Back
चंद्रपुर में अतिवृष्टी का रिकॉर्ड: 55,741 हेक्टेयर फसल बर्बाद
AAASHISH AMBADE
Sept 30, 2025 08:15:45
Chandrapur, Maharashtra
Feed slug :--- 3009ZT_CHP_LOSS_FIGURESS
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील अतिवृष्टीची आकडेवारी धक्कादायक, गेल्या चार महिन्यात 15 तालुक्यातील विविध महसूल मंडळात 65 वेळा झाली अतिवृष्टी, सध्या सप्टेंबर महिन्यातील 55 हजार 741 हेक्टर वरील शेत पिकांच्या नुकसानीचे केले जात आहेत प्रत्यक्ष पंचनामे
अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यात वार्षिक पर्जन्य सरासरीच्या 120% एवढा पाऊस पडून गेलाय. जिल्ह्यात गेल्या चार महिन्यात 65 वेळा विविध महसूल मंडळात अतिवृष्टी नोंदविण्यात आली आहे .चंद्रपूर जिल्ह्यात कापूस -धान- सोयाबीन -तूर ही प्रमुख पिके आहेत. याशिवाय भाजीपाला पिकांची संख्याही मोठी आहे. जिल्ह्यात मॉन्सूनच्या सुरुवातीला जून आणि जुलै या दोन महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना 7 कोटी 33 लाख रुपये भरपाई वितरणाचे काम सध्या सुरू आहे. याशिवाय ऑगस्ट या एकाच महिन्यात जिल्ह्यात 14 हजार 600 हेक्टर वर शेत पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र सर्वाधिक नुकसान सप्टेंबर महिन्यात झाले असून या महिन्यात सातत्याने पाऊस पडत आहे. परिणामी 55 हजार 741 हेक्टरवर शेत पिकांचे नुकसान झाले आहे. प्रत्यक्ष पंचनामांची प्रक्रिया सुरू असून यानंतरच अंतिम आकडा जाहीर होणार आहे. सततच्या अतिवृष्टीमुळे यंदा शेत पिकांचे झालेले नुकसान शेतकऱ्याची कंबरडे मोडणारी ठरली आहे
बाईट १) शंकर तोटावार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRAFULLA PAWAR
FollowSept 30, 2025 10:06:170
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowSept 30, 2025 10:01:570
Report
JMJAVED MULANI
FollowSept 30, 2025 09:51:240
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 30, 2025 09:50:460
Report
KJKunal Jamdade
FollowSept 30, 2025 09:50:060
Report
ABATISH BHOIR
FollowSept 30, 2025 09:37:350
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowSept 30, 2025 09:31:180
Report
PNPratap Naik1
FollowSept 30, 2025 09:22:400
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowSept 30, 2025 09:21:200
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 30, 2025 09:19:570
Report
PNPratap Naik1
FollowSept 30, 2025 09:18:020
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 30, 2025 09:01:570
Report
PNPratap Naik1
FollowSept 30, 2025 09:01:440
Report
AKAMAR KANE
FollowSept 30, 2025 08:47:260
Report
PNPratap Naik1
FollowSept 30, 2025 08:46:550
Report