Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nagpur440001

नागपुर में गैस एजेंसी के सामने सिलेंडर के लिए भीड़, बुकिंग में देरी से नाराज

AKAMAR KANE
Mar 28, 2026 12:30:38
Nagpur, Maharashtra
नागपूर जिल्ह्यातील वानाडोंगरी परिसरात एचपी कंपनीशी संबंधित गॅस एजन्सी समोर मोठ्या संख्येने सिलेंडर घेण्यासाठी पहाटेपासूनच लोकांची गर्दी होती.. सिलेंडरची रांग अर्धा किमी लांबपर्यंत गेली होती.. दुपारी ऊन वाढल्यावरही गॅस सिलेंडरचा पुरवठा होत नाही, यामुळे नाराज झालेल्या लोकांनी काही वेळासाठी गॅस एजन्सी समोरचा रस्ता रोखून धरत घोषणाबाजी केली.. ज्यांचे सिलेंडर कनेक्शन बद्दलचे केवायसी झालेले नाही, अशा ग्राहकांना बुकिंग होऊन सिलेंडर मिळण्यासाठी अडचणी येत आहेत, उशीर होत आहे.. त्यामुळे ही अनेक गॅस एजन्सी समोर गर्दी पाहायला मिळत आहे, लोकांचा रोष दिसत आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
LBLAILESH BARGAJE
Mar 28, 2026 13:31:03
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पावरील चर्चेच्या महासभेत 'नो पार्किंग' दंड वसुली वरून नगरसेवकांनी गोंधळ घातला... नो पार्किंग झोन मधील वाहनांवर कारवाई करण्यासाठी पालिकेकडून दंड वसुलीसाठी खाजगी संस्थेला ठेका देण्यात आला आहे... मात्र संबंधित संस्थेकडून वसूल केली जात असलेली दंडाची रक्कम जास्त आहे आणि वसूल करणारे कर्मचारी कारवाईदरम्यान वाहनचालकांसोबत असभ्य वर्तवणूक करतात , असा आरोप काही नगरसेवकांनी केला आहे...सोबतच मनपाने ठरवून दिलेल्या ठिकाणी कारवाई न करता इतर ठिकाणीच कारवाई करतात...संबंधित संस्थेकडून मनपाला एक लाख रुपये मिळतात, मात्र प्रत्यक्षात संबंधित संस्था वाहन चालकांकडून अवाजवी रक्कम वसूल करतात, संबंधित संस्थेचे वाहनचालक अनधिकृत पणे सायरन वाजवत टोइंग व्हॅन चालवतात असा देखील आरोप होत आहे... त्यामुळे संबंधित संस्थेचा ठेका रद्द करावा अशी मागणी नगरसेवकांकडून होत आहे... रुग्णालय , धार्मिक स्थळ, शैक्षणिक संस्था या ठेक्यातून वगळाव्यात अशी देखील मागणी नगरसेवकांकडून होत आहे.
1024
comment0
Report
SNSWATI NAIK
Mar 28, 2026 13:04:54
Navi Mumbai, Maharashtra:Belapur स्थित व्यवसायी गुरुनाथ चिंचकर यांनी केलेल्या आत्महत्या प्रकरणाला आता नाटयमय वळण आले आहे. याप्रकरणी NRIA सागरी पोलिसांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) आणि Navi Mumbaiतील अमली पदार्थ विरोधी पथकाच्या (ANC) बड्या अधिकाऱ्यांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, यात 10 ते 15 कोटी रुपयांच्या खंडणीचा आणि कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याच्या धमक्यांचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या महत्त्वाच्या तपास यंत्रणांच्या अधिकाऱयानवरच गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल झाल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. मृत गुरुनाथ चिंचकर यांच्या पत्नी डॉ. किरण चिंचकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 2 फेब्रुवारी 2025 रोजी एनसीबीचे अधिकारी आकाश मलिक आणि त्यांच्या 15 ते 20 जणांच्या पथकाने कोणतीही पूर्वसूचना न देता चिंचकर यांच्या घरावर छापा टाकला. त्यावेळी घरात कोणीही नसताना घरकामगाराला मारहाण करण्यात आली आणि घरातील सीसीटीव्हीचा डीव्हीआर, 2 लाख रुपये रोख, महागडी घडयाळे व महत्त्वाची कागदपत्रे कोणत्याही अधिकृत पंचनाम्याशिवाय पळवून नेल्याचा आरोप झाला. एनसीबीचे विभागीय संचालक अमित घावटे यांनी चिंचकर यांच्या मुलांना खोटया अमली पदार्थांच्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देऊन 10 ते 15 कोटी रुपयांची मागणी केल्याचा दावा डॉ. चिंचकर यांनी केला आहे. पैसे दिले नाही तर संपूर्ण कुटुubalाला जेलमध्ये टाकू आणि देशोधडीला लावू, अशी भीती त्यांना सतत घातली जात होती. याच काळात नवी मुंबई एएनसीचे पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांनीही एका गुह्यासंदर्भात चिंचकर यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना शिवीगाळ करत पैशांची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. गुरुनाथ चिंचकर यांना वारंवार एनसीबी कार्यालयात बोलावून दिवसभर ताटकळत ठेवले जायचे. या मानसिक छळाला आणि खंडणीच्या दबावाला कंटाळून 25 एप्रिल 2025 रोजी सकाळी चिंचकर यांनी आपल्या कार्यालयात स्वत:वर गोळी झाडून जीवनयात्रा संपवली. मृतदेहाजवळ सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी छळ करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांची नावे लिहून ठेवली होती. चौकट: पोलिसांच्या दाव्यानुसार, मृत गुरुनाथ चिंचकर यांचा मुलगा नवीन चिंचकर हा आंतरराष्ट्रीय ड्रग तस्कर असून तो थायलंडमध्ये हायड्रो गांजाचा पुरवठा करत होता. नवीन आणि धीरज चिंचकर हे दोघेही एनसीबी मुंबईच्या गुन्ह्यात वॉन्टेड आरोपी होते. नेरुळ येथील NDPS गुह्यातही त्यांच्या नाव आल्याने नवीन आणि धिरज हे दोघे भाऊ फरार होते. त्यामुळे पोलिसांकडुन गुरुनाथ चिंचकर यांना चौकशीसाठी बोलावण्यात येत होते. त्यामुळे आलेल्या नैराश्यातून गुरुनाथ चिंचकर यांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
988
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 28, 2026 13:04:34
Akola, Maharashtra:अकोळ्यात एक धक्कादायक घटना घडली है जिसमें आर्मी जवान का उपचार के दौरान निधन हो गया। छुट्टी पर घर लौटे जवान पर कुछ दिनों पहले उनके ही मित्रों ने खतरनाक हमला किया था। इलाज के दौरान जवान की मौत हो गई। अकोला शहर के पुराने शहर थाना क्षेत्र में यह घटना घटी। आर्मी जवान सुशील दिलीप तेलगोटे छुट्टी पर अकोला आए थे। मिली जानकारी के अनुसार उनके कुछ दोस्तों ने होटल में भोजन के लिए बुलाया था, लेकिन खाने के दौरान हुए विवाद के कारण उन पर हमला किया गया। वह गंभीर रूप से घायल हो गए जिन्हें तात्कालिक उपचार के लिए एक निजी अस्पताल में दाखिल कराया गया था, पर उनकी स्थिति और भी गम्भीर हो गई और इलाज के दौरान उनकी मौत हो गई। इस घटना से क्षेत्र में भारी हड़कंप मच गया तथा परिवार के सदस्यों में शोक की लहर दौड़ पड़ी है। पुलिस ने इस मामले में चार आरोपियों को गिरफ्तार किया है और हत्या के पीछे का कारण तथा आगे की कार्रवाइयों की जांच जारी है।
979
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 28, 2026 12:02:03
Shirdi, Maharashtra:भोंदूबाबा अशोक खरातचा पुन्हा नवीन कारनामा समोर....महिला अत्याचार , अनाधिकृत मालमत्तेपाठोपाठ अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील व्यापाऱ्याने केला फसवणूकीचा गुन्हा दाखल...नेवासा येथील व्यापा-याची आर्थिक लूट केल्या प्रकरणी नाशिक येथील सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल...रत्न बसवून देण्याचे सांगत व्यापा-याकडील २० ग्रामच्या सोन्याच्या अंगठ्या देखील घेतल्या काढून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघड...डिसेंबर २०२२ मध्ये खरात याच्या नाशिक येथील ओकस प्रॉपर्टी डेव्हलपर्स कार्यालयात झाली होती भेट...खरात विरोधात गुन्हा दाखल झाल्याचे समजताच व्यापाऱ्याने केली रत्न आणि अंगठयांची तपासणी...तपासणीत चक्क रत्न आणि सोन्याच्या अंगठया निघाल्या बनवट...सुमारे साडे ५ लाखांची फसवणूक झाल्याचे व्यापाऱ्यांच्या लक्षात....व्यापारी राजेंद्र भागवतांनी पोलिसात धाव घेत केला खरात विरोधात गुन्हा दाखल...भोंदू अशोक खरात विरोधात सरकार वाडा पोलीस ठाणे नाशिक येथे गुन्हा दाखल...आर्थिक फसवणूक झालेले व्यापारी राजेंद्र भागवत यांची माध्यमांना माहिती....
1083
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Mar 28, 2026 12:01:43
1082
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 28, 2026 11:45:27
Akola, Maharashtra:Anchor : अशोक खरात प्रकरणाचे धागेदोरे दिवसेंदिवस अधिक गंभीर होताना दिसत आहेत. या प्रकरणामुळे पक्षाच्या प्रतिमेला मोठा धक्का लागू शकतो, अशी शक्यता निर्माण झाल्यानंतर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी तात्काळ पाऊल उचलत रूपाली चाकणकर यांचा राजीनामा घेतला असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.दरम्यान राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीच चाकणकर यांना देवगिरी येथे बोलावून प्रथम महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा स्वीकारला. त्यानंतर सर्वत्र टीका होत असताना महिला प्रदेशाध्यक्ष पदाचाही राजीनामा घेण्यात आला.हा निर्णय पूर्णपणे पक्षहिताचा असल्याचे स्पष्टीकरण अमोल मिटकरी यांनी दिले आहे. तसेच सुनेत्राताईंचा निर्णय आम्ही सर्वांनी मान्य केला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान राज्य महिला आयोगातील काही पदे भरणे अत्यावश्यक होते, मात्र ती अद्याप भरली गेली नाहीत, असेही अमोल मिटकरी यांनी सांगितले. सध्या रुपाली चाकणकर या त्या पदावर नसल्यामुळे त्यांच्यावरील आरोपांवर बोलणे योग्य ठरणार नाही, असे सांगत त्यांनी या प्रकरणावर अधिक प्रतिक्रिया देणे टाळले आहे.
961
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Mar 28, 2026 11:18:33
Bhandara, Maharashtra:भंडाराच्या साकोली तालुक्यातील उमरझरी येथील शेत शिवार परिसरात आज सकाळी साडेनऊ वाजताच्या दरम्यान माया रामकृष्ण सोनवणे (वय 60) या शेतामध्ये मिरची तोडण्यासाठी गेले असता. दडून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. दरम्यान त्यांचे पती रामकृष्ण सोनवणे यांनी आरडाओरड करत हातात असलेली थैली वाघाला फेकून मारली. सुदैवाने तात्काळ वाघ तिथून पळून गेला. परिसरातील नागरिक व भाजप महिला जिल्हाध्यक्ष माहेश्वरी नेवारे यांच्या मदतीने तत्काळ जखमी महिलेला उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र सदर महिला गंभीर जखमी असल्याने त्यांना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार अर्थ पाठवण्यात आले असून तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. चार ते पाच दिवसा आधीच एका इसमावर अशाच प्रकारे वाघाने हल्ला चढवून ठार केले होते. आठवडाभरातील ही दुसरी घटना असून याच परिसरात चार दिवसाआधी वाघाने एकाचा बळी घेतलाय. वन विभागाने जखमी महिलेच्या कुटुंबियांना आर्थिक सहकार्य करत यापुढे अशा घटना होणार नाही यासाठी उपाययोजना कराव्यात.
1007
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 28, 2026 10:46:05
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर में पुलिस कॉन्स्टेबल के डराने-धमकाने के बाद उसकी ही बेटी ने अपने पिता को विष देकर हत्या की, यह चौंकाने वाला मामला तीन साल बाद सामने आया है. मयत पुलिस कर्मी की आरोपी बेटी भी चंद्रपूर पुलिस विभाग में कांस्टेबल है और ससुर को नौकरी से बर्खास्त किया गया है. मयत पिता के प्रेमप्रकरण के विरोध के कारण बेटी ने विष देकर पिता की हत्या की. 25 अप्रैल 2023 को जयंत बल्लावार (45) ड्यूटी पर थे, जिल्हाधिकारी कार्यालय के प्रशासकीय भवन में चक्कर आने से मृत्यु हो गई. उस समय पुलिस ने केवल मर्ग बनवाया. तीन दिन पहले मृतक के दामाद आशिष शेडमाके ने पुलिस को अपने सभी अपराध कबूल कर बताए कि उसकी पत्नी आर्या बल्लावार ने पिता को विष दिया. आर्या ने मिल्कशेक में विष मिलाकर पिलाया. जावय को ड्यूटी पर प्रशासकीय भवन में जाते समय मृत्यु हो गई. 2022 से प्रेम संबंध में थे आर्या और आशिष; जयंत बल्लावार ने विरोध किया. आर्या ने अपने मामा चैतन्य गेडाम से विष खरीदा. 5000 रुपये में विष लिया गया. शादी के बाद दोनों के रिश्ते में कलह. आशिष को ट्रेनिंग के दौरान बडतर्फ किया गया. ट्रेनिंग के बाद आर्या सास के घर नहीं गई. नाराज आशिष ने सब कुछ उघाड़ दिया. रामनगर पुलिस ने आरोपी महिला पुलिस अधिकारी आर्या बल्लावार के अलावा नवरा आशिष शेडमाके, चैतन्य गेडाम और विष खरीदने वाले एक नाबालिग आरोपी को गिरफ्तार किया है. अदालत ने सभी को पुलिस कस्टडी दी है. इस प्रकरण ने पुलिस तंत्र को भी चौंका दिया है.
1079
comment0
Report
VNVishal Nagesh More
Mar 28, 2026 10:38:33
1099
comment0
Report
SMSATISH MOHITE
Mar 28, 2026 10:18:48
Nanded, Maharashtra:नांदेड जिल्ह्यात आजपासून 11 एप्रिल पर्यंत जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश लागू करण्यात आली. 28 मार्चच्या सकाळी 6 वाजेपासून ते 11 एप्रिल 2026 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी नियमित आदेशाप्रमाणे हे आदेश लागू केले आहेत. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींना सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास गर्दी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही. अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीशेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना देण्यात आले आहेत.
1080
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Mar 28, 2026 10:10:24
1035
comment0
Report
Advertisement
Back to top