Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nanded431604

नांदेड न्यायालय ने असद ओवेसी समेत नौ को आचार संहिता भंग मामले में बरी किया

SMSATISH MOHITE
Feb 01, 2026 04:17:23
Nanded, Maharashtra
Anchor - एमआयएमचे अध्यक्ष खासदार असद ओवेसी यांना नांदेडच्या सत्र न्यायालयाने आचार संहिता भंगाच्या गुन्ह्यात निर्दोष मुक्त केले. 2010 साली नांदेड महापालिकेच्या दोन जागांसाठी पोट निवडणुक झाली होती. तेव्हा असद ओवेसी यांनी विना परवानगी रॅली काढून प्रचार केला असा त्यांच्यावर आरोप होता. या प्रकरणी असद ओवेसी यांच्यासह नऊ जणांवर आचार संहितेचा भंग केल्याचा गुन्हा इतवारा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. तब्बल 16 वर्षांनी या खटल्याचा निकाल लागला. या खटल्यात तीन वेळा असद ओवेसी सुनावणीसाठी नांदेड न्यायालयात हजर झाले होते. मागील सात जानेवारी रोजी असद ओवेसी यांचा जबाब न्यायालयाने नोंदवून घेतला होता. दरम्यान काल या खटल्याचा अंतिम निकाल लागला. असद ओवेसी यांच्या सह सर्व नऊ जनांना दोष सिद्ध न झाल्याने सर्व आरोपीना निर्दोष मुक्त करण्यात आले.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PNPratap Naik1
Mar 14, 2026 04:36:07
Kolhapur, Maharashtra: करवीर निवासिनी आई अंबाबाईचे मंदिर गाभारा संवर्धनाचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे अंबाबाई देवीच्या भक्तांना देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन करता येणार नाही. मंदिरात सध्या पुरातत्व विभागाच्या वतीने मंदिर संवर्धन आणि देखभाल दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पण बाहेरून येणाऱ्या भक्तांना देवीचे दर्शन करता यावे यासाठी अंबाबाई देवीची उत्सव मूर्ती आणि तत्व कलशाचे दर्शन घेण्याची व्यवस्था मंदिरात करण्यात आली आहे. ही संवर्धन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 18 मार्च पासून अंबाबाई देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन पुन्हा सुरू होणार आहे. याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी.
161
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Mar 14, 2026 04:34:36
Virar, Maharashtra:लोकेशन : विरार वसई महानगरपालिकेकडून क्रिकेटपटू आयुष म्हात्रे यांचा सत्कार आयुषच्या कामगिरीने वसईकरांची मान उंचावली नुकत्याच पार पडलेल्या १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा कर्णधार आयुष म्हात्रे याचा शुक्रवारी महापालिका मुख्यालयात विशेष सत्कार करण्यात आला. आयुष हा नालासोपाऱ्यातील नाळे गावात राहणारा आहे. आयुष म्हात्रे यांनी क्रिकेट विश्वचषक जिंकून देशासोबत वसई-विरार शहराचेही नाव उज्वल केले आहे. विश्वचषक स्पर्धेत संपूर्ण भारतीय संघाने दिलेले योगदान अतिशय उल्लेखनीय असून संघाचा कर्णधार म्हणून आयुष म्हात्रे यांचे योगदान यात अधिक महत्वाचे आहे. आयुष म्हात्रे यांच्या या योगदानाबद्दल वसई विरार शहर महापालिकेने दि.२० फेब्रुवारी २०२६ रोजीच्या महासभेत आयुष म्हात्रे यांचा अभिनंदनाचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला होता. क्रिकेटपटू आयुष म्हात्रे यांच्या कर्तुत्वास सन्मानित करण्यासाठी शुक्रवारी महापालिकेने त्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता. यावेळी महापौर अजीव पाटील, उपमहापौर मार्शल लोपीस, माजी आमदार क्षितीज ठाकूर, विरोधीपक्ष नेते मनोज पाटील, स्थायी समिती सभापती प्रवीण शेट्टी, सभागृह नेते प्रफुल्ल साने व महापालिकचे अधिकारी उपस्थित होते.
166
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Mar 14, 2026 04:31:55
Amravati, Maharashtra:अमरावती जिल्ह्यातील धामणगाव गढी गाव परिसरात अस्वलीचा मुक्त संचार आढळून आला आहे. पहाटेच्या sुमारास गावातील रस्त्यांवर अस्वली फिरताना दिसली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अस्वलीचा वावर गावात दिसून आल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री व पहाटेच्या वेळी बाहेर पडताना ग्रामस्थांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. दरम्यान वनविभागाने तातडीने लक्ष देऊन या वन्य प्राण्याला पकडून सुरक्षितपणे जंगलात सोडावे अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच गावात गस्त वाढवून नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी अशीही मागणी करण्यात आली आहे.
93
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 14, 2026 04:15:54
Akola, Maharashtra:अकोला शहर के गांधी मार्ग पर बिंदी घर नामक दुकान समेत चार दुकानों में भीषण आग लगने की घटना सामने आई है। कल मध्यरात्रि के आसपास यह आग लगी और इन चारों दुकानों के पूरी तरह जलकर राख हो गए हैं। इस घटना के बाद नगरपालिका प्रशासन ने साहसिक कदम उठाते हुए विवादास्पद दुकान समेत कुछ अतिक्रमित दुकानों को हटाने की मुहिम चलाई थी। लेकिन कुछ दुकानें अब भी शेष थीं। इसके दौरान कल रात अचानक इन दुकानों को भीषण आग लग गई। प्राथमिक जानकारी के अनुसार शॉर्ट सर्किट के कारण आग लगी। आग की सूचना मिलते ही नगरपालिका अग्निशमन दल की गाड़ियाँ तुरंत घटनास्थल पर पहुंचीं और आग पर काबू पाया गया। हालांकि तब तक चारों दुकानें जलकर राख हो चुकी थीं और संबंधित व्यवसायियों को भारी आर्थिक नुकसान हुआ है।
242
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 14, 2026 04:04:48
Washim, Maharashtra:हिंगणवाडी येथे विद्युत वाहिनीच्या तारांमध्ये घर्षण होऊन पडलेल्या ठिणगीमुळे भीषण आग लागून सुमारे६ एकर गहू जळून खाक झाला.या घटनेत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून वीज वितरणच्या हलगर्जीपणाचा फटका पुन्हा एकदा शेतकऱ्यांना बसल्याचे समोर आले आहे.हिंगणवाडी येथील शेतकरी रमेश साबणकर,सतीश साबाणकर आणि शिवदास साबाणकर या तिन्ही भावांनी सुमारे सहा एकरमध्ये गहू पेरणी केली होती.मात्र जीर्ण झालेल्या विद्युत तारांमध्ये घर्षण होऊन पडलेल्या ठिणगीमुळे संपूर्ण पीक आगीत जळून गेले.या घटनेमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून यापूर्वीही जिल्ह्यातील सावरगाव,केकत उमरा आणि आमगाव येथे अशाच प्रकारच्या आगीच्या घटना घडल्या होत्या.
152
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 14, 2026 03:49:12
119
comment0
Report
VNVishal Nagesh More
Mar 14, 2026 03:48:20
Malegaon, Maharashtra:आखाती देशांच्या युद्धामुळे घरगुती सिलेंडरचा तुटवडा, व्यावसायिक सिलेंडर बंद यामुळे अनेक व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर असल्याने त्याला पर्याय म्हणून नागरिक कोळश्याकडे वळालेले आहेत. पर्यायाने कोळशाच्या मागणीत आता वाढ झाली आहे. इराण अमेरिका इस्राईल युद्धाचा परिणाम आता संपूर्ण जगावर दिसून आला आहे. काही ठिकाणी घरगुती गॅस, CNG आदींचा तुटवडा जाणवू लागला. आता पोट भरण्यासाठी व्यावसायिक सिलेंडरच्या ऐवजी चूल पेटवण्यासाठी, कपडे इस्त्री करण्यासाठी आदींसाठी आता कोळशाची वापर सुरू झाला असून त्याची मागणी वाढल्याने कोळशाचा दरात देखील 5 ते 10 रुपयांनी वाढ होऊन ग्राहकांना याचा फटका बसू लागला आहे. नेहमीपेक्षा आता नवीन ग्राहक कोळसा खरेदी करण्यासाठी येत आहेत तर काही नागरिकांना कोळसा कुठे मिळतो देखील माहीत नसल्याने ते त्याचा शोध घेत आहेत. भविष्यात कोळशाचा देखील तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात असून आता मात्र कोळसा वापरण्यास नागरिकांचा कल वाढला असून त्याची मागणी वाढली आहे. एकंदरीत बघितले तर युद्धाची झळ मोठ्या प्रमाणावर सामान्य नागरिकांपर्यंत पोहचू लागल्याने मोठे आर्थिक संकट देखील उभा राहून जीवनमान खालावण्याची चित्रे दिसू लागली आहेत. लवकरच यावर तोडगा काढावा अशी अनेकांनी आशा व्यक्त केली आहे.
115
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Mar 14, 2026 03:48:00
Ahilyanagar, Maharashtra:अमेरिका- इस्राईल और इराण यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने व्यावसायिक ‘एलपीजी सिलिंडर’ पुरवठ्यावर निर्बंध आणले आहेत... अहिल्यानगर शहरातील हॉटेल व्यवसायिकांची व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने चांगलीच तारांबळ उडत आहे. शहरातील अनेक हॉटेल व्यावसायिक हतबल झाले असून आता हॉटेलमध्ये विटांची चूल तयार त्यावर स्वयंपाक करण्यास सुरुवात केली आहे.. ग्राहक आणि व्यवसाय टिकवण्यासाठी हॉटेल व्यावसायिकांची धडपड सुरू असल्याचे पहायला मिळत आहे... नगर शहरातील सावेडी परिसरात असलेल्या जय आनंद या खानावळ चालकाने व्यवसाय टिकवण्यासाठी चुलीवर स्वयंपाक करण्यास सुरुवात केली आहे... सामान्य कष्टकऱ्यांचं हॉटेल अशी ओळख असलेल्या जय हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक आणि शहरातून जाणारे प्रवासी जेवण करतात
98
comment0
Report
Advertisement
Back to top