423109
सरकार के आदेश पर बिबटिया मारने की तैयारी, संगमनेर में शव के बाद तनाव
Shirdi, Maharashtra:अखेर नरभक्षक बिबटयाला ठार करण्याचे शासनाचे आदेश... काल संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथे बिबटयाच्या हल्ल्यात चार वर्षीय बालकाचा झाला होता मृत्यू... काल रात्री पासुन वनविभागाकडून बिबटयाला पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू... सिद्धेश कडलग या चिमुकल्याचा झाला मृत्यू... बिबटयाला ठार मारल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याची कुटूंबीयांची भुमिका...ग्रामस्थही आक्रमक वनविभागाच्या कारवाईकडे तालुक्याचे लक्ष...0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
गणेशोत्सव से पहले माणगांव में पुलिस ने अवैध जua अड्डा ध्वस्त कर 32 गिरफ्तार किए
Chendhare, Maharashtra:गणेशोत्सवाच्या तोंडावर माणगांव पोलिसांची मोठी कारवाई. रायगडच्या माणगांव येथे सुरू असलेल्या अनधिकृत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा. 32 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 76 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. चारचाकी गाडी, मोबाईल और रोकड जप्त. गणेशोत्सवाच्या तोंडावर पोलिस कारवाईने जुगार अड्डे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले. मारुती आंधळे, पोलिस निरीक्षक माणगाव0
0
Report
नितेश राणे के बयान से महाराष्ट्र में नया राजनीतिक बखेड़ा
Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग, मंत्री नितेश राणे on संदीप राऊत ( एकनाथ शिंदे लंडन दौरा टीका ) --- ह्यांचा मालक जेव्हा लंडन दावोसला जायचा तेव्हा आम्ही त्याला काय बोलायचं.. तिसरी मातोश्री लंडन ला आहे अस आम्ही ऐकतोय ह्याचा जनतेला संजय राजाराम राऊतच्या मालकाने हिशोब दिला पाहिजे. आपल्या राज्यातील एका व्यक्तीला पुरस्कार देत असतील तर त्याच कौतुक करावं, अभिमान वाटावा की त्यावर वैयक्तिक द्वेष बाळगून अशी वक्तव्ये करावी ? तुझ्या मालकासारखे तिकडे जाऊन महाराष्ट्राचे धिंडवडे तर उडवत नाहीत ना ऑन पर्युषण --- माहिती घेऊन बोलेन ऑन संजय राऊत ( बुद्धिजीवी ) --- तुझ्या उबाठा मध्ये बलात्कारी आणि गुंड भरलेले आहेत ना... तुझ्या मालकाच्या मुलावर सामूहिक बलात्कार आणि मर्डर ची केस होणार आहे अस दिसतंय त्यावर बोला आणि मग असे भाष्य करा ऑन सुनेत्रा पवार ( अर्थ खात ) --- राज्य सरकार केंद्र सरकार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही राज्यासाठी अतिशय चांगलं काम करत आहोत. ऑन संजय राऊत ( धर्माची बंधन ) -- धर्माचा आधार घेऊन धर्माला अडचणीत आणून जी काही जिहाद निर्माण करण्याचे मनसुबे आखले जात आहेत. गजवा हिंद केलं जातंय स्वतःच्या धर्माला ठेवण्यासाठी अशा मागण्या आल्या.. लादण्यापेक्षा धर्माला सुरक्षित ठेवणं आपलं काम आहे. ऑन मराठा आंदोलक मृत कुटुंबीय पाठिंबा ( उदय सामंत ) --- आमचं सरकार हिंदू समाजाच्या प्रत्येक घटकाबरोबर उभं आहे. 12 बलुतेदार आहेत त्यांना एकत्र घेऊन राज्याचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. शब्द पाळणारा मुख्यमंत्री आपल्या राज्याला मिळालेला आहे.0
0
Report
15 अक्टूबर से गन्ना पेराई शुरू, किसान चिंतित; राजू शेट्टी ने सरकार का निर्णय किया विरोध
Kolhapur, Maharashtra:कप शक्करकण बनावट? Anc : केंद्र सरकारच्या आदेशानुसार यंदाचा ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ समितीने घेतलाय. मात्र सरकारच्या या निर्णयाला ऊस पट्ट्यातून विरोध होऊ लागलाय. ऑक्टोबरमध्ये ऊस तोड झाल्यास साखरेचा उतारा अर्थात रिकव्हरी कमी होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जातेय. रिकव्हरी कमी झाली तर तो त्याचा थेट परिणाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होणार असल्याने, कारखाने सुरू झाले तरी शेतकरी ऊस तोड देणार का? असा प्रश्न निर्माण झालाय. पाहूया याचाच आढावा घेणारा हा रिपोर्ट. VO 1 : देशाच्या बाजारपेठेत साखरेचा तुटवडा निर्माण झाल्याने काही काळ साखरेच्या दरात मोठी वाढ झाली… त्यानंतर केंद्र सरकारने साखर धोरणात बदल करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, पण साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध असतानाही कृत्रिम टंचाई निर्माण करून व्यापाऱ्यांनी फायदा घेतल्याचा आरोप शेतकरी नेत्यांकडून केला जातोय. एकीकडे साखरेच्या उपलब्धतेचा हा मुद्दा चर्चेत असतानाच, राज्य सरकारने यंदाचा ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. मात्र हा निर्णय ऊस उत्पादक शेतकरी आणि शेतकरी नेत्यांना मान्य नसल्याचं चित्र आहे. शेतकऱ्यांच्या मते, ऑक्टोबरमध्ये ऊस पूर्णपणे पक्व झालेला नसतो , त्यामुळे लवकर तोड झाल्यास उसाच्या वजनाबरोबरच साखरेचा उताराही कमी होण्याची शक्यता आहे. साधारणपणे नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून डिसेंबरच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यापर्यंत उसातील साखरेचा उतारा तुलनेने कमी असतो. त्यानंतर थंडी वाढू लागल्यानंतर उसातील साखरेचे प्रमाण आणि रिकव्हरी वाढण्यास सुरुवात होते. त्यामुळे 15 ऑक्टोबरपासून गाळप सुरू केल्यास कमी रिकव्हरीच्या काळात मोठ्या प्रमाणावर ऊस गाळप होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम साखर उत्पादनावर आणि परिणामी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मिळणाऱ्या दरावर होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जातेय. VO 2 : सरकारने 15 ऑक्टोबरपासून कारखाने सुरू करण्याचा निर्णय घेतला असला, तरी प्रत्यक्षात शेतकरी आपल्या उसाला तोड देणार का, याबाबत संभ्रम निर्माण झालाय. शेतकरीपाठोपाठ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही सरकारच्या निर्णयावर आक्षेप घेतलाय. 15 ऑक्टोबरपासून गाळप सुरू करण्याचा निर्णय ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योगाच्या हिताचा नसल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलंय. त्याचबरोबर सरकारने हा निर्णय घ्यायचाच असल्यास, केंद्र आणि राज्य सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना किमान 500 रुपये प्रतिटन अनुदान द्यावं, अशी मागणी त्यांनी केलीय. VO 3 : देशात साखरेचा साठा अपुरा असल्याचं कारण पुढे करून गाळप हंगाम लवकर सुरू करण्याचा निर्णय घेतला जातोय, असा आरोप शेतकरी नेत्यांकडून करण्यात येतोय. मात्र देशात साखरेची टंचाई नसून आगामी नोव्हेंबरपर्यंत पुरेल इतका साखर साठा उपलब्ध असल्याचा दावा शेतकरी नेते करत आहेत. काही मोजक्या साखर कारखानदार आणि व्यापाऱ्यांनी केंद्र सरकारसमोर चुकीची आकडेवारी मांडल्याचा आरोपही केला जातोय. दरम्यान, गाळप हंगाम लवकर सुरू झाल्यास उसाच्या साखर उताऱ्यावर परिणाम होऊन एकूण साखर उत्पादनातही मोठी घट होण्याची शक्यता साखर कारखानदार देखील व्यक्त करत आहेत. VO 4:- देशभरात गाळप हंगाम लवकर सुरू झाल्याने साखर उत्पादनात तब्बल 15 ते 20 लाख मेट्रिक टनांची घट होऊ शकते, असा दावा शेतकरी नेते आणि साखर कारखानदार व्यक्त करत आहेत. त्यामुळे मोजक्या कारखानदार आणि व्यापाऱ्यांच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष करून गाळप हंगाम लवकर सुरू करण्याचा निर्णय घेतला का? असा सवाल शेतकरी आणि शेतकरी नेते उपस्थित करत आहेत प्रताप नाईक झी 24 तास कोल्हापूर.0
0
Report
Advertisement
कोल्हापुर गोकुळ दूध संघ चुनाव: अदृश्य शक्तियों के आरोप, मतदाता सूची से संस्थाएं हटाने पर विवाद
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर झालाय. गोकुळच्या 25 जागांसाठी 18 ऑक्टोबरला मतदान, तर 19 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज गोकुळमधील सुमारे 1400 दूध संस्थांचा सत्यविजय मेळावा पार पडला. या मेळाव्याच्या निमित्ताने ज्या दूध संस्थांना मतदानापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न झाला, त्या संस्थांनी कथित अदृश्य शक्ती विरोधात एल्गार पुकारलाय. या शक्तीला निवडणुकीत थारा न देण्याचा निर्धारच या मेळाव्यात करण्यात आला. या मेळाव्यात गोकुळच्या मतदार यादीतून अनेक संस्था वगळण्याचा आरोप करारलेल्या संस्थांच्या प्रतिनिधींनी केला. तरीही न्यायालयीन लढा देत आम्ही पात्र ठरलो, त्यामुळे आता ज्यांनी संस्थांना अपात्र करण्याचा घाट घातला, त्या कथित अदृश्य शक्तीला निवडणुतीत धडा शिकवण्याचा निर्धार या मेळाव्यात व्यक्त करण्यात आला. या मेळाव्यातून गोकुळच्या सत्ताधारी संचालकांना पाठिंबा दर्शवण्यात आला, पण एक राजकीय संदेशही देण्यात आला: अदृश्य शक्तीच्या बाजूने असल्यास आम्ही तुमच्या सोबत नाही म्हणण्याची भूमिका घेतली. 18 ऑक्टोबरला निवडणुकीची जोरदार तयारी सुरू असून, काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनीही गोकुळ निवडणुकीची तयारी प्रभावीपणे सुरू केलीय. शहरातील काही चौकात banners च्या माध्यमातून नेतृत्वाची बरोबरी लढण्याचा संदेश देण्यात आला आहे. त्यामुळे गोकुळ निवडणुकीत महायुती आणि समविचारी आघाडी यांच्यात थेट टक्कर होण्याची शक्यता आहे. तथापि दुखावलेल्या संस्थांचा वजन कोणत्या गटाच्या प cupboard वर जाईल, हे गोकुळच्या सत्तेच गणित ठरवणार आहे.0
0
Report
रत्नागिरी भाजपा जिल्हा बैठक सम्पन्न
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरीत भाजप जिल्हा कार्यकारिणी बैठक संपन्न रत्नागिरीमध्ये भारतीय जनता पार्टी रत्नागिरी दक्षिण जिल्हा कार्यकारिणी बैठक भाजपचे प्रदेशाध्यक्ष, आमदार रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.. यावेळी प्रदेश महामंत्री, आमदार निरजन डावखरे, आमदार योगेश सागर, आमदार प्रमोद जठार, सिंधू रत्न Yोजनेचे उपाध्यक्ष, माजी आमदार डॉ. विनय नातू, जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव आदि व्यासपीठावर उपस्थित होते.. स्थानिक स्वराज्य संस्था आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे संघटन गावपातळीपर्यंत अधिक मजबूत करणे, कार्यकर्त्यांमध्ये सेवाभावाची भावना रुजवणे आणि केंद्र-राज्य सरकारच्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणे, या उद्देशाने या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं.. दरम्यान कार्यकर्त्यांनी लोकसंग्रह वाढवावा, जिभेवर साखर, डोक्यावर बर्फ, पायात गती ठेवून काम करा असं आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी यावेळी केलं..0
0
Report
मानोरा में किसानों ने पोळा भरकर दुष्काळ राहत की मांग तेज की
Washim, Maharashtra:वाशीम: मानोरा तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन केलं. मागील दीड महिन्यापासून पाऊस नसल्याने पावसाअभावी सोयाबीन, कपाशी, तूर, मूग आणि उडीदयाह खरीपची पिकं करपली असताना शशना कडून दिलासा मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी मानोरा तहसील कार्यालयपरिसरात शेतकरी पोळा भरवत आंदोलन केलं. परिवर्तन शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी, कृषिमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे मानोरा तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यात समावेश करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, मागणीची दखल न घेतल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या आंदोलनात तालुक्यात सरसकट कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी एक लाख रुपयांची मदत द्यावी, कृषी पंपाचे भारनियमन तात्काळ बंद करावे आणि प्रलंबित पीक विम्याची रक्कम तातडीने मंजूर करावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.0
0
Report
Advertisement
गणेशोत्सव पर डीजे रोक से नागपुर के किसान ने विषप्राशन करने का किया प्रयास
Nagpur, Maharashtra:नागपूर - डीजे व्यवसायाशी संबंधीत शेतकऱ्याचा विषप्राशन करण्याचा प्रयत्न... - गणेशोत्सवाच्या तोंडावर डीजे व्यवसायावर निर्बंध आल्याने चिंतेची माहिती - जलालखेडा तालुक्यातील देवग्राम येथील सतीश नत्थुजी वानखेडे यांचा विषप्राशनाचा प्रयत्न - बुधवारी रात्री साडेदहा वाजताच्या sumaras बोपापूर शिवारातील शेतात जाऊन सतीश वानखेडे यांनी विषप्राशन केले. - विषप्राशन केल्यानंतर त्यांनी मित्राला फोन करून याबाबत माहिती दिली. - मित्रांनी तातडीने शेतात पोहोचून त्यांना जलालखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. - मात्र विष मोठ्या प्रमाणात घेतल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले आहे. - सतीश वानखेडे हे शेतीसोबत डीजेचा व्यवसाय करतात. गणेशोत्सवाच्या काळात डीजे व्यवसायातून मोठ्या प्रमाणात उत्पन्नाची अपेक्षा असताना निर्बंधांमुळे ते चिंतेत असल्याच बोलला जात आहे.. - त्यातच यंदा पावसाने ओढ दिल्याने शेतीतील पिकांवरही संकट निर्माण झाले आहे. - शेतीवर मोठा खर्च करूनही पावसाअभावी पिके सुकण्याच्या मार्गावर असल्याने ते गेल्या काही दिवसांपासून चिंतेत असल्याचे सांगण्यात येत आहे. - घटनेची माहिती मिळताच जलालखेडा पोलिसांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन माहिती घेतली असून पुढील तपास सुरू केला आहे. - डीजेवरील निर्बंध आणि शेतीतील संकटामुळे आर्थिक अडचणीत आलेल्या या व्यावसायिक शेतकऱ्याने टोकाचे पाऊल का? उचलले, याचा पोलीस तपास करत आहेत.0
0
Report
डिंभे-मानिकडोह डैम के निर्णय पर तात्कालिक स्थगन, किसानों के लिए पानी की बड़ी मांग
Manchar, Maharashtra:डिंभे-माणिकडोह बोगद्याच्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती: मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मध्यस्थीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुकडी प्रकल्पाच्या चौथ्या सुधारित मान्यतेच्या इतिवृत्ताला पुढील स्वतंत्र बैठक होईपर्यंत स्थगिती दिली आहे. स्थानिक शेतకऱ्यांसाठी पाण्याची मागणी: आंबेगाव, जुन्नर, शिरूर आणि पारनेर तालुक्यातील ६५ बंधाऱ्यांसाठी पावसाळ्यानंतर पाणी मिळण्याची शाश्वती नसल्याने २.५५ टीएमसी पाणी राखीव ठेवण्याची आग्रही मागणी केली आहे. आदिवासी व दुष्काळी भागाचा विचार: डिंभे धरणग्रस्त १७ गावांसाठी आणि लोणी-धामणी दुष्काळी पट्ट्यासाठी उपसा जलसिंचन योजनांना सुधारित मान्यतेत समाविष्ट करण्याची अट घालण्यात आली आहे. धरणाच्या तळाशी बोगदा करण्यास तीव्र विरोध: डिंभे धरणाच्या तळापासून बोगदा काढल्यास दोन महिन्यांत १३ टीएमसी पाणी रिकामा होईल आणि पुणे जिल्ह्यातील तालुके कायमचे दुष्काळी होतील; त्यामुळे कुकडीचा डावा कालवा सक्षम करण्यावर भर द्यावा. पाण्यासाठी राजकीय संघर्ष नाही: हा पाण्याचा प्रश्न पक्ष, व्यक्ती किंवा पुणे विरुद्ध नगर असा नसून, स्थानिक शेतकऱ्यांना उध्वस्त करून नवीन प्रकल्प राबवण्याला आपला तीव्र विरोध राहील, अशी स्पष्ट भूमिका मंत्री वळसे पाटील यांनी मांडली आहे. प्रतिनिधी: हेमंत चापुडे0
0
Report
सोलापुर में रमेश कदम के बयान पर रिपब्लिकन सेना ने किया आक्रामक प्रदर्शन
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांच्या विरोधात सोलापुरातील रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते आक्रमक मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांच्या विरोधात सोलापुरातील रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते आक्रमक माजी आमदार रमेश कदम यानी रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या विरोधात केली होती टीका अनुसूचित जाती आरक्षणामधील उपवर्गीकरणसंदर्भात बोलताना रमेश कदम यांनी आनंदराज आंबेडकर यांच्यावर टीका केली होती त्यानंतर रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी रमेश कदम यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन केलं यावेळी कार्यकर्त्यांनी रमेश कदम यांच्या प्रतिकात्मक पुतळा दहन करण्याचा देखील प्रयत्न केला दरम्यान रमेश कदम यांनी तात्काळ आनंदराज आंबेडकर यांची माफी मागावी अन्यथा त्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन केलं जाईल अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली0
0
Report
Advertisement
गणेश उत्सव के चलते कोकण में भारी भीड़, लाखों भक्त पहुंचेंगे अपने गांव
Ratnagiri, Maharashtra:कोकणात बाप्पाच्या स्वागताची जोरदार तयारी; लाखो चाकरमानी घराकडे रवाना, महामार्ग आणि कोकण रेल्वे प्रवाशांच्या गर्दीने तुडुंब!.. आजपासूनच रत्नागिरीसह संपूर्ण कोकणात गणेशभक्तांचा मोठा ओघ सुरू झाला असून, पुढील तीन दिवसांत तब्बल लाखो चाकरमानी आपल्या गावी दाखल होणार आहेत..0
0
Report
किसानों की नाराज़गी के बीच विधानसभा बजट समिति का ग्रामीण दौरा, पोळा खर्च पर हंगामा
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ जिल्ह्यात दाखल झालेल्या विधानमंडळ अंदाज समितीच्या दौऱ्यावर शेतकरी नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा पोळा हा महत्त्वाचा सण असताना, त्यातच पावसाअभावी शेतकरी संकटात सापडला असताना आमदार अर्जुन खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली 27 आमदारांची विधानमंडळ अंदाज समिती जिल्ह्यातील ग्रामीण भागात भेटी देऊन विविध विभागांचा बैठकांमधून आढावा घेणार आहे. गेल्या पाच वर्षातील विविध विभागांना प्राप्त निधी व प्रत्यक्ष खर्चाची माहिती ही समिती जाणून घेणार आहे. मात्र पोळा सणाच्या कालावधीत 27 आमदारांची समिती, दहा वरिष्ठ अधिकारी, आमदारांचे स्वीय सहाय्यक यांच्यावर पाहुणचाराची उधळपट्टी कशासाठी, पोळा सणाला दौरा म्हणजे शेतकरी भावनांचा अवमान आहे असा आरोप सत्ताधारी भाजपाचे शेतकरी नेते देवानंद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते मनीष जाधव आदींनी केला आहे.0
0
Report
अक्कलकोट के वळसंग में दो गुटों के बीच दगडफेक, वीडियो वायरल; 15 गिरफ्तार
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग: अक्कलकोट तालुक्यातील वळसंगमध्ये दोन गटात तुफान दगडफेक. वळसंग गावामध्ये वीस ते पंचवीस जमावाचा काठ्या, कोयते, लोखंडी रॉड घेऊन हाणामारी. जुन्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी झाल्याने बराच काळ तणावाचे वातावरण. दगडफेक आणि तुंबळ हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल. दगडफेक करणाऱ्या 15 जणांवर वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. चार आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात तर अन्य आरोपींचा शोध सुरू. स्थानिक नागरिक.0
0
Report
Advertisement
वाशीम से किन्हीराजा सड़क के काम धीमे, नागरिकों ने गुणवत्ता की तत्काल जाँच की मांग
Washim, Maharashtra:वाशीम : अँकर:वाशिम ते किन्हीराजा रस्त्याचं सुरू असलेले काम अत्यंत संथगतीने आणि निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.कामाची तातडीने स्थळ पाहणी करून तांत्रिक आणि गुणवत्ता तपासणी करावी, अशी मागणी काटा व परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.रस्त्याच्या कामाची किंमत,अंदाजपत्रक, लांबी-रुंदी आणि कामाचा कालावधी दर्शविणारा अधिकृत माहिती फलकही लावण्यात आलेला नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.याचं रस्त्यावर जिल्हाधिकारी कार्यालय,जिल्हा परिषद,पोलीस अधीक्षक कार्यालय,न्यायालय तसेच कॉलेज आहेत.त्यामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक असताना काम संथगतीने सुरू असल्याने अपघाताचा धोका वाढल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तसेच कामात मोठ्या प्रमाणात काळी माती वापरली जात असल्याने, कामाच्या गुणवत्तेची तपासणी करावी अशी मागणी झाली आहे. अवजड वाहनांची वाहतूक आणि सुरक्षा याबद्दलचा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे.कामात अनियमितता किंवा निकृष्ट दर्जा आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.0
0
Report
मनसे ने कुर्ला एल.बी.एस. रोड स्पीड ब्रेकर से गणेश मूर्ति गिरने पर कार्रवाई की मांग
Mumbai, Maharashtra:मुंबईच्या कुर्ला एल.बी.एस. रोड परिसरात गणेशमूर्तीच्या आगमनावेळी घडलेल्या दुर्घटनेची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गंभीर दखल घेतली आहे. एल. वॉर्डमधील प्रभाग क्रमांक १६६ मध्ये खराब आणि धोकादायक अवस्थेतील स्पीड ब्रेकरमुळे गणेशमूर्ती खाली कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर परिसरातील नागरिक आणि गणेशभक्तांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, कालिना विधानसभा यांच्या वतीने एल. वॉर्ड कार्यालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. धोकादायक अवस्थेतील स्पीड ब्रेकरची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, तसेच भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना घडू नयेत यासाठी प्रशासनाने आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली. यावेळी विभाग अध्यक्ष संजय लक्ष्मण अडारकर, उपविभाग अध्यक्ष भरत धाकतोडे, उपविभाग सचिव प्रकाश कर्वे, शाखा सचिव आदर्श जाधव आणि उपशाखा अध्यक्ष रितेश पोन्नल यांच्यासह मनसे पदाधिकारी उपस्थित होते. गणेशभक्तांची श्रद्धा आणि नागरिकांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे.0
0
Report
मराठा आरक्षण के समर्थक Shirur में जोरदार प्रदर्शन, मार्ग जाम
Shirur, Maharashtra:मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला राज्यभरातून मोठा पाठिंबा मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील शिरूर येथे मराठा समाज आणि सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आक्रमक रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे महामार्गावरील دوन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला आणि मराठा आरक्षणाच्या लढ्याला बळ देण्यासाठी शिरूरमधील मराठा बांधव रस्त्यावर उतरले. मराठा आरक्षणाचा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही आणि मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी उपस्थित आंदोलकांनी दिला आहे.0
0
Report
Advertisement
