Back
केडीएमसी: ऊर्जा बचत सप्ताह की साइकिल रैली से हरित ऊर्जा का संदेश उजागर
ABATISH BHOIR
Dec 14, 2025 04:32:58
Kalyan, Maharashtra
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका ऊर्जा बचतीचा अनोखा संदेश केडीएमसीत ऊर्जा संवर्धन सप्ताह २०२५ ची सायकल जनजागृती रॅलीने दमदार सुरुवात दोनशे सायकलपटूंचा उत्स्फूर्त सहभाग; हरित व सौर ऊर्जेच्या वापराचे आयुक्त अभिनव गोयल यांचे आवाहन महापालिकेच्या मुख्यालयातून भव्य सायकल जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीचा शुभारंभ महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते करण्यात आला. नगरपालिका मुख्यालयातून सुरू झालेली ही सायकल रॅली शहरातील विविध भागांतून फिरत नागरिकांमध्ये ऊर्जा बचत, ऊर्जा कार्यक्षमता आणि हरित ऊर्जा, विशेषतः सौर ऊर्जेच्या वापराबाबत जनजागृती करत पुन्हा महापालिका मुख्यालयात येऊन संपन्न झाली. या रॅलीमध्ये जवळपास १५० ते २०० सायकलपटूंनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या मध्ये कल्याण सायकलिस्ट ग्रुप, महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी, पोलीस कर्मचारी, नागरिक तसेच पोलीस उपायुक्त यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. या रॅलीच्या माध्यमातून नागरिकांना एक स्पष्ट संदेश देण्यात आला—दैनंदिन जीवनात जास्तीत जास्त हरित ऊर्जा आणि सौर ऊर्जेचा वापर करावा. अनावश्यक दिवे, पंखे बंद ठेवणे, घरगुती आणि व्यावसायिक ठिकाणी ऊर्जा कार्यक्षम उपकरणांचा वापर करणे, तसेच ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी (BEE) मानांकन असलेली उपकरणे वापरण्याचे आवाहन करण्यात आले. ऊर्जा बचत केवळ खर्च कमी करण्यापुरती मर्यादित नसून, पर्यावरण संरक्षण आणि ग्लोबल वॉर्मिंगसारख्या गंभीर समस्यांवर मात करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, असे महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी यावेळी सांगितले. ऊर्जा संवर्धन सप्ताहाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये पर्यावरणपूरक सवयी रुजवण्याचा आणि शाश्वत विकासाचा संदेश देण्याचा केडीएमसीचा हा उपक्रम नागरिकांकडून कौतुकास्पद ठरत आहे
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 14, 2025 09:33:160
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 14, 2025 09:23:110
Report
ABATISH BHOIR
FollowDec 14, 2025 09:18:120
Report
KJKunal Jamdade
FollowDec 14, 2025 08:48:060
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowDec 14, 2025 08:47:520
Report
APAMOL PEDNEKAR
FollowDec 14, 2025 08:35:340
Report
UPUmesh Parab
FollowDec 14, 2025 08:32:550
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 14, 2025 08:32:060
Report
KJKunal Jamdade
FollowDec 14, 2025 08:19:040
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 14, 2025 08:15:520
Report
KJKunal Jamdade
FollowDec 14, 2025 06:50:400
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 14, 2025 06:48:500
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 14, 2025 06:48:330
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowDec 14, 2025 06:46:030
Report
AKAMAR KANE
FollowDec 14, 2025 06:45:51Nagpur, Maharashtra:नागपूर
अमोल मिटकरी, राष्ट्रवादी काँग्रेस (AP)
रेशीमबाग स्मृती मंदिर परिसरात मुझे वैयक्तिक निमंत्रण नहीं मिला... पक्षाला होत की नाही हे मला माहिती नाही
0
Report