Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Jalna431213

जालना के मंठा शहर में घरेलू गैस सिलिंडर के अवैध उपयोग पर छापामार कार्रवाई; 8 सिलिंडर जप्त

NMNITESH MAHAJAN
Mar 21, 2026 02:50:04
Jalna, Maharashtra
जालना | ​मंठा शहर आणि तळणी परिसरात भरारी पथकाची कारवाई; 8 गॅस सिलिंडर जप्त ​आतापर्यंत मोहिमेत एकूण 21 सिलिंडर जप्त; हॉटेल व्यावसायिकांचे धाबे दणाणले ​अँकर | जालन्यातील मंठा शहर आणि परिसरातील विविध हॉटेलमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररीत्या व्यावसायिक वापर होत असल्याचे उघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर पुरवठा विभागाने केलेल्या धडक कारवाईत 8 घरगुती गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, प्रशासनाने सुरू केलेल्या या मोहिमेअंतर्गत आजवर मंठा शहर आणि परिसरातून एकूण 21 सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत. ​घरगुती गॅसचा व्यावसायिक कारणांसाठी वापर करणाऱ्यांवर यापुढेही कडक कारवाई सुरूच राहील,असा ईशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAABHISHEK ADEPPA
Mar 21, 2026 04:50:06
Solapur, Maharashtra:सोलापुर ब्रेकिंग – मंत्री आशिष शेलार ने अवकाळीग्रस्त भाग का निरीक्षण किया; मंत्रियों को देखकर किसानों के आंसू छलक पड़े। जानकारी तकनीकी शिक्षा मंत्री आशिष शेलार ने उत्तर सोलापूर तालुक के नुकसानग्रस्त भाग की निरीक्षण की। उत्तर सोलापूर तालुक के पडसाळी गाँव के द्राक्ष उत्पादक किसानों की दो दिनों पहले हुई बारिश के कारण द्राक्ष की बगिया बर्बाद हो गई। मंत्री आशिष शेलार ने किसान अंकुश शिरसाट के साड़े तीन एकड़ क्षेत्र की भुईसपाट द्राक्ष बाग का निरीक्षण किया। मंत्री आशिष शेलार ने नुकसानग्रस्त किसानों की व्यथा जान ली। मंत्री के समक्ष किसानों को आंसुओं का ढलान आया।
853
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 21, 2026 04:47:58
Kolhapur, Maharashtra:अलमट्टी धरणाची उंची वाढल्यास कृष्णा, वारणा आणि पंचगंगा नदीसह सर्व उपनद्या गाळाने खचाखच भरून जाण्याची भीती रुरकी समितीच्या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. तसे झाल्यास महापुराची पातळी आणखी 15 ते 16 फुटांनी वाढून महापूर प्रदीर्घकाळ कोल्हापूर आणि सांगलीसह नदीकाठच्या गावांमध्ये राहू शकतो, परिणामी गावांचे अस्तित्व देखील धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या अलमट्टी धरण 519 मीटरने भरल्यास त्याच्या बॅकवॉटरच्या प्रभावामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांची पाणी पातळी साडेआठ ते दह फुटांनी वाढ होते. जर धरण 524 मीटरने भरल्यास धरणाचे बॅक वॉटर थेट 263 किलोमीटर अंतरावर असलेल्या सांगली पर्यंत येते. त्यामुळे आणखी अलमट्टी धरणाची उंची वाढल्यास पाण्याचा বॅकवॉটার वाढून नदीपात्रातील गाळ आणखी वाढायला सुरुवात होईल, त्यामुळे रुरकी समितीने यावर निष्कर्ष काढत अलमट्टी धरणाची उंची वाढल्यास सांगली कोल्हापूर जिल्ह्यासाठी ही धोक्याची घंटा असल्याचं म्हटलय.
885
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Mar 21, 2026 03:49:41
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज... उसाच्या शेतात गांजाची अवैध लागवड उघड... ५ लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त, आरोपी अटकेत... लातूर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई... लातूर जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेला मोठं यश मिळालं आहे... स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत शेतात गांजाची अवैध लागवड करणाऱ्या शेतकऱ्याला अटक केली आहे... लातूर तालुक्यातील गोंदेगाव येथील राजकुमार देशमुख यांनी स्वतःच्या शेतात उसाच्या पिकामध्ये गांजाची लागवड केल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती... या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत छापा टाकला... आणि या कारवाईत तब्बल १०८ गांजाच्या झाडे आढळून आली... जप्त करण्यात आलेल्या गांजाची अंदाजे किंमत ५ लाख २२ हजार ७५ रुपये इतकी असून संपूर्ण मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे... या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी आता अटक केली आहे...
1009
comment0
Report
SMSATISH MOHITE
Mar 21, 2026 03:49:29
Nanded, Maharashtra:नांदेड जिल्ह्यातील किनवट मधील शासनाच्या कापूस खरेदी केंद्रावर ग्रेडरचा मनमानी कारभार सुरू असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. शेतकऱ्यांनी आणलेल्या कपाशीतून क्विंटल मागे सात ते आठ किलो कट्टी ग्रेडर काढून घेत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शेजारील तेलंगणा राज्यातून आलेला कमी दर्जाचा कापूस या खरेदी केंद्रावर खरेदी केला जातोय. तसेच व्यापाऱ्याचा कापूस देखील अनेक शेतकऱ्यांच्या नावे खरेदी करण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत. या कापूस खरेदी केंद्रावरील काळाबाजार थांबवावा, संबंधित ग्रेडरची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.
928
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Mar 21, 2026 03:34:41
Amravati, Maharashtra:जिल्हा सामान्य रुग्णालयात धक्कादायक प्रकार; अपघात कक्षात भटक्या कुत्र्यांचा वावर, रुग्ण सुरक्षेवर प्रश्नचिन्ह अँकर :- शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालय येथील अपघात कक्षात भटक्या कुत्र्यांचा मुक्तपणे वावर होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकारामुळे रुग्णांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून रुग्णालय प्रशासनाच्या व्यवस्थेवरही टीका होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा रुग्णालयातील अपघातकक्ष २४ तास कार्यरत असतो. येथे अपघातग्रस्त, गंभीर अवस्थेतील तसेच विषप्राशन केलेले रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. मात्र अशा संवेदनशील विभागातच कुत्रे बेधडक फिरताना दिसत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. गुरुवारी दुपारी काही रुग्णांवर उपचार सुरू असतानाच एक भटका कुत्रा बेडजवळ फिरताना दिसला. यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. विशेषतः जखमी रुग्णांसाठी अशा अस्वच्छ वातावरणामुळे संसर्गाचा धोका अधिक वाढू शकतो. स्थानिक नागरिकांच्या मते, रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर नियंत्रण नसल्याने भटकी जनावरे सहज आत येतात. तसेच स्वच्छतेच्या बाबतीतही गंभीर त्रुटी असल्याचे त्यांनी सांगितले. मागील काही दिवसांपासून अपघात कक्षात कुत्र्यांचा वावर नियमितपणे दिसत असल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. दरम्यान या संपूर्ण प्रकाराची दखल घेऊन रुग्णालय प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे. अपघात कक्षासह संपूर्ण रुग्णालय परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करणे, स्वच्छता राखणे आणि भटक्या प्राण्यांचा प्रवेश रोखणे अत्यावश्यक असल्याचे नागरिकांचे मत आहे.
1098
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 21, 2026 03:34:30
993
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 21, 2026 03:34:20
1023
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 21, 2026 03:33:53
Washim, Maharashtra:अँकर वाशीम जिल्ह्यात हवामान विभागाकडून अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आल्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. रब्बी हंगामात घेतले जाणारे चिया पीक काढणीस आले असताना हवामान बदलामुळे नुकसानाची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे आहे त्या स्थितीत शेतकरी हार्वेस्टरच्या साहाय्याने चिया पिकांची काढणी वेगाने पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. चिया पिकाचे यंदा चांगले उत्पादन मिळाल्याने आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा होती मात्र बदलत्या वातावरणाचा फटका चिया पिकाला बसला असून उत्पादनात घट येतं आहे. अवकाळी पावसाच्या भीतीने अनेक शेतकरी अनेक सकाळपासून चिया काढणीची लगबग सुरू आहे.
971
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 21, 2026 03:30:42
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली ब्रेकिंग सांगली जिल्हा परिषद निवडणुकीवरून जयंत पाटलांनी संजयकाका पाटळांच्यावर टीका करताना, संजयकाका पाटील यांनी जयंत पाटलांना भाजपासोबत पाठवलं होतं असं विधान केले होतं. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी खासदार संजयकाका पाटील यांनी या गौप्यस्फोटात सांगितले, जयंत पाटील भाजपात जाण्यासाठी किती वेळा उंबरे झिजवले याचा साक्षीदार आपण आहोत. जयंत पाटलांनी त्यांच्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेऊन सांगावे असे आव्हान देखील त्यांनी दिले. या प्रकरणी जयंत पाटलांची राजकारण अडचणीत आणणारा चर्चा आली असून, त्यांनी गांभीर्याने घेतला पाहिजे या-type इशाऱ्यांचा समावेश आहे. बाइट - जयंत पाटील - आमदार - राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार बाइट - संजयकाका पाटील - माजी खासदार - राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार
1075
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Mar 21, 2026 03:18:21
Beed, Maharashtra:ANC - शिरूर तालुक्यातील खालापुरी गावात सागर लोंढे याच्या गँगकडून दहशत निर्माण होत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तलवार व बंदुकीचा धाक दाखवत या गँगकडून अनेक कुटुंबांना त्रास दिला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. हात बंदूक आणि दातात कोयता ठेवून सागर लोंढे हा सोशल माध्यमात फोटो शेअर करतो.. त्यामुळे ग्रामस्थ आणखीन भीतीच्या सावटाखाली आहेत. या प्रकरणी पोलिसांकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी अखेर बेमुदत उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. खालापुरी येथील तलाठी कार्यालयासमोर ग्रामस्थांनी डोळ्याला काळी पट्टी बांधून आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत आरोपींवर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार, असा इशारा आंदोलक ग्रामस्थांनी दिला आहे. गावातील महिला, ज्येष्ठ नागरिक आणि युवक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले असून प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिस प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी त्वरित पावले उचलावी अशी मागणी ग्रामस्थानी केली आहे.
1072
comment0
Report
SNSWATI NAIK
Mar 21, 2026 03:18:07
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई महानगरपालिके तर्फे शिक्षण रूपांतर धोरणाचा प्रस्ताव महासभेत मांडण्यात येणार आहे. सदर धोरणा नुसार नवी मुंबई महापालिकेच्या सर्व शाळा इंग्रजी माध्यमाच्या करण्यात येणार असून इंग्रजी माध्यमात विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. यामुळे नवी मुंबई मनपाच्या सर्व मराठी शाळा या बंद करुन त्याऐवजी सर्व शाळा इंग्रजी माध्यमाच्या करण्याचा प्रस्ताव सभागृह नेते सागर नाईक मांडणार आहेत. यामध्ये मराठी विषय हा सक्तीचा असला तरी सरसकट सर्व शाळा इंग्रजी माध्यमाच्या केल्यास मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. जे मराठी माध्यमाचा आग्रह धरतात त्यांनी स्वतःच्या मुलांना कुठल्या माध्यमात शिकवलंय हे पाहून घ्यावं असे म्हणत गरिबांच्या मुलांना ही इंग्रजी मद्धमातून शिकण्याचा हक्क असल्याची प्रतिक्रिया यावेळी सभागृह नेते सागर नाईक यांनी व्यक्त केलेय.
1019
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 21, 2026 03:17:48
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगलीच्या तासगाव तालुक्यात पडलेल्या अवकाळी पावसा व गारपीटमुळे द्राक्ष बागांना मोठा फटका बसला आहे. द्राक्षांची पंढरी म्हणून तासगाव तालुक्याची ओळख आहे,हंगामातील उरल्यास सूरल्या द्राक्षबागांना अवकाळीचा फटका बसला असून द्राक्षबाग शेतकऱ्यांचे मोठ आर्थिक नुकसान झाला आहे.या नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पाटील यांनी पाहणी केली आहे. तासगाव तालुक्यातील तुरची,ढवळी, जरंडी येथील द्राक्ष बागांची शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत, नुकसानीची आढावा देखील घेत,कृषी विभागाला तातडीने पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना देत, राज्य सरकारने द्राक्षबाग शेतकऱ्यांना भरीव मदत करावी अशी मागणी आमदार रोहित पाटील यांनी यावेळी केली आहे.
997
comment0
Report
Advertisement
Back to top