Back
धुले में धुँध-ठंड से भेंड़ी उत्पादन गिरे, किसानों ने मुआवजे की मांग
PPPRASHANT PARDESHI
Nov 25, 2025 04:33:19
Dhule, Maharashtra
कधी पाऊस, कधी थंडी तर कधी धुकं अश्या निसर्गाच्या दुष्टचक्रात भेंडी उत्पादक शेतकरी सापडला आहे. धुक्याची दाट चादर भेंडी पिकावर दुष्परिणाम केल्याने उत्पन्न घाटले आहे. उत्पन्न जमीन झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. धुळे तालुक्यातील कापडणे देवभाने शिवारातील शेतकरी सध्या आसमानी संकटाने मोडून पडले आहेत. पावसाच्या दुष्परिणामातून सावरत असतानाच हिवाळ्यातील दाट धुक्याने भेंडी पिकावर पुन्हा संक्रांत आणली आहे. शिवारातील शेतकरी उत्पादक मोठ्या अडचणीत सापडले असून उत्पादनातील झपाट्याने झालेली घट आणि बाजारभावातील घसरण यामुळे आर्थिक संकट तीव्र झाले आहे. पूर्वी दोन बिघामधून सरासरी वीस कॅरेटपर्यंत भेंडीचे उत्पादन सहज मिळत होते. मात्र सध्या त्याच क्षेत्रातून जेमतेम पाच कॅरेट मिळत असल्याचे शेतकऱ्यांचे सांगणे आहे. थंडीत वाढलेल्या धुक्यामुळे झाडांची वाढ खुंटून रोगराईने डोके वर काढले आहे. परिणामी भेंडीची गुणवत्ता आणि प्रमाण दोन्ही घटले आहे. उत्पादनात घट झाल्याने भावही कोसळले असून पिकातून मजुरीदेखील निघेनाशी झाली आहे. “शेतीवर हजारो रुपये खर्च केले, पण हातात काहीच पडत नाही. मजुरी भागवणेही कठीण झाले आहे,” अशी खंत विजय शांताराम माळी या शेतकऱ्याने व्यक्त केली आहे. या सर्व परिस्थितीत शासनाने तातडीने पिकनुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, अशी ठोस अपेक्षा शेतकरी बांधवांनी देखील व्यक्त केली आहे.
112
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRANAV POLEKAR
FollowNov 25, 2025 06:21:04112
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 25, 2025 06:19:4737
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 25, 2025 06:19:3846
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 25, 2025 06:19:2879
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 25, 2025 05:46:57174
Report
AKAMAR KANE
FollowNov 25, 2025 05:33:35155
Report
AKAMAR KANE
FollowNov 25, 2025 05:09:14134
Report
MAMILIND ANDE
FollowNov 25, 2025 04:47:18150
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 25, 2025 04:45:19215
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 25, 2025 04:36:54107
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 25, 2025 04:36:41145
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 25, 2025 04:35:38153
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 25, 2025 04:22:12132
Report
AKAMAR KANE
FollowNov 25, 2025 04:21:1591
Report