Back
शाहू महाराज ने टिपू सुलतान पर टिप्पणी, ब्रिटिश विरोधी इतिहास पर नया नजरिया
PNPratap Naik1
Feb 19, 2026 11:46:38
Kolhapur, Maharashtra
टिपू सुलतान और छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भातील वादावर आता कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या वक्तव्यानंतर राज्यात निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर शाहू महाराजांनी आपली भूमिका स्पष्ट करताना ब्रिटिशांच्या विरोधात लढताना नेमकं ब्रिटिशांना मदत कोणी केली, याचाही अभ्यास व्हायला हवा, असं सांगत शाहू महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे शत्रू कोण होते, याकडे अप्रत्यक्षपणे लक्ष वेधले.
VO 1:- गेल्या काही दिवसापासून राज्यामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात भाष्य करत असताना टिपू सुलतान शिवाजी महाराजांच्या काळातील समक्ष होते असं वक्तव्य केलं. या वक्त्यावर नंतर राज्यभरात हिंदुत्ववादी संघटनांनी सकपाळ यांच्या विरोधात जोरदार आंदोलन केले. वाद वाढल्यानंतर हर्षवर्धन सकपाळ यांनी आपल्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली. आपण मांडलेली भूमिका चुकीच्या पद्धतीने मांडली गेल्याचा दावा करत त्यांनी स्पष्टीकरण दिले.
Byte:- हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
VO 2: दरम्यान आज शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर बोलताना खासदार शाहू महाराजांनी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. शाहू महाराज म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा आदर्श घेऊन जर टिपू सुलतान यांनी काम करण्याचं ठरवलं असेल, तर ते पाहणं गरजेचं आहे. तसंच, ब्रिटिशांच्या विरोधात लढताना नेमকं ब्रिटिशांना मदत कोणी केली, याचाही अभ्यास व्हायला हवा, असं सांगत शाहू महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे शत्रू कोण होते, याकडे अप्रत्यक्षपणे लक्ष वेधले.
Play Byte: छत्रपती शाहू महाराज, खासदार (काँग्रेस)
VO 3 :- शाहू महाराजांनी टिपू सुलतान विषयावर भाष्य करत असताना , खूप सावध प्रतिक्रिया दिली आहे. ही प्रतिक्रिया देत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा आदर्श घेऊन जर टिपू सुलतान यांनी काम करण्याचं ठरवलं असेल तर त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असं सांगून इतिहासाच्या पानातील टिपू सुलतान यांचं महत्त्व देखील कमी होऊ दिले नाही. हे करत असताना खासदार शाहू महाराज यांनी प्रत्येकाने छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि आचार आपल्या जीवनात अमलात आणले पाहिजेत, अशी अपेक्षा बोलावून दाखवली.
प्रताप नाईक झी 24 तास कोल्हापूर
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 19, 2026 13:21:310
Report
PNPratap Naik1
FollowFeb 19, 2026 13:20:560
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowFeb 19, 2026 11:52:560
Report
UJUmesh Jadhav
FollowFeb 19, 2026 11:32:110
Report
AKAMAR KANE
FollowFeb 19, 2026 10:54:200
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 19, 2026 10:50:280
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 19, 2026 10:48:460
Report
SGSagar Gaikwad
FollowFeb 19, 2026 09:46:190
Report
SRSHRIKANT RAUT
FollowFeb 19, 2026 09:40:530
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 19, 2026 09:39:560
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 19, 2026 09:32:510
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 19, 2026 09:23:170
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 19, 2026 09:23:020
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 19, 2026 09:07:060
Report