Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chhatrapati Sambhajinagar431001

घाटी अस्पताल में प्रसूति विभाग में जगह कमी, माताएं जमीन पर इलाज के लिए मजबूर

VKVISHAL KAROLE
Feb 27, 2026 03:01:48
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजी नगरात घाटी रुग्णालयातील प्रसूती विभागात जागेअभावी मातांना जमिनीवर गाद्या टाकून उपचार घ्यावे लागत असल्याचे तक्रारी पुढे येत आहे. तर, दूध डेअरी भागातील २०० खाटांचे महिला व नवजात शिशू रुग्णालय आणि २०० खाटांच्या 'एमसीएच विंग' वीज, पाणी, यंत्रसामुग्री आणि कर्मचाऱ्यांच्या प्रतीक्षेत रेंगाळले आहे. त्यामुळं एका बाजूला नव्या जन्मासाठी जागा अपुरी पडत आहे आणि दुसऱ्या बाजूला नव्या रुग्णालयाचा 'पाळणा' हलण्याआधीच ते प्रशासनिक प्रक्रियेत अडकून बसले आहे ..दूध डेअरी येथील जागेतील ४०० खाटांच्या रुग्णालयासाठी सर्व प्रकारच्या एकूण ३६० पदांची आवश्यकता आहे. मात्र, रुग्णालयाचे काम पूर्णत्वाकडे असताना अद्यापही पदनिर्मिती झालेली नाही.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
TTTUSHAR TAPASE
Feb 27, 2026 04:48:53
Satara, Maharashtra:सातारा - साताऱ्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट 20 मार्चची डेडलाईन जाहीर होताच सत्तेच्या समीकरणांना वेग आला आहे..सातारा जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार असा अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर यांनी थेट सभेत जाहीर केलं.. “जिल्हा परिषद अध्यक्ष राष्ट्रवादीचाच होणार असा दावा देखील त्यांनी केला आहे.. मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील एकदिलाने सोबत आहेत… त्यामुळे अध्यक्षपदावर राष्ट्रवादीचाच झेंडा फडकणार.दरम्यान, मंत्री जयकुमार गोरे यांनी या आधी भाजपचाच अध्यक्ष होईल असा दावा केला होता. यावर त्यांनी टीका केली आहे. असं कोण पण टीव्ही वर काय पण बोलतात असे राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर यांनी सूचक विधान केल आहे बाईट: बाळासाहेब सोळसकर (जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी अजित पवार गट)
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Feb 27, 2026 04:45:35
Malegaon, Maharashtra:मालेगाव ब्रेकिंग बनावट नोटांच्या प्रेसवर मालेगाव पोलिसांचा छापा छत्रपती संभाजीनगर येथे कारवाई; मुख्य सूत्रधार अटकेत ५०० रुपयांच्या २०० बनावट नोटांसह मुद्देमाल जप्त मालेगाव छावणी पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधील बनावट चलनी नोटांच्या प्रेसवर छापा टाकून संतोष उत्तमराव केळसकर (रा. जय भवानीनगर) याला अटक केली. त्याच्याकडून २०० बनावट ५०० रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या. तसेच विनायक ग्राफिक्स या दुकानातून बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी सुमारे १.३६ लाखांची साधनसामुग्री जप्त करण्यात आली. बँकेत जमा करताना बनावट नोटा आढळल्यानंतर छावणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Feb 27, 2026 04:45:24
Washim, Maharashtra:मोहरी पिकाच्या वाढीसाठी महाबीजकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील पार्डी ताड येथे मोहरी पीक प्रात्यक्षिक तथा मोहरी शेतीदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अखिल भारतीय मोहरी संशोधन प्रकल्प आणि महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला. गावातील सलग ५० एकर क्षेत्रावर महाबीजच्या 'टॅम १०८-१' या मोहरी वाणाची पेरणी करण्यात आली असून त्यावर प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. कार्यक्रमात आयसीएआरचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ.ए.के.झा आणि महाबीजचे महाव्यवस्थापक विजय देशमुख यांनी मोहरी लागवड तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन केले. तसेच बियाणे उत्पादक शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला परिसरातील शेतकऱ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.
0
comment0
Report
MAMILIND ANDE
Feb 27, 2026 04:20:09
Wardha, Maharashtra:वर्ध्यात पालकमंत्री भोयर यांच्या OSD च्या नियुक्तीवरून राजकीय वाद - OSD ज्ञानदा फणसे यांची विभागीय चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची काँग्रेसची मागणी - विशेष कार्य अधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरून काँग्रेसचे प्रश्नचिन्ह - वर्धा जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानदा फणसे यांची राज्यमंत्री गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायतीराज, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण व अन्न व औषध प्रशासन यांच्या कार्यालयाच्या आस्थापनेवर प्रशासकीय कारणास्तव उसनवारी तत्त्वावर नियुक्ती - पण पदस्थапनेच्या ठिकाणी रुजू न होता, त्या विशेष कार्य अधिकारी या पदनामाने पालकमंत्री वर्धा जिल्हा कार्यालयाशी संबंधित प्रशासकीय कार्य पाहत असल्याचा आरोप - नियुक्ती दिलेल्या पदस्थापनेवर न रुजू होता दुसऱ्या ठिकाणी कार्यरत असल्याचा आरोप - उसनवारी तत्वावर नियुक्त शासकीय अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष पदस्थापना आणि कार्यनियोजनातील विसंगतीबाबत चौकशी करून कायदेशीर स्थिती स्पष्ट करावी व शिस्तभंगाची कारवाई करावी - काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांची पत्रपरिषदेत मागणी - एका पक्षाला झुकत माप देत असल्याचाही आरोप - काँग्रेसची चौकशीची मागणी यावेळी प्रशासन एका पक्षाला झुकत माप देत असल्याचाही आरोप करण्यात आला असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अन्यथा आम्ही न्यायालयात जाऊ असा इशारा दिला आहे. बाईट – मनोज चांदूरकर, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Feb 27, 2026 04:04:03
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई येथील तुर्भे परिसरातील डंपिंग ग्राउंडला शुक्रवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीत कचऱ्याचे मोठे ढिग जळून खाक झाले आहेत. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. वाशी, नेरुळ, कोपरखैराणे, एरोली, बेलापूर तसेच एमआयडीसी विभागाच्या अग्निशमन दलाच्या गाड्या आग विझवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अग्निशमन दलाचे जवान आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सुदैवाने या घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याची नोंद नाही. परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरल्याने नागरिकांमध्ये bhiतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Feb 27, 2026 03:47:23
Nagpur, Maharashtra:नागपूर ब्रेकिंग — बारावी पेपरफुटीत नवा धक्कादायक खुलासा, गणिताचा पेपर फुटला होता. अटकेतील आरोपींनी मोबाईल फॉरमॅट केल्यानं तो डेटा रिकव्हर करण्यात येय, यामध्ये आणखीच धक्कादायक बाब समोर आली.. बारावीचे फिजिक्स आणि केमिस्ट्री दोन पेपर फोडल्यानंतर आरोपींनी गणिताचाही पेपर फोडला असल्याची माहिती तपासात पुढे येतेय. फिजिक्स आणि केमिस्ट्री चा पेपर फुटल्याच्या प्रकार समोर आल्यानंतर गुन्हा दाखल झाला, काही आरोपीनी मोबाईल डेटा फॉरमॅट केला होता, मात्र मोबाईल डेटा रिकवरी करत असताना गणिताचा पेपर फुटल्याचे डिजिटल पुरावे पोलिसांना मिळाले असल्याची माहिती मिळत आहे. गणिताचा तिसरा पेपर त्यात प्रसारित डिजिटल पुरावे पोलिसांच्या हाती. सेंट उर्सुला शाळेत मिळालेल्या मोबाईलवरून 16 फेब्रुवारीला रसायनशास्त्र आणि 18 ला भौतिकशास्त्रचा पेपर फुटल्याच समोर आले होते.. या प्रकरणातील पाचवा आरोपी अजून अटक झालेली नाही... त्याने गुन्हा दाखल झाल्यानंतर गणिताचा पेपर व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून फोडल्याचे तपासात पुढे येतेय. पाच सदस्यांचे विशेष तपास पथककडून शोध मोहिम सुरू असून डिलिट केलेला डेटा पुन्हा मिळवण्यात येतोय
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Feb 27, 2026 03:34:49
Bhandara, Maharashtra:तहसील कार्यालय मोहाडी येथील सभागृहात घेतली आढावा बैठक.... नागरिकांचा समस्या घेतल्या जाणून.... त्यात जनतेच्या समस्या ऐकून घेऊन त्यावर मार्ग काढण्यात आला. जनतेच्या बऱ्याच समस्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होत्या. पट्टे, घरकुल, रेती, पाणी, विद्युत, वनविभाग, भूमिअभिलेख, बावथळी, तहसील संबधी बऱ्याच समस्या जनतेनी लेखी स्वरूपात दिल्या. जनतेला पट्टे आता पर्यंत मिळाले नाही, शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत बावनथळीचे पाणी पोहचत नाही, खऱ्या लाभार्थ्यांना घरकुल मिळत नसून जर ज्यांना मिळाले त्या घरकुल च्या नावाखाली रेती विकली जाते. असा अनेक समस्या एकूण अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर त्या सोडवाव्यात असे निर्देश खासदारांनी अधिकाऱ्यांना दिले आहे...
0
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Feb 27, 2026 03:34:20
Pune, Maharashtra:Headline : इंद्रायणी प्रदूषणाचा गंभीर प्रश्न.. बीज सोहळ्यापूर्वी सांडपाणी थेट नदीत, वारकऱ्यांच्या आरोग्यावर संकट?\n\nAnchor : जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या बीज सोहळ्याला अवघे काही दिवस उरले असताना देहू नगरीतील इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. देहूनगरपंचायत हद्दीतील काही भागातील दुर्गंधीयुक्त सांडपाणी थेट इंद्रायणी नदी पात्रात सोडले जात असल्याने वारकरी भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. घाट परिसरात सप्ताह, भजन-कीर्तन यांसह धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन होते. अनेक ठिकाणी स्वयंपाकासाठीही नदीचे पाणी वापरले जाते. भाविकांच्या श्रद्धास्थानी असलेली इंद्रायणी नदी ‘अमृततुल्य’ मानली जात असताना त्याच नदीत मैलामिश्रित सांडपाणी मिसळत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन कार्यवाही करणे गरजेचे असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेल्या इंद्रायणीचे पावित्र्य आणि वारकाऱ्यांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. याच इंद्रायणी नदी च्या घाटावरून आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी...
0
comment0
Report
PNPratap Naik1
Feb 27, 2026 03:30:11
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर महानगरपालिका यांच्या वतीने ‘माझं शहर माझी जबाबदारी’ या उपक्रमाअंतर्गत महास्वच्छता मोहिमेचा आज औपचारिक शुभारंभ करण्यात आला. महापौर रूपाराणी निकम यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या या विशेष मोहिमेचे उद्घाटन शहराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील तावडे हॉटेल परिसरात झाले. महापौर रूपाराणी निकम आणि महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी महापालिकेचे पदाधिकारी, अधिकारी, नगरसेवक तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहर स्वच्छ, सुंदर आणि नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी ही महास्वच्छता मोहिम राबविण्यात येत असून, नागरिकांनीही ‘माझं शहर माझी जबाबदारी’ या भावनेतून सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर रूपाराणी निकम यांनी केले आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Feb 27, 2026 03:17:05
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - तांत्रिक कारणामुळे सोलापूर ते मुंबई विमानसेवा मार्चमध्ये सात दिवस राहणार बंद - स्टार एअरच्या तांत्रिक कारणांमुळे सोलापूर ते मुंबई विमानसेवा मार्च महिन्यामध्ये सात दिवस राहणार बंद - तांत्रिक कारणास्तव मार्च महिन्यातील 2,9,11,16,18,23 आणि 25 या तारखेची सेवा विस्कळीत - सोलापूर ते मुंबई विमानसेवा सुरू झाल्याच्या पहिल्या चार महिन्यात 90% पेक्षा जास्त प्रतिसाद - मात्र चालू महिन्यात हे प्रमाण 30 ते 40 टक्क्यांपर्यंत खाली तर घसरणी मागे विमानाची वेळ चुकीची असल्याचे आले निदर्शनास - त्यामुळे सोलापूर ते मुंबई विमानसेवेची वेळ ही सकाळची करून सेवापूर्ववत करण्याची सोलापूरकरांची मागणी
0
comment0
Report
Advertisement
Back to top