Back
सोशल मीडिया धमकियों से जालना के युवक ने दी आत्महत्या, माँगा कड़ी कार्रवाई
NMNITESH MAHAJAN
Nov 08, 2025 08:16:14
Jalna, Maharashtra
जालना : जालन्यातील तरुण सोशल मीडियाचा बळी ठरलाय, सततच्या धमक्यांना कंटाळून तरुणाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या (पॅकेज) आरोपींवर कठोर कारवाई करण्याची कुटुंबियांची मागणी अँकर : सोशल मीडियावर लघुशंका करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर माफी मागूनही फोनवर सतत जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्यानं जीवन जगणं असह्य झालं आणि तरुणाने थेट विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.जालन्यात ही घटना घडलीय.त्यामुळे हा तरुण सोशल मीडियाचा बळी ठरलाय. काय आहे हे सगळं प्रकरण जाणून घेऊ या स्पेशल रिपोर्टमधून. व्हिओ:१:जालन्यातील ढोकमळ तांडा येथील रहिवासी असलेल्या 28 वर्षाचा महेश आडे हा तरुण सोशल मीडियाचा बळी ठरलाय. त्यामुळे व्हायरल व्हिडिओनंतर सतत जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्यानं या धमक्यांच्या वेदना असह्य झाल्यानं त्याने थेट गावाकडच्या विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली.या घटनेनंतर महेशचं कुटुुंब हतबल झालंय. महेश आडेचं व्हायरल व्हिडीओ प्रकरण नेमकं है तरी काय.? काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर छत्रपती संभाजीनगर असं नाव लिहिलेल्या बोर्डखाली दोन तरुण लघुशंका करतानाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला होता. लघुशंका करताना हे दोन्हीही तरुण नशेत असल्याचं तेव्हा समोर आलं होतं. या व्हायरल व्हिडिओत लघुशंका करणाऱ्या तरुणांची नावं, त्यांच्या पत्ते आणि फोन नंबर देखील टाकण्यात आले होते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या दोन्हीही तरुणांनी माफीनाम्याचा व्हिडिओ तयार करून व्हायरल केला. मात्र या तरुणांनी माफी मागूनही फोनवर तसेच इन्स्टाग्रामवर जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. अशाच धमक्या महेश आडे याला देखील येत होत्या. त्यामुळे या धमक्यांना घाबरून महेशला त्याच्या कुटुंबियांनी छत्रपती संभाजीनगरहुन गावाकडे बोलावून घेतलं. हा सर्व प्रकार त्याने कुटुंबियांना सांगितला. पण तरीही महेशला फोनवर तसेच इन्स्टाग्राम वरून धमक्या मिळणं सुरूच राहीलं .त्यामुळे आता जगणं अवघड झालंय.हे सगळं असह्य होतंय. त्यामुळे मि आत्महत्या करीन अशी खंत महेशने त्याच्या मित्रांजवळ बोलून दाखवली. अखेर महेश आडे या 28 वर्षाच्या तरुणानं गावाकडे असताना थेट विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.दरम्यान माफी मागूनही महेशला जीवे मारण्याच्या धमक्या देणाऱ्यांवर अटकेच्या कारवाईची मागणी महेशच्या काकांनी केलीय बाईट : ज्ञानेश्वर आडे,मयत महेशचे काका (गळ्यात रुमाल आहे) व्हिओ :२:दरम्यान महेशच्या आत्महत्येप्रकरणी जालन्यातील आष्टी पोलीस ठाण्यात 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आणखी आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य पाहता आरोपींना अटक करण्याची तयारी केलीय.सोशल मीडियावर पोस्ट करताना समोरच्या व्यक्तीच्या भावनेची कदर करण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय. तसेच सोशल मीडियावरून कुणालाही शिवीगाळ करू नये असंही आवाहन पोलिसांनी केलंय.पोलीस सध्या या प्रकरणात आरोपी निष्पन्न करण्याच्या कामाला लागले असून सध्या या प्रकरणी तपास सुरू आहे. बाईट :गणेश सुरवसे,सहाय्यक पोलीस निरीक्षक,आष्टी पोलीस ठाणे व्हिओ :3:महेश आडे याने आत्महत्या केल्यानंतर ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी महेश आडे याच्या कुटुुंबियांची भेट घेत कुटुंबातील सदस्यांचं सांत्वन करत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली.आरोपींना अटक न केल्यास मोर्चा काढण्याचा ईशारा वाघमारे यांनी दिला आहे. बाईट : नवनाथ वाघमारे,नेते,ओबीसी व्हिओ :4:अवघ्या काही दिवसांपूर्वीच हा व्हायरल व्हिडीओचा प्रकार समोर आला होता.पण माफी मागूनही धमक्यांचा ससेमिरा थांबला नाही.अखेरीस महेश आडे सतत मिळणाऱ्या धमक्यांमुळे जेरीस आला आणि त्याने मृत्यूला जवळ केलं.महेशच्या जग सोडून जाण्यानं त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरलीय.त्यामुळे सोशल मीडियावरील धमक्यांचं सत्र त्याच्यासाठी जीवघेणं ठरलं असंच तरी पोलिसांकडून आता आरोपींवर काय कारवाई केली जाते याकडे कुटुंबियांचं लक्ष लागलंय । नितेश महाजन झी-२४ तास,जालना
6
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 08, 2025 10:47:120
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 08, 2025 10:46:400
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowNov 08, 2025 10:46:200
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 08, 2025 10:30:470
Report
APAMOL PEDNEKAR
FollowNov 08, 2025 10:21:590
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 08, 2025 10:06:350
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 08, 2025 10:06:170
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 08, 2025 09:37:161
Report
APAMOL PEDNEKAR
FollowNov 08, 2025 09:37:003
Report
SKShubham Koli
FollowNov 08, 2025 09:35:212
Report
UPUmesh Parab
FollowNov 08, 2025 09:33:493
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 08, 2025 09:33:303
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 08, 2025 09:25:511
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 08, 2025 09:25:294
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 08, 2025 09:04:552
Report