Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chhatrapati Sambhajinagar431001

शिंदे की शिवसेना ने छत्रपती संभाजीनगर में प्रचार शुरू किया, दोपहिया रैली से आगाज

VKVISHAL KAROLE
Dec 22, 2025 08:31:53
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजीनगर में आज शिंदे यांच्या शिवसेनेच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे , पालकमंत्री संजय शिरसाठ खासदार संदिपान भुमरे यांच्या उपस्थिती शहरात टू व्हीलर रॅली काढण्यात आली.. तत्पूर्वी क्रांती चौकात शिवाजीमहाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं आणि विजय आपलाच अशी घोषणा यावेळी नेत्यांनी दिली , महत्त्वाचं म्हणजे अजून पर्यंत प्रचाराच्या औपचारिक शुभारंभ कुठलाही झाला नसताना रॅलीच्या माध्यमातूनच आज शिंदे सेनेने प्रचाराला सुरुवात केली रॅलीतून पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्यासोबत बातचीत केले आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VNVishal Nagesh More
Dec 22, 2025 10:06:38
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Dec 22, 2025 09:55:10
Pandharpur, Maharashtra:राज्यात 11 हजार 136 इतक्या दोन नंबरच्या मताधिक्याने पंढरपूर मध्ये नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजयी झालेल्या दिवंगत आमदार भारत भालके यांच्या सून डॉक्टर प्रणिता भालके यांचे पुत्र शौर्यतेज भालके याचा दंड थोपटेलेला व्हिडिओ राज्यभर व्हायरल झाला आहे. भारत भालके विजयी झाल्यानंतर त्यांनी सुद्धा अशाच पद्धतीने शिवतीर्थावर दंड थोपटले होते. त्याची आठवण म्हणून त्यांचा नातू शौर्य तेज भालके याने दंड थोपटून विजय साजरा केला. 2021 ची विधानसभा पोट निवडणूक 2024 ची विधानसभा निवडणूक मध्ये भालके यांचा पराभव झाल्यानंतर नगरपालिका निवडणुकीत झालेला विजय भालके यांना राजकीय बळ देणारा ठरला आहे
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Dec 22, 2025 09:47:13
Shirdi, Maharashtra:Sangmner News Flash नाशिक - पुणे सेमी हायस्पीड रेल्वेसाठी सर्व पक्षीय नेते एकवटले... मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या पहिल्या आठवड्यात शिष्ठमंडळासोबत मुंबईत बैठक घेण्याची माहिती... आ. सत्यजित तांबे यांनी बैठकीदरम्यान मुख्यंमंत्री यांचेशी संपर्क साधल्याची माहिती... मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या बैठकीत तोडगा निघेल अशी आ. तांबेची अपेक्षा... मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या बैठकीत तोडगा न निघाल्यास रस्त्यावरची लढाई करणार असल्याचे आश्वासन... आळेफाटा, चाकण येथे बेमुदत चक्काजाम आंदोलन करण्याचे संकेत... कुसान सभेचे डॉ. अजित नवले यांनी इशारा दिला... नाशिक - पुणे रेल्वेसाठी सर्वपक्षीय नेते एकवटले... आंदोलनेची पुढील दिशा ठरवण्यासाठी मंथन बैठकीचे आयोजन... संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते... नाशिक - पुणे रेल्वे ही सिन्नर, अकोले, संगमनेर, जुन्नर, नारायणगाव मार्गेच नेण्याची मागणी... प्रस्तावित रेल्वेमार्ग बदलला गेल्याने जनतेत असंतोष... रेल्वेसाठी सर्वपक्षीय आजी माजी खासदार, आमदार आणि नेते एकवटले... बैठकीसाठी उपस्थित नेते - खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी खासदार सदाशिव लोखंडे, आमदार सत्यजीत तांबे, आमदार किरण लहामटे, आमदार शरद सोनवणे, माजी आमदार अतुल बेनके, देवदत्त निकम, सत्यशील शेरकर, शेतीनेते अजित नवले, बाजीराव दराडे आदींसह विविध पक्षांचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित... तर खासदार अमोल कोल्हे, खासदार राजाभाऊ वाजे, आढळराव पाटील आदींचा बैठकीत ऑनलाईन सहभागिता...
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Dec 22, 2025 09:39:35
Gadchiroli, Maharashtra:मुख्यमंत्री पालकमंत्री असलेल्या गडचिरोलीत भाजपचे कमळ फुलले. सर्व तीनही नगरपरिषदावर भाजपने सत्ता मिळविली आहे. विशेष म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी या सर्वांच्या विरोधात भाजपने तीनही जागी लढत दिली होती. गडचिरोली, आरमोरी आणि देसाईगंज या तीनही ठिकाणी भाजपने अँटी इंकंबन्सी घटक धुळीस मिळवत सत्ता काबीज केली. गडचिरोली नगरपरिषदेत भाजपच्या उमेदवार ॲड प्रणोती निंबोरकर तब्बल 3700 मतांनी विजयी झाल्या. या नगर परिषदेत एकूण 27 नगरसेवक संख्या असून त्यापैकी भाजपने 15, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने 5, काँग्रेस 6 तर वंचित बहुजन आघाडीचा 1 उमेदवार निवडून आला आहे. देसाईगंज नगर परिषदेत भाजपच्या लता सुंदरकर विजय झाल्या. इथली नगरसेवक संख्या 21 आहे. यापैकी भाजपने 12, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने 2 तर काँग्रेसचे 7 उमेदवार विजयी झाले आहेत. आरमोरी नगरपरिषदेत भाजपने तरुण उमेदवार रुपेश पुणेकर यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी लढत जिंकली आहे. इथली सदस्य संख्या 20 असून त्यापैकी तब्बल 15 नगरसेवक भाजपने निवडून आणले आहेत. शिवसेना शिंदे गटाचा 1 उमेदवार तर काँग्रेसचे 4 उमेदवार निवडून आले. गडचिरोली
0
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Dec 22, 2025 09:38:58
Pune, Maharashtra:Headline : लोणावळ्यात फळ विक्रेतीचं 'भाग्य' उजळलं, नगरसेविका झाली, 24 तासांतच फळ विक्री सुरु केली. Anchor: लोणावळ्यात फळ विक्रेतील भाग्यश्री जगतापांवर मतदारांनी मोठा विश्वास दाखवलाय. त्यांचं नगरसेवक होण्याचं 'भाग्य' मतदारांनी उजळून टाकलंय. पण नगरसेवक झाल्यानंतर भाग्यश्री हुरळून गेल्या नाहीत. निकालाला चोवीस तास उलटायच्या आतचं भाग्यश्री यांनी पुन्हा फळ विक्रीला प्राधान्य दिलंय. दहा वर्षे ज्या व्यवसायानं आपलं पोट भरलं, तो व्यवसाय नगरसेवक झाले तरी सुरुचं ठेवणार आणि मतदारांचा विश्वास ही सार्थ ठरवणार. असा विश्वास भाग्यश्री यांनी व्यक्त केलाय. ग्राहकांना ही आपण नगरसेविकेच्या हातून पेरुचा गोडवा चाखतोय, हे पाहून सुखद धक्का बसला. राजकारणाच्या बाजारातील हे सकारात्मक चित्र पाहिलं की आपली लोकशाही अजून ही किती भक्कम आहे, हे यातून अधोरेखित झालं. बाईट : भाग्यश्री जगताप - नवनिर्वाचित नगरसेविका,लोणावळा (file no.04) बाईट : महादेव जगताप - भाग्यश्रींचे पती (file no.05)
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Dec 22, 2025 09:03:22
Satara, Maharashtra:सातारा: 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची निमंत्रण पत्रिका प्रसिद्ध झाली आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष मंत्री शिवेंद्रराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत 1 जानेवारी ते 4 जानेवारी या दरम्यान हे संमेलन पार पडणार असल्याचे सांगत त्याची तयारी सुरू झाली आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर पहिल्यांदा हे साहित्य संमेलन होत आहे. शतकपूर्तीच्या आधीचे हे संमेलन होत असल्यामुळे यावेळी तीन दिवसाऐवजी होणार आहे. त्यामुळे या साहित्य संमेलनात पहिल्यांदाच नाटक, फॉक व्याख्यान, हास्य जत्रेचा कार्यक्रम त्याचबरोबर विविध कार्यक्रम या चार दिवसात घेण्यात येणार असल्याचे देखील मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितलं. निर्बंधविरहित सार्वजनिक आहेत असे समजले जाते.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Dec 22, 2025 09:00:22
Bhandara, Maharashtra:तुमसर मध्ये राष्ट्रवादी बंडखोर सागर गभने यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात केला प्रवेश.... Anchor :- भंडारा जिल्ह्यात नगरपरिषदेच्या निवडणूकी दरम्यान मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या असून आणखी राजकारण तापले आहे.. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर नगरपरिषद मध्ये राष्ट्रवादी मधून बंडखोर सागर गभने निवडून आले आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार अभिषेक कारेमोरे यांना पराभव पत्करावा लागला आहे. अभिषेक कारेमोरे यांच्या प्रचारासाठी खुद्द प्रफुल्ल पटेल आले होते. तर राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे यांनी अपक्षाला पाठिंबा देत प्रचार केला होता आता बंडखोर निवडणुन आल्याने प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वाखाली सागर गभणे यांचा राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश घेण्यात आला आहे...
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Dec 22, 2025 08:53:53
Dharashiv, Maharashtra:धाराशिवमध्ये पाटील आणि निंबाळकर कुटुंबातील संघर्ष पुन्हा एकदा उफळून आलाय. नगरपरिषद निवडणुकीतील यशानंतर भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या पुत्र मल्हार पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांना थेट ओपन चॅलेंज दिलं आहे. “जिल्हा परिषदेवर भाजपचाच अध्यक्ष निवडून आणणार… धमक असेल तर उबाठाचा अध्यक्ष निवडून आणा,” असं आव्हान मल्हार पाटलांनी दिलंय. नगरपरिषद निकालानंतर धाराशिवचं राजकीय वातावरण तापलं आहे. भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या पुत्र मल्हार पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकरांवर जोरदार हल्लाबोल केलाय. जिल्हा परिषदेवर भाजपचाच अध्यक्ष निवडून आणणार असल्याचं सांगत, “धमक असेल तर उबाठाचा अध्यक्ष निवडून आणा,” असा थेट टोला मल्हार पाटलांनी लगावला. लोकसभा निवडणुकीत आई अर्चना पाटील यांच्या पराभवावर भाष्य करत, “लाटेवर निवडून आल्याचा राक्षसी आनंद होता, तो माज लोकांनी उतरवला,” असं म्हणत त्यांनी खासदारांवर निशाणा साधला. या टिकेनंतर धाराशिवमध्ये पाटील–निंबाळकर संघर्ष पुन्हा चिघळण्याची चिन्हं स्पष्ट दिसत आहेत.
0
comment0
Report
MAMILIND ANDE
Dec 22, 2025 08:47:21
Wardha, Maharashtra:वर्ध्याच्या आष्टीत पोलीस निरीक्षकाचा वाघिणीने अडविला रस्ता. पोलीस गस्तीवर असलेल्या पोलीसांच्या वाहनाला वाघिणीने थांबवले. वर्ध्याच्या आष्टी येथील थार घाटातील घटना. वर्ध्याच्या आष्टी ते थार रोडवर वाघिनीचे दर्शन. आष्टी पोलीस ठाण्याचे ठाणेदार राजेश जोशी हे आपल्या सहकऱ्यासह गस्तीवर असतांना चक्क सायंकाळी 8 च्या सुमारासच वाघीण आली होती रस्त्यावर. वाघीण एका बाजूला व पिल्ले दुसऱ्या बाजूला असल्याने वाघिणीने पोलिसांना थांबवले. अचानक रस्त्यावर वाघीण पाहून पोलीस निरीक्षक राजेश जोशी काहीकाळ झाले होते आश्चर्य चकित. वाघीण अचानक रस्त्यावर पाहून थार घाट परिसरात रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांमध्ये दहशत.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Dec 22, 2025 08:32:29
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Dec 22, 2025 08:32:09
Bhandara, Maharashtra:ईव्हीएम मशीनवर राष्ट्रवादी उमेदवाराचा नावच नाही.... या प्रकरणी 7 कर्मचारी निलंबित.... भंडारा नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 3 मध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार करुणा राऊत यांचा evm मशीनवर नावच नसल्याने मतमोजणीतल्या वेळी गोंधळ निर्माण झाला होता. राष्ट्रवादीने आक्षेप घेत निवडणूक विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. आता याप्रकरणी 7 कर्मचाऱ्यांना निंबित केलं आहे. तर दोन अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे... या प्रकरणी चौकशी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष चरण वाघमारे यांनी केली आहे...
0
comment0
Report
Advertisement
Back to top