Back
जालना में प्रीमैच्योर बच्चे के देहदान से मेडिकल शिक्षा में प्रेरक पहल
NMNITESH MAHAJAN
Feb 19, 2026 08:05:06
Jalna, Maharashtra
जालना: शहरात प्रथमच प्री-मॅच्युअर मृत बाळाचा देहदान झाला. दुःखातून सावरत दहीभाते कुटुंब समाजापुढे आदर्श बनले. पाच दिवसांच्या बाळाचा मृतदेह अभ्यासासाठी दान केला गेला. अँकर: मृत्यूनंतर मृतदेहाचा अंत्यविधी झाला, परंतु जालन्यातील डॉक्टर दांपत्याने आपल्या पाच दिवसाच्या बालकाचा मृतदेह मेडिकल कॉलेजमध्ये अभ्यासासाठी दान केला. ही प्रक्रिया संजीवनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पार पडली. मृतदेह देताना आईने आपल्या मृत बाळाचं चुंबन घेऊन काळजावर दगड ठेवत डॉक्टरांच्या स्वाधीन केल्यानंतर उपस्थितींचे डोळे पाणावले होते. सोनाली उदय दहीभाते यांच्या बाळाचा प्री-मॅच्युअर जन्म झाला होता. जन्मानंतर प्रकृती अत्यंत नाजूक असल्याने बाळाला संजिवनी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही बाळाला वाचविण्यात अपयश आले. या दु:खद प्रसंगातही बाळाचे वडील डॉ. उदय दहीभाते यांनी समाजापुढे आदर्श ठेवत मृत बाळाचे देहदान करण्याचा निर्णय घेतला. वैद्यकीय शिक्षण व संशोधनासाठी बाळाचा देह जालना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे सुपूर्द करण्यात आला. हा निर्णय डॉ. बाळीराम बागल, डॉ. कैलाश राजगुरू व डॉ. शिवदास मिरकड व डॉ सहिदा अफरोज, डॉ प्रतिमा कुलकर्णी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. या स्तुत्य उपक्रमामुळे वैद्यकीय शिक्षणाला मोठी मदत होणार असून देहदानाबाबत समाजात जनजागृती होण्यास चालना मिळणार आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SGSagar Gaikwad
FollowFeb 19, 2026 09:46:190
Report
SRSHRIKANT RAUT
FollowFeb 19, 2026 09:40:530
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 19, 2026 09:39:560
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 19, 2026 09:32:510
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 19, 2026 09:23:170
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 19, 2026 09:23:020
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 19, 2026 09:07:060
Report
AKAMAR KANE
FollowFeb 19, 2026 09:03:46Nagpur, Maharashtra:Noida से भेजा गया. Zee News से बताया गया था. डॉ वसंत खळतकर (On Hidden sugar in packed food).
0
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 19, 2026 09:03:130
Report
AKAMAR KANE
FollowFeb 19, 2026 09:02:530
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowFeb 19, 2026 08:09:220
Report
UJUmesh Jadhav
FollowFeb 19, 2026 08:02:310
Report
AKAMAR KANE
FollowFeb 19, 2026 08:01:120
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 19, 2026 08:00:460
Report