Back
वीज तारों के स्पर्श से गेहूं की फसल जल कर राख, 1.5 एकड़ नुकसान
NMNITESH MAHAJAN
Mar 15, 2026 01:45:27
Jalna, Maharashtra
छत्रपती संभाजीनगर :वीज तारांच्या घर्षणामुळे गहू पिकाला भीषण आग,दीड एकर गहू पीक गळून खाक
अँकर :छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील कोळी बोडखा शिवारात वीज तारेच्या घर्षणामुळे भीषण आग लागून शेतकऱ्याचे उभे गहू पीक जळून खाक झाले आहे. काढणीच्या तोंडावर आलेले तब्बल दीड एकर गहू या आगीत राख झाल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. केकत जळगाव येथील शेतकरी कारभारी भिमराव बढे यांची कोळी बोडखा शिवारात शेती असून त्यातील गव्हाच्या शेतात दुपारी तीन वाजेच्या सुमारास वीज तारेचा घर्षण होऊन ठिणगी पडली आणि काही क्षणातच शेतात आग भडकली. परिसरातील शेतकरी तात्काळ घटनास्थळी धावून येत आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत संपूर्ण पीक जळून खाक झाले होते. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून संबंधित विभागाने तात्काळ पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी वीज तारा आणि यंत्रणेची दुरुस्ती करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.
बाईट :शेतकरी
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
TTTUSHAR TAPASE
FollowMar 15, 2026 03:02:3976
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 15, 2026 03:02:2061
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 15, 2026 02:03:51215
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 15, 2026 02:03:34158
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 15, 2026 02:03:07123
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 15, 2026 02:02:55133
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 15, 2026 02:02:3777
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 15, 2026 01:46:14261
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 14, 2026 17:16:30192
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 14, 2026 17:02:50214
Report
MNMAYUR NIKAM
FollowMar 14, 2026 17:02:18161
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 14, 2026 16:32:38179
Report
YKYOGESH KHARE
FollowMar 14, 2026 16:02:36189
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 14, 2026 14:49:20153
Report