Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Wardha442001

वर्धा में OSD नियुक्ति को लेकर राजनीतिक संघर्ष: कांग्रेस ने जांच की मांग

MAMILIND ANDE
Feb 27, 2026 04:20:09
Wardha, Maharashtra
वर्ध्यात पालकमंत्री भोयर यांच्या OSD च्या नियुक्तीवरून राजकीय वाद - OSD ज्ञानदा फणसे यांची विभागीय चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची काँग्रेसची मागणी - विशेष कार्य अधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरून काँग्रेसचे प्रश्नचिन्ह - वर्धा जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानदा फणसे यांची राज्यमंत्री गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायतीराज, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण व अन्न व औषध प्रशासन यांच्या कार्यालयाच्या आस्थापनेवर प्रशासकीय कारणास्तव उसनवारी तत्त्वावर नियुक्ती - पण पदस्थапनेच्या ठिकाणी रुजू न होता, त्या विशेष कार्य अधिकारी या पदनामाने पालकमंत्री वर्धा जिल्हा कार्यालयाशी संबंधित प्रशासकीय कार्य पाहत असल्याचा आरोप - नियुक्ती दिलेल्या पदस्थापनेवर न रुजू होता दुसऱ्या ठिकाणी कार्यरत असल्याचा आरोप - उसनवारी तत्वावर नियुक्त शासकीय अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष पदस्थापना आणि कार्यनियोजनातील विसंगतीबाबत चौकशी करून कायदेशीर स्थिती स्पष्ट करावी व शिस्तभंगाची कारवाई करावी - काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांची पत्रपरिषदेत मागणी - एका पक्षाला झुकत माप देत असल्याचाही आरोप - काँग्रेसची चौकशीची मागणी यावेळी प्रशासन एका पक्षाला झुकत माप देत असल्याचाही आरोप करण्यात आला असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अन्यथा आम्ही न्यायालयात जाऊ असा इशारा दिला आहे. बाईट – मनोज चांदूरकर, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PTPRAVIN TANDEKAR
Feb 27, 2026 05:18:45
Bhandara, Maharashtra:एआय सर्चमुळे तरुणावर संशय.....पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप.... भंडाराच्या गोबरवाही परिसरातील घटना.... पोलिसांनी सर्व आरोप फेटाळले.... भंडाऱ्याच्या गोबरवाही पोलीस ठाणे हद्दीत 15 फेब्रुवारी रोजी विजय भोरगडे यांच्या घरी झालेल्या चोरीप्रकरणी प्रमोद व कुणाल भोरगडे यांची नावे तक्रारीत नमूद झाली. स्वतःचे नाव संशयित म्हणून आल्यानंतर घाबरलेल्या कुणालने “संशयित आरोपी असल्यास बचाव कसा करावा?” असा प्रश्न गुगलवर शोधला. हा सर्च हिस्टरी पोलिसांच्या हाती लागल्याने संशय अधिकच बळावल्याचा आरोप आहे. चौकशीसाठी ताब्यात घेताना मोबाईल जप्त करण्यात आला. भंडारा स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने कुणाल याला ताब्यात घेतले व भंडारा येथे आणून मारहाण केल्याने हात फ्रॅक्चर झाल्याचा दावा कुणालने पत्रकार परिषदेत केला असून, या प्रकरणी न्याय व निष्पक्ष चौकशीची मागणी करण्यात येत आहे. तर पोलिसांनी सर्व आरोप फेटाळले आहे..
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Feb 27, 2026 05:18:24
Ambernath, Maharashtra:बदलापूर शहर पुन्हा एकदा हादरलंय. एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा शाळेच्या स्कूलबसमध्येच बस चालकानं विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडलीय. महत्वाची बाब म्हणजे या स्कूल बसमध्ये कोणतीही महिला मदतीस नव्हती. बदलापूर शहरातील एका नामांकित खासगी शाळेत विद्यार्थ्यांची ने-आण करणारी ही स्कूल बस आहे. या विद्यार्थिनीला शाळेतून घरी सोडताना बस चालकानं बसमध्ये तिचा विनयभंग केला. यानंतर पीडित विद्यार्थिनीनं आपल्या पालकांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पालकांनी थेट बदलापूर पश्चिम पोलीस स्थानकात धाव घेत याप्रकरणी तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी पोक्सो आणि ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. काही दिवासांपूर्वी बदलापुरातल्या स्कूल व्हॅनमध्ये असाच प्रकार घडला होता. स्कूल व्हॅन चालकाने चार वर्षांच्या चिमुरडीचं लैंगिक शोषण केल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणातील आरोपीला अटक झाल्यानंतर आता पुन्हा तसाच प्रकार बदलापुरात घडलाय. महत्वाचं म्हणजे कालच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी बदलापूरचा दौरा करत शाळांच्या सुरक्षेबाबत आढावा घेतला होता.
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Feb 27, 2026 05:04:42
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Feb 27, 2026 04:48:53
Satara, Maharashtra:सातारा - साताऱ्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट 20 मार्चची डेडलाईन जाहीर होताच सत्तेच्या समीकरणांना वेग आला आहे..सातारा जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार असा अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर यांनी थेट सभेत जाहीर केलं.. “जिल्हा परिषद अध्यक्ष राष्ट्रवादीचाच होणार असा दावा देखील त्यांनी केला आहे.. मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील एकदिलाने सोबत आहेत… त्यामुळे अध्यक्षपदावर राष्ट्रवादीचाच झेंडा फडकणार.दरम्यान, मंत्री जयकुमार गोरे यांनी या आधी भाजपचाच अध्यक्ष होईल असा दावा केला होता. यावर त्यांनी टीका केली आहे. असं कोण पण टीव्ही वर काय पण बोलतात असे राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर यांनी सूचक विधान केल आहे बाईट: बाळासाहेब सोळसकर (जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी अजित पवार गट)
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Feb 27, 2026 04:45:35
Malegaon, Maharashtra:मालेगाव ब्रेकिंग बनावट नोटांच्या प्रेसवर मालेगाव पोलिसांचा छापा छत्रपती संभाजीनगर येथे कारवाई; मुख्य सूत्रधार अटकेत ५०० रुपयांच्या २०० बनावट नोटांसह मुद्देमाल जप्त मालेगाव छावणी पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधील बनावट चलनी नोटांच्या प्रेसवर छापा टाकून संतोष उत्तमराव केळसकर (रा. जय भवानीनगर) याला अटक केली. त्याच्याकडून २०० बनावट ५०० रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या. तसेच विनायक ग्राफिक्स या दुकानातून बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी सुमारे १.३६ लाखांची साधनसामुग्री जप्त करण्यात आली. बँकेत जमा करताना बनावट नोटा आढळल्यानंतर छावणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Feb 27, 2026 04:45:24
Washim, Maharashtra:मोहरी पिकाच्या वाढीसाठी महाबीजकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील पार्डी ताड येथे मोहरी पीक प्रात्यक्षिक तथा मोहरी शेतीदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अखिल भारतीय मोहरी संशोधन प्रकल्प आणि महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला. गावातील सलग ५० एकर क्षेत्रावर महाबीजच्या 'टॅम १०८-१' या मोहरी वाणाची पेरणी करण्यात आली असून त्यावर प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. कार्यक्रमात आयसीएआरचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ.ए.के.झा आणि महाबीजचे महाव्यवस्थापक विजय देशमुख यांनी मोहरी लागवड तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन केले. तसेच बियाणे उत्पादक शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला परिसरातील शेतकऱ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Feb 27, 2026 04:04:03
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई येथील तुर्भे परिसरातील डंपिंग ग्राउंडला शुक्रवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीत कचऱ्याचे मोठे ढिग जळून खाक झाले आहेत. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. वाशी, नेरुळ, कोपरखैराणे, एरोली, बेलापूर तसेच एमआयडीसी विभागाच्या अग्निशमन दलाच्या गाड्या आग विझवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अग्निशमन दलाचे जवान आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सुदैवाने या घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याची नोंद नाही. परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरल्याने नागरिकांमध्ये bhiतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Feb 27, 2026 03:47:23
Nagpur, Maharashtra:नागपूर ब्रेकिंग — बारावी पेपरफुटीत नवा धक्कादायक खुलासा, गणिताचा पेपर फुटला होता. अटकेतील आरोपींनी मोबाईल फॉरमॅट केल्यानं तो डेटा रिकव्हर करण्यात येय, यामध्ये आणखीच धक्कादायक बाब समोर आली.. बारावीचे फिजिक्स आणि केमिस्ट्री दोन पेपर फोडल्यानंतर आरोपींनी गणिताचाही पेपर फोडला असल्याची माहिती तपासात पुढे येतेय. फिजिक्स आणि केमिस्ट्री चा पेपर फुटल्याच्या प्रकार समोर आल्यानंतर गुन्हा दाखल झाला, काही आरोपीनी मोबाईल डेटा फॉरमॅट केला होता, मात्र मोबाईल डेटा रिकवरी करत असताना गणिताचा पेपर फुटल्याचे डिजिटल पुरावे पोलिसांना मिळाले असल्याची माहिती मिळत आहे. गणिताचा तिसरा पेपर त्यात प्रसारित डिजिटल पुरावे पोलिसांच्या हाती. सेंट उर्सुला शाळेत मिळालेल्या मोबाईलवरून 16 फेब्रुवारीला रसायनशास्त्र आणि 18 ला भौतिकशास्त्रचा पेपर फुटल्याच समोर आले होते.. या प्रकरणातील पाचवा आरोपी अजून अटक झालेली नाही... त्याने गुन्हा दाखल झाल्यानंतर गणिताचा पेपर व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून फोडल्याचे तपासात पुढे येतेय. पाच सदस्यांचे विशेष तपास पथककडून शोध मोहिम सुरू असून डिलिट केलेला डेटा पुन्हा मिळवण्यात येतोय
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Feb 27, 2026 03:34:49
Bhandara, Maharashtra:तहसील कार्यालय मोहाडी येथील सभागृहात घेतली आढावा बैठक.... नागरिकांचा समस्या घेतल्या जाणून.... त्यात जनतेच्या समस्या ऐकून घेऊन त्यावर मार्ग काढण्यात आला. जनतेच्या बऱ्याच समस्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होत्या. पट्टे, घरकुल, रेती, पाणी, विद्युत, वनविभाग, भूमिअभिलेख, बावथळी, तहसील संबधी बऱ्याच समस्या जनतेनी लेखी स्वरूपात दिल्या. जनतेला पट्टे आता पर्यंत मिळाले नाही, शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत बावनथळीचे पाणी पोहचत नाही, खऱ्या लाभार्थ्यांना घरकुल मिळत नसून जर ज्यांना मिळाले त्या घरकुल च्या नावाखाली रेती विकली जाते. असा अनेक समस्या एकूण अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर त्या सोडवाव्यात असे निर्देश खासदारांनी अधिकाऱ्यांना दिले आहे...
0
comment0
Report
Advertisement
Back to top