Back
पिंपळनेर के नेलकंठ नगर में शादी समारोह पर हमला, दो की मौत, तीन घायल
PPPRASHANT PARDESHI
Feb 19, 2026 11:52:56
Dhule, Maharashtra
धुळे जिल्ह्यातील पिंपळनेरच्या नीलकंठ नगरात लग्नसोहळ्यात रक्तरंजित संघर्ष पाहायला मिळाला. यां हल्ल्यात तिघांचा मृत्यू झळा सून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. पिंपळनेर येथे आनंदोत्सवासाठी जमलेले लग्नघर अचानक भीषण हल्ल्याने हादरले. पिंपळनेर येथील नीलकंठ नगरात गोसावी समाजाच्या लग्नकार्यादरम्यान झालेल्या चाकू हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज दुपारी सुमारे एक वाजेच्या sुमारास घडली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हळदीच्या दिवशी साखरपुड्याची तयारी सुरू असताना साक्री व सोनगड येथून आलेल्या नातेवाईकांमध्ये आधीपासूनच वादाची ठिणगी पेटलेली होती. साखरपुड्यापूर्वी काही नातेवाईकांनी व्हॉट्सअॅपवर आक्षेपार्ह संदेश व व्हिडिओ प्रसारित केल्याने तणाव वाढला होता. त्यातूनच लग्नस्थळी अचानक कुरापत काढून धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याचे सांगितले जाते. या हल्ल्यात देवेंद्र ज्ञानेश्वर पवार (वय ३५) आणि सुरेशगीर सुरेश मोजगीर गोसावी (वय ५५) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच साहिल सुरेश गोसावी, पंकज अशोक गीर, सुरेश सुपडू गीर आणि सागर गोसावी हे जखमी झाले असून त्यांना प्रथम ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमींपैकी एकास पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. हल्ल्याप्रकरणी कानागिरी मुलागिरी गोसावी, यशवंत गोपाल गोसावी, अनिल गिरी हटुगिरी गोसावी, सोनुगिरी गोसावी, विजुगिरी हटुगिरी गोसावी, कमलेश गिरी शंभू गिरी गोसावी आणि हर्षु शंभू गोसावी यांच्यावर आरोप करण्यात आला असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. लग्नसोहळ्यातील या रक्तरंजित घटनेमुळे पिंपळनेर परिसरात खळबळ उडाली आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 19, 2026 13:21:310
Report
PNPratap Naik1
FollowFeb 19, 2026 13:20:560
Report
PNPratap Naik1
FollowFeb 19, 2026 11:46:380
Report
UJUmesh Jadhav
FollowFeb 19, 2026 11:32:110
Report
AKAMAR KANE
FollowFeb 19, 2026 10:54:200
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 19, 2026 10:50:280
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 19, 2026 10:48:460
Report
SGSagar Gaikwad
FollowFeb 19, 2026 09:46:190
Report
SRSHRIKANT RAUT
FollowFeb 19, 2026 09:40:530
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 19, 2026 09:39:560
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 19, 2026 09:32:510
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 19, 2026 09:23:170
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 19, 2026 09:23:020
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 19, 2026 09:07:060
Report