Back
जिला अस्पताल के आपात विभाग में भटकते कुत्ते सुरक्षा पर सवाल खड़े कर रहे हैं
ADANIRUDHA DAWALE
Mar 21, 2026 03:34:41
Amravati, Maharashtra
जिल्हा सामान्य रुग्णालयात धक्कादायक प्रकार; अपघात कक्षात भटक्या कुत्र्यांचा वावर, रुग्ण सुरक्षेवर प्रश्नचिन्ह अँकर :- शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालय येथील अपघात कक्षात भटक्या कुत्र्यांचा मुक्तपणे वावर होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकारामुळे रुग्णांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून रुग्णालय प्रशासनाच्या व्यवस्थेवरही टीका होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा रुग्णालयातील अपघातकक्ष २४ तास कार्यरत असतो. येथे अपघातग्रस्त, गंभीर अवस्थेतील तसेच विषप्राशन केलेले रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. मात्र अशा संवेदनशील विभागातच कुत्रे बेधडक फिरताना दिसत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. गुरुवारी दुपारी काही रुग्णांवर उपचार सुरू असतानाच एक भटका कुत्रा बेडजवळ फिरताना दिसला. यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. विशेषतः जखमी रुग्णांसाठी अशा अस्वच्छ वातावरणामुळे संसर्गाचा धोका अधिक वाढू शकतो. स्थानिक नागरिकांच्या मते, रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर नियंत्रण नसल्याने भटकी जनावरे सहज आत येतात. तसेच स्वच्छतेच्या बाबतीतही गंभीर त्रुटी असल्याचे त्यांनी सांगितले. मागील काही दिवसांपासून अपघात कक्षात कुत्र्यांचा वावर नियमितपणे दिसत असल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. दरम्यान या संपूर्ण प्रकाराची दखल घेऊन रुग्णालय प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे. अपघात कक्षासह संपूर्ण रुग्णालय परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करणे, स्वच्छता राखणे आणि भटक्या प्राण्यांचा प्रवेश रोखणे अत्यावश्यक असल्याचे नागरिकांचे मत आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PNPratap Naik1
FollowMar 21, 2026 03:49:49938
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 21, 2026 03:49:41930
Report
SMSATISH MOHITE
FollowMar 21, 2026 03:49:29928
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 21, 2026 03:34:30981
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 21, 2026 03:34:201023
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 21, 2026 03:33:53949
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 21, 2026 03:30:421039
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 21, 2026 03:18:211072
Report
SNSWATI NAIK
FollowMar 21, 2026 03:18:07947
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 21, 2026 03:17:48996
Report
GMGajanan MAchindar
FollowMar 21, 2026 03:17:26958
Report
AKAMAR KANE
FollowMar 21, 2026 03:17:131025
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 21, 2026 03:17:06931
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 21, 2026 03:16:511053
Report