Back
अकोट में एमआईएम व कांग्रेस नगरसेवकों के बीच टकराव, पुलिस ने स्थिति संभाली
JJJAYESH JAGAD
Mar 30, 2026 01:15:47
Akola, Maharashtra
अकोल्यातील अकोट फाईल पोलिस ठाण्याच्या हद्दीत एमआयएम आणि काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये आपसी संघर्ष झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून या प्रकरणाला आता स्पष्टपणे राजकीय किनार मिळाल्याचे चित्र दिसत आहे. काल रात्रीच्या सुमारास एमआयएमचे नगरसेवक सय्यद रहीम सय्यद हाशम आणि काँग्रेसचे नगरसेवक अब्दुल सलाम अब्दुल करीम यांच्यात जुन्या वादातून जोरदार वाद झाला. सुरुवातीला दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला, मात्र काही वेळातच दोन्ही बाजूंचे समर्थक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले आणि परिस्थिती चिघळली.यानंतर दोन्ही नगरसेवकांसह त्यांच्या समर्थकांमध्ये जोरदार धक्काबुक्की आणि हाणामारी झाली. या मारहाणीत काही जण गंभीर जखमी झाले आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे दंगल नियंत्रण पथक घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता पसरली असून पोलिसांकडून बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा वाद केवळ वैयक्तिक नसून दोन वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नगरसेवकांमध्ये झाल्यामुळे या घटनेला राजकीय रंग चढल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे.पोलिसांनी दोन्ही नगरसेवकांच्या समर्थकांवर गुन्हे दाखल केले असून चार जणांना ताब्यात घेतले आहे तर पुढील तपास सुरू आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
YKYOGESH KHARE
FollowMar 30, 2026 02:17:120
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 30, 2026 02:16:570
Report
GMGajanan MAchindar
FollowMar 30, 2026 02:01:14889
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 30, 2026 02:00:33946
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 30, 2026 01:46:201076
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 30, 2026 01:45:31893
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 30, 2026 01:30:421083
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 30, 2026 01:00:551024
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 30, 2026 01:00:431018
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 30, 2026 01:00:321079
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 29, 2026 17:47:251029
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 29, 2026 16:02:451025
Report
KJKunal Jamdade
FollowMar 29, 2026 14:46:54944
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 29, 2026 13:48:261017
Report