Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik423401

Ajit Pawar गुट ने शिवसेना (Shinde) गुट में प्रवेश किया; Yeola में नगर प्रमुख नियुक्त

SKSudarshan Khillare
Dec 14, 2025 01:30:54
Yeola, Maharashtra
येवला तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) निष्ठावंत पदाधिकारी जिल्हा सरचिटणीस विशाल परदेशी यांनी शिवसेना (एकनाथ शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश केला आहे. हा प्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर येथे पार पडला.या पक्षप्रवेशावेळी विशाल परदेशी यांची शिवसेना – येवला शहरप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. यामुळे येवला शहर व तालुक्यात शिवसेनेची ताकद अधिक मजबूत होणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. यावेळी विशाल परदेशी यांच्यासोबत रोहित जावळे, विशाल भावसार, प्रेम नागपुरे, गणेश कापसे, भूषण मांडवडे, सोनू जाधव, रोहित निलक, सोनू पाटोळे, रोहित सोरते, अमोल निलख, मनीष नागपुरे आदी उपस्थित होते.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VBVAIBHAV BALKUNDE
Dec 14, 2025 05:32:47
Latur, Maharashtra:लातूर महानगरपालिकेत एक धक्का-दार थक प्रकार समोर आला आहे… सरकारी नोकरीच्या नावाखाली बोगस नियुक्ती पत्रांचा मोठा रॅकेट उघडकीस आलंय…आणि विशेष म्हणजे या बनावट ऑर्डरवर थेट महापालिका आयुक्तांच्या सही-शिक्क्याचा वापर करण्यात आलाय त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. हा सर्व धक्का-दार प्रकार माहिती अधिकारातून समोर आलाय. लातूर महापालिकेत क्लार्कची नोकरी लावतो असे आमिष दाखवून महापालिका आयुक्त मानसी मीना यांच्या स्वाक्षरी आणि पालिकेचा शिक्का असलेले नियुक्तिपत्र देऊन ६ तरुणांची फसवणुक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणुक झालेल्या तरुणांच्या सांगण्यानुसार ही केवळ ६ तरुणांची फसवणुक नसुन यापेक्षा अधिक तरुणांना अशाच पध्दतीने गंडवण्यात आले असुन यासाठी प्रत्येकी पाच लाख रुपये उकळण्यात आले असल्याचं सांगण्यात आला आहे. नोकरीचे आमिष दाखवणारा तो तरुण हा महापालिकेत कर्मचारी नसल्याचे सांगीतलं जात आहे.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Dec 14, 2025 05:30:20
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 14, 2025 05:15:13
Nagpur, Maharashtra:रेशीमबाग स्मৃতि मंदिर परिसरात संघ स्थानावर दर्शन घेतल्यानंतर शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी 121 केला आहे. या ठिकाणी आल्यानंतर देशभक्ती असते, वेगळी उर्मी मिळते. प्रत्येक पक्षाची आपली भूमिका असते. आमची हिंदुत्वाची भूमिका... अजित दादा काय आले नाही त्यांच्या पक्षाची विचारधारा वेगळी असेल... इथे नवीन येणे बंधनकारक नाही. पृथ्वीराज चव्हाण मोठे नेते आहे ते NDA चे भविष्य सांगायला लागतले.... NDA चे नेते असा निर्णय घेताना कोणाला सांगून किंवा विचारून घेणार नाहीत... एक वैचारिक किंवा विचारपूर्वक. नागपूर आणि चंद्रपूर दोन्ही महापालिकांच्या निवडणुका यांच्यासोबतच होतील.. 27+2 असे 29 महापालिकेच्या निवडणुका एकत्रित होतील.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 14, 2025 05:05:41
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Dec 14, 2025 04:35:45
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग – सोलापुराच्या विकासाचे ऐतिहासिक साक्ष देणारा दमाणी नगर येथील रेल्वेपूल आज होणार इतिहास जमा. दमाणी नगर येथील रेल्वेपूल पाडण्यासाठी रेल्वे प्रशासनाचा बारा तासाचा मेगाब्लॉक. सोलापुरातून धावणाऱ्या अनेक गाड्यांचे मार्ग बदलले तर काही गाड्या करण्यात आल्या आहे रद्द. दीडशेहून अधिक कामगार आणि आधुनिक सामग्रीच्या माध्यमातून रेल्वेपूल येणार पाडण्यात. गेल्या आठ दिवसापासून सोलापुरातून देगावकडे वाहतुकीचा रस्ता करण्यात आला आहे बंद. सोलापूर वरून दमाणी नगर देगाव या परिसरात जाण्यासाठी दोन पर्याय मार्गाचा वापर. दमाणी नगर येथील रेल्वेपूल साडेदहा वाजता पाडण्यात येणार.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 14, 2025 04:35:34
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:बारावे ज्योतिर्लिंग असलेले वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर महादेव मंदिर हे महाराष्ट्रातील एकमेव पूर्वाभिमुख शिवलिंग असलेले मंदिर आहे. या मंदिराचा विकास करण्यात येत आहे. त्यासाठी तयार केलेल्या आराखड्यात शेकडो वर्षांपासून चालत आलेली मंदिराच्या पूर्ण प्रदक्षिणेची धार्मिक पद्धत बदलून 'अर्ध प्रदक्षिणा' मार्गाचे नियोजन केले जाणारे असल्यामुळे धार्मिक क्षेत्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या घृष्णेश्वर महादेव मंदिर विकासकामाच्या आराखड्याचे काम होत आहे. गट नं.४ मध्ये २१० कोटी रुपयांची विकासकामे केली जाणार आहेत. जलाधारी ओलांडू नये तसेच शिवपिंडीच्या दर्शनापूर्वी नंदीचे दर्शन घ्यावे असे काही लोकांचे मत होते. यानुसार नव्याने मार्ग तयार करण्यात येत आहे. असे प्रशासनाचे म्हणणे आहे...
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Dec 14, 2025 04:32:58
Kalyan, Maharashtra:कल्याण-डोंबिवली महानगरपालिका ऊर्जा बचतीचा अनोखा संदेश केडीएमसीत ऊर्जा संवर्धन सप्ताह २०२५ ची सायकल जनजागृती रॅलीने दमदार सुरुवात दोनशे सायकलपटूंचा उत्स्फूर्त सहभाग; हरित व सौर ऊर्जेच्या वापराचे आयुक्त अभिनव गोयल यांचे आवाहन महापालिकेच्या मुख्यालयातून भव्य सायकल जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीचा शुभारंभ महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते करण्यात आला. नगरपालिका मुख्यालयातून सुरू झालेली ही सायकल रॅली शहरातील विविध भागांतून फिरत नागरिकांमध्ये ऊर्जा बचत, ऊर्जा कार्यक्षमता आणि हरित ऊर्जा, विशेषतः सौर ऊर्जेच्या वापराबाबत जनजागृती करत पुन्हा महापालिका मुख्यालयात येऊन संपन्न झाली. या रॅलीमध्ये जवळपास १५० ते २०० सायकलपटूंनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या मध्ये कल्याण सायकलिस्ट ग्रुप, महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी, पोलीस कर्मचारी, नागरिक तसेच पोलीस उपायुक्त यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. या रॅलीच्या माध्यमातून नागरिकांना एक स्पष्ट संदेश देण्यात आला—दैनंदिन जीवनात जास्तीत जास्त हरित ऊर्जा आणि सौर ऊर्जेचा वापर करावा. अनावश्यक दिवे, पंखे बंद ठेवणे, घरगुती आणि व्यावसायिक ठिकाणी ऊर्जा कार्यक्षम उपकरणांचा वापर करणे, तसेच ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी (BEE) मानांकन असलेली उपकरणे वापरण्याचे आवाहन करण्यात आले. ऊर्जा बचत केवळ खर्च कमी करण्यापुरती मर्यादित नसून, पर्यावरण संरक्षण आणि ग्लोबल वॉर्मिंगसारख्या गंभीर समस्यांवर मात करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, असे महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी यावेळी सांगितले. ऊर्जा संवर्धन सप्ताहाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये पर्यावरणपूरक सवयी रुजवण्याचा आणि शाश्वत विकासाचा संदेश देण्याचा केडीएमसीचा हा उपक्रम नागरिकांकडून कौतुकास्पद ठरत आहे
0
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 14, 2025 03:55:27
Kolhapur, Maharashtra:Kop Tapal Samelan कोल्हापुरात ग्रामीण डाक सेवकांचे भव्य संमेलन पार पडले. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. ग्रामीण भागातील डाक सेवा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने संचार मंत्रालयाने महत्त्वाचे पाऊल उचलले असून, त्या अनुषंगाने हे संमेलन आयोजित झाले होते. या वेळी ग्रामीण भागात उत्कृष्ट आणि उल्लेखनीय सेवा बजावणाऱ्या डाक सेवकांचा सन्मान करण्यात आला. आपल्या भाषणात ज्योतिरादित्य शिंदे यांनी कोल्हापूर आणि ग्वाल्हेरच्या महाराजांमधील ऐतिहासिक संबंधांचा उल्लेख करत उपस्थितांची मने जिंकली. तसेच, ग्रामीण भागात अतिशय निष्ठेने आणि जबाबदारीने टपाल सेवा देणाऱ्या डाक सेवकांचे मनापासून कौतुक करत, पुढील काळातही अधिक जोमाने काम करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Dec 14, 2025 03:50:34
Pune, Maharashtra:अहिल्यानगर शहराची ओळख असलेली ऐतिहासिक माळीवाडा वेस निष्कासित करण्याबाबत महानगरपालिकेने घेतलेला निर्णय रद्द करण्यात आला आहे या निर्णयाचं माळीवाडा परिसरासह शहरातील नागरिकांनी स्वागत केला असून माळीवाडा वेशी जवळ फटाके फोडत आणि पेढे भरवत आनंद उत्सव साजरा केला आहे तीन दिवसांपूर्वी महानगरपालिकेने माळीवाडा वेस्ट निष्काशीत करण्याबाबत नागरिकांच्या हरकती आणि सूचना मागविल्या होत्या...परंतू महापालिकेच्या निर्णयाला नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला... माळीवाडा परिसरातील नागरिकांनी तातडीने बैठक घेऊन निषेध करत एकाच दिवसांत तब्बल दोन हजाराहून अधिक हरकत अर्ज जमा केले....दरम्यान जनभावना व लोकहित लक्षात घेऊन महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी हा निर्णय तात्काळ रद्द केला... निर्णय रद्द होताच वेशीसमोर फटाके फोडले आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला...
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 14, 2025 03:47:44
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर मध्ये छातीत दुखत असल्याची तक्रार घेऊन घाटीतील अपघात विभागात आलेल्या ४२ वर्षीय रुग्णाला 'नॉर्मल' असल्याचे सांगून घरी पाठविण्यात आले. घरी गेल्यानंतर तासाभरातच छातीत तीव्र वेदना सुरू झाल्याने नातेवाइकांनी रुग्णाला पुन्हा घाटीत आणले. परंतु, तोपर्यंत रुग्णाने अखेरचा श्वास घेतला होता. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करीत गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाइकांनी केली. याप्रकरणी रुग्णालयाने समिती नेमली आहे. प्रकाश तुळशीराम गायकवाड असे मृताचे नाव आहे. शनिवारी पहाटे ४ वाजेच्या sुमारास छातीत दुखत असल्याने कुटुंबीयांनी प्रकाश यांना घाटीत नेले. ऑन ड्यूटी डॉक्टरने तपासणी केली. 'ईसीजी' ही काढला. 'नॉर्मल' असल्याचे सांगत काही गोळ्या लिहून देत 'रुग्णाला घरी पाठवले त्यानंतर तासाभरात छातीत दुखत असल्याने मृत्यू झालाय.'
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Dec 14, 2025 03:45:58
Pimpri-Chinchwad, Maharashtra:ऐत्या 19 डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होईल, भारताचा पंतप्रधान बदलेल अन मराठी माणूस पंतप्रधान होईल, ती व्यक्ती भाजपचीच असू शकते. असं भाकीत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाणांनी केलाय. पृथ्वीराज चव्हाणांनी हा दावा करताना जगात घडणाऱ्या घडामोडींचे संदर्भ दिलेत. अमेरिकेतील नव्या कायद्याचा ही दाखला चव्हाणांनी दिला. अमेरिकेतील एक व्यक्ती जो इस्त्राईलचा गुप्तहेर होता. त्याने अनेक दिग्गज व्यक्तींच्या बंगल्यात कॅमेरे लावून स्टिंग ऑपरेशन केलेत, आता लवकरचं तो अनेकांचा पर्दाफाश करणार आहे. त्यामुळं अमेरिकेत मोठा धुमाकूळ होणार आहे. अमेरिका सरकार एक कायदा करुन येत्या 19 डिसेंबरला त्या दिग्गजांची नावं जाहीर करणार आहे. असा दावा चव्हाणांनी केला. आता यात कोणाकोणाची नावं आहेत? याची मला फारशी कल्पना नाही. असं म्हणत चव्हाणांनी अमेरिकेतल्या स्टिंग OP पडसाद भारतात उमटण्याची शक्यता वर्तवली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये जनगणमन या पुस्तकाच्या प्रकाशन केल्यानंतर चव्हाणांनी भारतात 19 डिसेंबरला राजकीय भूकंप होण्याचं भाकीत केलं. ते पिंपरी चिंचवड मध्ये एका कार्यक्रमात बोलत होते...!
0
comment0
Report
Advertisement
Back to top