिसत आहे. काल रात्रीच्या सुमारास एमआयएमचे नगरसेवक सय्यद रहीम सय्यद हाशम आणि काँग्रेसचे नगरसेवक अब्दुल सलाम अब्दुल करीम यांच्यात जुन्या वादातून जोरदार वाद झाला. सुरुवातीला दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला, मात्र काही वेळातच दोन्ही बाजूंचे समर्थक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले आणि परिस्थिती चिघळली.यानंतर दोन्ही नगरसेवकांसह त्यांच्या समर्थकांमध्ये जोरदार धक्काबुक्की आणि हाणामारी झाली. या मारहाणीत काही जण गंभीर जखमी झाले आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे दंगल नियंत्रण पथक घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता पसरली असून पोलिसांकडून बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा वाद केवळ वैयक्तिक नसून दोन वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नगरसेवकांमध्ये झाल्यामुळे या घटनेला राजकीय रंग चढल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे.पोलिसांनी दोन्ही नगरसेवकांच्या समर्थकांवर गुन्हे दाखल केले असून चार जणांना ताब्यात घेतले आहे तर पुढील तपास सुरू आहे.
944
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 30, 2026 01:00:55
1024
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 29, 2026 17:47:25
Akola, Maharashtra:गॅस सिलेंडर घेण्यासाठी आलेल्या अकोल्यातील अन्वी मिर्झापूर येथील माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांच्या मृत्यूबाबत सुरू असलेल्या विविध चर्चांना अखेर अकोला पोलिसांनी पूर्णविराम दिला आहे. पोलिसांनी अधिकृत खुलासा करत हा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाल्याचे स्पष्ट केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शंकरराव शिरसाट (वय 85) हे 28 मार्च रोजी गॅस सिलेंडर घेण्यासाठी अकोल्यात आले होते. यावेळी अचानक त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने गॅस एजन्सीच्या शेजारी असलेल्या एका डॉक्टरांकडे तपासणीसाठी नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्या नातेवाईकांना तात्काळ फोन करून शिरसाट यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला होता.यानंतर नातेवाईकांनी त्यांना सर्वोच्च रुग्णालयात दाखल केले. मात्र तपासणीदरम्यान डॉक्टरांनी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगत मृत घोषित केले, असे पोलिसांनी दिलेल्या अधिकृत पत्रकात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान या घटनेनंतर सोशल मीडियावर तसेच काही माध्यमांमध्ये गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे आणि सिलेंडर न मिळाल्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर खदान पोलीस स्टेशनने या प्रकरणाचा सखोल तपास केला. तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली तसेच संबंधित व्यक्तींची चौकशी केली. यामध्ये त्या ठिकाणी मोठी रांग नव्हती तसेच त्या वेळी तीव्र ऊन ही नव्हते, असेही तपासात स्पष्ट झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सध्या या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास खदान पोलीस स्टेशनकडून सुरू आहे.
1029
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 29, 2026 16:02:45
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- जागतिक महिला दिनानिमित्त सप्तश्रृंगी आणि क्रांती महिला ग्रुप, चंद्रपूरच्या वतीने आयोजित महिला सन्मान कार्यक्रमाचे आयोजन, आ. विजय वडेट्टीवार यांची उपस्थिती अँकर:-- जागतिक महिला दिनानिमित्त सप्तश्रृंगी आणि क्रांती महिला ग्रुप, चंद्रपूरच्या वतीने आयोजित विशेष महिला कार्यक्रमात काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांची प्रमुख उपस्थिती होती.या कार्यक्रमात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग, समूह नृत्य स्पर्धा आणि पारंपारिक मराठमोळी वेशभूषेतून समृद्ध संस्कृतीची सुंदर झलक अनुभवायला मिळाली. तसेच ‘मुलांचे संगोपन’ आणि ‘सायबर सुरक्षा’ यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
1025
comment0
Report
SKSACHIN KASABE
Mar 29, 2026 13:48:26
Pandharpur, Maharashtra:भटक्या विमुक्त समाजाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत संधी द्यावी, जय मल्हार क्रांती संघटनेच्या मेळाव्यात समाजाची मागणी राज्यातील 42 भटक्या जमातीच्या प्रतिनिधींचा पंढरपुरात मेळावा संपन्न झाला. पारंपरिक वेशभूषा करून समाज बांधव या मेळाव्यात सहभागी झाले होते. विधानसभा निवडणुकांत 53 जागांवर बेरड, रामोशी , बेडर, अशा 42 जमातीच्या मतदारांनी भाजप सोबत उभे राहिले. त्यामुळे तिथे भाजपला मदत झाली. भाजपचे 53 आमदार निवडून येण्याला हा समाज कारणीभूत आहे स्वातंत्र्यानंतर या समाजातील लोकांना कोणीही योग्य प्रतिनिधित्व दिले नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपने जय मल्हार क्रांती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दौलत नाना शितोळे यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी एकमुखी मागणी या मेळाव्यात करण्यात आली. आता मुख्यमंत्री कधी निर्णय घेतात या कडे समाजाचे लक्ष आहे
1017
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 29, 2026 13:16:34
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:पंढरपूरला देवदर्शनासाठी निघालेल्या वारकऱ्यांचा गाडीला अपघात,चालकाचा मृत्यू तर सहा महिला जखमी. पंढरपूरच्या चैत्रवारीससाठी निघालेल्या वारकरयांच्या एका गाडीला सांगलीच्या जत तालुक्यातल्या उमदी जवळ अपघात झाला आहे.या अपघातामध्ये चालकाचा मृत्यू झाला आहे,तर सहा महिला या गंभीर जखमी झाले आहेत.जत तालुक्यातल्या संख येथील महिला वारकरी पंढरपूरच्या चैत्रवारीसाठी निघाले असता, उमदी जवळ गाडीला अपघात झाला आहे. भरधाव गाडीवरील चालकाचा ताबа सुटल्याने गाडी थेट समोरून येणाऱ्या एका ट्रकला जाऊन धडकली,ज्यामध्ये चालकाच्या जागीच मृत्यू झाला आहे,तर सहा महिला वारकरी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी सोलापूर मधल्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
990
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Mar 29, 2026 13:15:50
966
comment0
Report
Advertisement
Back to top