Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nanded431604

करमोडी में 85 रुपये/हेक्टेयर मदद पर किसान नाराज; 50 हजार की मांग

SMSATISH MOHITE
Sept 30, 2025 09:50:46
Nanded, Maharashtra
Satish Mohite Slug - Ned_Farmer Feed on - 2C ------------------------------ Anchor - सरकारने जाहीर केलेली हेक्टरी साडेआठ म्हणजेच प्रती गुंठा 85 रुपये मदत नाकारण्याचा ठराव नांदेड जिल्ह्यातील करमोडी ग्राम पंचायतीने घेतला. हदगाव तालुक्यातील करमोडी शिवारातील शेती कयाधु नदीच्या पुरात पूर्ण वाहून गेली आहे. शेती खरडून प्रचंड नुकसान झाले आहे. सरकारने जाहीर केलेल्या मदतीमध्ये लागवडीचा खर्च देखील निघणार नाही. अतिवृष्टी आणि पुरामुळे पुढे शेती काशी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. सरकारने जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी असल्याने पंजाब सरकारने तिथल्या पुरग्रस्त शेतक-यांसाठी जाहीर केल्याप्रमाणे हेक्टरी 50 हजाराची मदत द्यावी. ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफी करावी, पिकविमा भरलेल्या शेतकऱ्यांना परतावा द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. ग्राम पंचायातीचा ठराव सोमवारी तहसीलदारांना देण्यात आला. Byte - अनिल पवार - माजी सरपंच Byte - रामराव पटणे - शेतकरी करमोडी Byte - बाबुराव आनेराव - शेतकरी --------------------------
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GDGAJANAN DESHMUKH
Sept 30, 2025 11:30:32
Parbhani, Maharashtra:अँकर- कृषी आणि शेतकऱ्यांशी निगडित असलेल्या कृषी विद्यापीठाने सततच्या पावसाने ऐन शेतकर्यांची पीक गेली असतांना मराठवाड्यात भारतीय कृषि विद्यापीठ संघ राष्ट्रीय परिसंवाद या कार्यक्रमाच्या निमित्ताने गरज नसतांना ऑर्केष्टा लावून लावण्याचा कार्यक्रम घेतला होता. याची कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे सदस्य प्रवीण देशमुख यांनी राज्याचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. मराठवाड्यातील शेतकरी वर्ग अतिवृष्टीमुळे गंभीर संकटातून जात असताना वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू इंद्रमणी हे मात्र रंगारंग कार्यक्रमात रमल्याची तक्रार देशमुख यांनी केली होती. शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती व शासन यंत्रणा रात्री-दिवस कार्यरत असताना विद्यापीठाने असे सांस्कृतिक कार्यक्रम घेणे ही कृती संवेदनशून्य व विद्यापीठाच्या प्रतिमेला धक्का देणारी आहे. देशमुख यांनी कार्यक्रम आयोजकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. त्यानंतर आता महाराष्ट्र कृषी परिषद पुणेच्या महासंचालक वर्षा लड्डा उटवाल यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमनी यांना वस्तुदर्शक अहवाल पाठवन्या संदर्भात नोटीस बजावली आहे. वास्तविक पाहता सध्यस्थितीत महाराष्ट्रातील शेतकरी अतिवृष्टीच्या मोठ्या संकटात असताना कृषि विद्यापीठांनी तसेच सर्वच संबंधीत शासकीय यंत्रणांनी जबाबदारीचे भान ठेवून व संवेदनशीलतेने काम करणे आवश्यक आहे. तथापि, अशा प्रसंगी या प्रकारचे कार्यक्रम विद्यापीठात आयोजित करून राज्यातील शेतकऱ्यांमध्ये कृषि विद्यापीठे, कृषि परिषद व शासनाविषयी रोष उत्पन्न झाला आहे. सदर बाब अतिशय गंभीर असल्याचे म्हटले आहे. सबब, सदर प्रकरणी आपला वस्तुस्थिती दर्शक अहवाल व खुलासा मा. मंत्री (कृषि) यांचे कार्यालयास व कृषि परिषदेस त्वरित सादर करणेबाबत कृषी मंत्री यांनी निर्देश असल्याचे म्हटले आहे....
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Sept 30, 2025 11:18:01
Dhule, Maharashtra:ANCHOR - शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी एका नवजात बालकाचे मामा झाले आहेत. आपल्या मतदारसंघातील मोहिदा गावाच्या कल्याणी कोळी या महिलेने बाळाला जन्म देताच जग सोडलं, त्यामुळे या नवजात बालकाला भाचा म्हणून स्वीकारत, त्या मुलाच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी आमदारांनी घेतली. राजेश पाडवी यांच्या या निर्णयामुळे नवजात बालकाला नवं आयुष्य मिळालं. शहादा तालुक्यातील मोहिते गावातील कल्याणी कोळी या महिलेला प्रस्तुतीच्या वेदना अधिक होत होत्या, प्रकृतीसाठी रुग्णालयात दाखल केलं, मात्र बाळाला जन्म दिल्यानंतर मातेच्या दुर्दैवी मृत्यू झाला, त्यामुळे आपल्या मतदारसंघातील नवजात बालकाचे आई हरपल्याने आमदार राजेश पाडवी यांनी या नवजात बालकाचे मामा म्हणून शिक्षणाची पूर्ण जबाबदारी घेतली, आईची माया हरपली, त्यामुळे आमदार राजेश पाडवी यांनी या नवजात बालकांच्या वडिलांची संवाद साधत, या बालकाचे वजन अवघ्या दीड किलो आहे त्यामुळे या बालकाला उपचाराची गरज असल्याने, बालकाचे उपचारापासून ते शिक्षणापर्यंतची सर्व जबाबदारी स्वीकारली आहे. या माणुसकी मुळे आमदार राजेश पाडवी हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. प्रशांत परदेशी, नंदुरबार.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Sept 30, 2025 11:17:53
Dhule, Maharashtra:Anchor - नंदुरबार जिल्ह्यामध्ये लोकप्रतिनिधी हे अति पावसामुळे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करीत आहेत आणि मदतीच्या घोषणा देखील करत आहेत. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मदत होताना दिसत नाहीत. पंचनामे होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. नंदुरबार तालुक्यात गेल्या तीन दिवसापासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेती पिकांच्या अतोनात नुकसान झालेलं आहे. ऐन काढणीवर आलेल्या पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावल्या गेल्याची प्रतिक्रिया शेतकरी देत आहेत. अनेक उभ पीक आडवे झाले आहेत तर काही शेतांमध्ये पाणी शिरल्याने उत्पन्न येणार नाही अशी परिस्थिती शेतकऱ्यांसमोर उपस्थित झाली आहे नंदुरबार तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे केळी पपई कापूस सोयाबीन मिरची आणि मका पिकाचे सर्वाधिक नुकसान झालेलं आहे ऐन काढणीवर आलेल्या पीक उध्वस्त होत असल्याने केलेला खर्चही निघणार नाही अशी परिस्थिती या पिकांची झालेली असल्याने दुष्काळात तेरावा महिना अशी गत झाली आहे यामुळे शासनाने तात्काळ पंचनामे करून आम्हा शेतकऱ्यांना मदत करावी अशी अपेक्षा बळीराजाकडून व्यक्त केली जात आहे. प्रशांत परदेशी, नंदुरबार.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Sept 30, 2025 11:17:15
Dhule, Maharashtra:Anchor - नंदुरबार जिल्ह्यात पंतप्रधान सूर्य घर योजनेत ४ हजार १४९ लाभार्थ्यांनी आपल्या घरावर सौर ऊर्जा लावण्यात आले आहे. हजारो रुपयांचे अनुदान मिळत असल्याने जिल्ह्यातील अनेक वीज ग्राहकांनी पंतप्रधान सौर ऊर्जा च्या लाभ घ्यावा, घरावर सौर ऊर्जा बसवल्याने विज बिल शून्य होत आहे सध्या वीज ग्राहकांना अहवाच्या सव्वा बिल येत आहे त्यामुळे महावितरण विभागावर रोष मोठ्या प्रमाणावर वाढत चालला असल्याने वीज ग्राहकांनी पंतप्रधान सौर ऊर्जा योजनेच्या लाभ घेतलास विज बिल शून्य होणार आहे या योजनेच्या लाभ जिल्ह्यातील ४ हजार पेक्षा अधिक लाभार्थ्यांना झाला असल्याने इतर लाभार्थ्यांनी देखील पंतप्रधान सौर योजनेच्या लाभ घ्यावा असं आवाहन वीज वितरण विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. प्रशांत परदेशी, नंदुरबार.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Sept 30, 2025 11:17:04
Dhule, Maharashtra:ANCHOR - नंदुरबार तालुक्यात परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे नुकसान झाला असून, चौपाले शिवारातील बाजीराव माळी या शेतकऱ्याच्या बारा एकर मध्ये केळी आणि चार एकर पपई पूर्णतः उध्वस्त झाली आहे. जवळपास १५/१६ लाख रुपये खर्च करून तीस ते पस्तीस लाख रुपये उत्पन्न अपेक्षित होतं मात्र पीक पूर्णतः मातीमोल झाले आहे. शासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना परवडेल अशी मदत द्यावी तूतपुंजा मदतीत शेतकऱ्यांच्या काही होणार नाही, अशी स्थिती आहे. बाजीराव माळी या शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास निसर्ग राजांनी हिरावून गेला आहे. तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी मूळ माळी या शेतकऱ्याच्या पपई सोबतच केळीची बाग देखील उध्वस्त झालेली आहे. जवळपास नऊ हजार झाड उध्वस्त झालेले आहेत. प्रति एक केळीचा झाडाला जवळपास शंभर रुपये खर्च झाला असून, एकूण नऊ लाख रुपये खर्च केले आहे. तर सात लाख रुपये पपईला खर्च झाला आहे त्यामुळे पंधरा-सोळा लाख खर्च करून 30 ते 35 लाख रुपये उत्पन्न येणार होतं मात्र वरून राज्याच्या मार मूळ पूर्णतः उध्वस्त झाला असून जवळपास खर्च आणि उत्पन्न मिळून ५० लाखाच्या नुकसान झालेलं आहे. त्यामुळे शासनाने पंचनामे करून तातडीने भरपाई द्यावी मात्र तूतपुंजी भरपाई न देता भरीव आणि केलेला खर्च प्रमाणे भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी बाजीराव माळी यांनी केले आहे. byte - बाजीराव माळी, नुकसानग्रस्त शेतकरी. प्रशांत परदेशी, नंदुरबार.
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Sept 30, 2025 10:37:56
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:धाराशिव DHARA_NAVRATR_R4 दुर्गाष्टमी निमित्ताने श्री तुळजाभवानी देवींची महिषासुरमर्दिनी अलंकार पूजा थाटामाटात Anchor धाराशिव – शारदीय नवरात्र उत्सवाच्या औचित्याने दुर्गाष्टमीच्या पावन दिवशी श्री तुळजाभवानी देवींची महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजा भक्तिभावाने व धार्मिक उत्साहात संपन्न झाली. पहाटे सहा वाजता विधिवत अभिषेक पूजेने कार्यक्रमाला सुरुवात झाली. अभिषेकानंतर देवीला अलंकार घालण्यात आले आणि महिषासुरमर्दिनी स्वरूपात देवीचे दैवी रूप प्रकट झाले. यानंतर सकाळच्या वेळी झालेल्या महाआरतीत उपस्थित भाविकांना देवीच्या दर्शनाचा लाभ मिळाला. नवरात्रातील दुर्गाष्टमी हा अत्यंत मंगल दिवस मानला जात असल्याने मंदिर परिसर भाविकांच्या उपस्थितीने गजबजून गेला होता. महाराष्ट्रासह राज्याबाहेरूनही हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Sept 30, 2025 10:36:48
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Csn farmer protest avb Feed by tvu छत्रपती संभाजी नगर मध्ये आज किसान सभा,  सिटू आणि शेतकरी मजूर युनियन यांनी कर्जमाफी आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आक्रमक आंदोलन केलं , विभागीय आयुक्त कार्यालय बाहेर हे सगळे शेतकरी आंदोलन करत होते मात्र अचानकपणे आक्रमक होत त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे मोर्चा वळवला आणि आयुक्तांच्या  दालानाबाहेर ठिय्या केला जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन करणार असा पवित्रा त्यांनी घेतला,  अखेर विभागीय आयुक्तांनी शिष्टमंडळ भेटीस बोलवलं आणि त्यांना मदतीचा आश्वासन दिलं आणि हे आंदोलन संपलं.. मात्र आश्वासनावर आम्ही थांबणार नाही आश्वासनपूर्ती झाली नाही तर आज घुसलोय पुढच्या वेळेस आणखी आक्रमक आंदोलन करू असा आंदोकानी सांगितलं... Byte अजित नवले, आंदोलक
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Sept 30, 2025 10:32:42
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Csn lion pkg Feed csn lion by tvu 2 vdo clip assignment  no वर टाकल्या आहेत... Anchor : बातमी संभाजीनगर मध्ये आणलेल्या सिंहाच्या जोडीची, कर्नाटक मधल्या शिवमोघा तुन सिंहाची जोडी आणण्यात आली आहे, आठ वर्षाचे हे सिंह आहे आणि आतापर्यंत हे कानडी भाषाच ऐकत आले आहे त्यामुळे संभाजीनगर मध्ये मराठीत बोलताना त्यांची काळजी घेणाऱ्यांचा चांगलाच कस लागतो आहे, त्यांना खाऊ घालणे त्यांना शिस्त लावणे सगळंच अडचणीचे झाले आहे मात्र यात मदत झालीय ती महापालिका आयुक्त जी श्रीकांत यांची,  आयुक्तांना कानडी येते आणि त्यामुळं त्यांची मदत प्राणि संग्रहालयातील लोकांना घ्यावी लागतेय... पाहुयात Vo 1... संभाजीनगरचा सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयाचे हे नव आकर्षण म्हणजे अर्जुन आणि सुचित्रा ही सिंहाची जोडी.. कर्नाटकातल्या शिवमोघा प्राणी संग्रहालयातून हे सिंह तीन दिवसांपूर्वी संभाजीनगर मध्ये दाखल झाले.. इथं प्राण्यांची काळजी घेण्यासाठी खास केअरटेकरही आहेत मात्र त्यांना अडचण झाली या सिंहाशी संवाद साधण्याची , कारण सिंह जन्मले तेव्हापासून कानडी ऐकतात त्यामुळे मराठी भाषेशी त्यांचा काहीही संबंध नाही आणि नेमकी हीच अडचण झाली आहे त्यांना खायला घालताना त्यांना शिस्त लावताना त्यांच्याशी संवाद साधताना भाषेची एक मोठी अडचण इथल्या काळजी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना होते , त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी संभाजीनगर महापालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांचीच मदत घेतली आहे , आयुक्त कानडी बोलू शकतात त्यामुळे या सिंहांना आयुक्त कानडी भाषेतुन बोलण्याचा प्रयत्न करताय... ( आयुक्त बोलताय आवाज फार आला नाही सिंहाचा येतोय जास्त 2 व्हीडिओ assignment व्हाट्स अँप वर टाकले आहेत ...) आयुक्त ही भाषेची अडचण येते हे मान्य करतात त्यामुळे मी स्वतः बोलण्याचा प्रयत्न करतोय आणि इथल्या कर्मचाऱ्यांनाही या भाषेचं काही प्रमाणात प्रशिक्षण देणार असल्याचं आयुक्त सांगतात आहे.. Byte जी श्रीकांत महापालिका आयुक्त Vo 2... या सिंहाला येऊन फक्त तीन ते चार दिवस झाले आहे मात्र अजूनही ते इथं रूळले नाही , नेहमीचे काळजी घेणारे नाही वरून भाषेची अडचण मात्र लवकरच सिंहांना मराठी भाषा सुद्धा कळेल त्या दृष्टीनेही प्रयत्न सुरू असल्यास महापालिका आयुक्तांनी सांगितले.. Byte जी श्रीकांत , महापालिका आयुक्त Vo 3.. असं म्हणतात की प्राण्यांना प्रेमाची भाषा पुरेसी आहे मात्र जे शब्द रोज कानावर येतात त्यांची त्यांना सवय झाली असते आणि त्यानंतर काय करायचं हे त्यांना माहिती असतं आतापर्यंत कानडी सूचना ऐकणारे हे सिंह थेट मराठी भाषा प्रदेशात आले त्यामुळे निश्चितपणे अडचण येते मात्र महाराष्ट्रात आल्यावर सिंहानाही लवकरच मराठी कळेल समजेल हीच अपेक्षा आपण करूया, आणि इथेही ते लवकरच रुळतील हीच अपेक्षा... विशाल करोळे, छत्रपती संभाजी नगर
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Sept 30, 2025 10:31:07
Amravati, Maharashtra:Feed slug :- AMT_TRIBAL_MARCH पाच फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 गळ्यात भाकर, कांदे, मिरच्यांची माळ घालत हजारो आदिवासी बांधव उतरला रत्यावर; धनगर आणि बंजारा समाजाच्या मोर्चाला प्रतिउत्तर देण्यासाठी मोर्चा अँकर :– अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर हजारो आदिवासी बांधवांनी जन आक्रोश भाकर मोर्चा काढला आहे. गळ्यात भाकर, कांदे, मिरच्यांची माळ घालत हजारो आदिवासी बांधव रत्यावर उतरले आहे. आदिवासी यांच्या राजकीय, शैक्षणिक, आर्थिक, नोकरीमध्ये घुसखोरी करणाऱ्या जातींच्या विरोधात आदिवासी समाज बांधवांनी जनआक्रोश भाकर मोर्चा काढला असून राज्यात सध्या धनगर व बंजारा समाजांनी आदिवासी समाजाचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी काढण्यात आलेल्या मोर्चाला विरोध करण्यासाठी अमरावतीमध्ये आदिवासी बांधव आक्रमक झाले आहे. हजारो आदिवासी बांधव रस्त्यावर उतरत आमच्या जातीमध्ये कोणालाही घुसू देणार नाही असा इशारा देत दिल्या जोरदार घोषणा देण्यात आला आहे. या मोर्चात त मोठ्या संख्येने आदिवासी बांधव महिला विद्यार्थी विद्यार्थिनी व कर्मचारी देखील सहभागी झाले होते. बाईट :– अर्जुन युनाते, आंदोलक
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Sept 30, 2025 10:23:14
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Sept 30, 2025 10:06:17
Raigad, Maharashtra:स्लग - आरक्षण बचावसाठी कोळी, आदिवासी बांधवांचा एल्‍गार ........ जिल्‍हाधिकारी कार्यालयावर आज धडक ......... बंजारा, धनगर समाजाला एसटी प्रवर्गात सहभागी करून घेण्यास विरोध ...... अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा ...... अँकर - रायगड जिल्ह्यातील कोळी, आदिवासी समाजाने आज अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. राज्‍यातील धनगर आणि बंजारा समाजाने अनुसूचित जमातीसाठी असलेल्‍या आरक्षणात हक्‍क सांगण्‍यास सुरूवात केली आहे. त्‍यामुळे रायगड जिल्‍ह्यातील कोळी आणि आदिवासी समाज आक्रमक झाला आहे. या मागणीला विरोध करण्‍यासाठी आज अलिबाग येथील रायगड जिल्‍हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात समाज बांधव महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. माजी सभापती दिलीप भोईर यांच्या नेतृत्वाखाली कोळी, आदिवासी समाज अलिबागमध्ये एकवटला आहे. आपल्या मागण्यांबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. जर सरकारने यासंदर्भात न्यायाची भूमिका घेतली नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. बाईट - दिलीप भोईर, माजी सभापती
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Sept 30, 2025 10:01:57
Nala Sopara, Maharashtra: Date-30sep2025 Rep-prathamesh tawade Loc-nalasopara Slug-NALASOPARA FIRE Feed snend by 2c Type-AV Slug- नालासोपाऱ्यात रस्त्याकडेच्या दुकानाला भीषण आग चंदन नाका परिसरातील घटना अँकर - नालासोपारा पूर्व चंदननाका येथील आयसीआयसीआय बँके सामोरील एका कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. दुपारी दीड वाजताच्या सुमारास ही आग लागली... दुकान मालक शटर बंद करून समोरील मशीदेत नमाज अदा करण्यासाठी गेलेला असताना ही घटना घडली. मुख्य रस्त्यावर हे अग्नितांडव सुरू असल्याने काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली होती...या आगीच्या घटनेत पहिल्या मजल्यावरील घराचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि तातडीने आगीवर नियंत्रण मिळविले आहे.. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Sept 30, 2025 09:51:24
Baramati, Maharashtra:JAVED MULANI SLUG 3009ZT_INDAPURGP FILE 2 निमगाव केतकीत ग्रामपंचायत समोर ग्रामस्थांचे रस्त्यासाठी धरणे आंदोलन.... Anchor: इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील महादेव शिव रस्ता हा अद्यापही डांबरी केला नसल्याने संतप्त नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केलेय... यापूर्वी ग्रामस्थांनी या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाल्याने गावातील बॅनरबाजी देखील केली आहे. अद्यापही रस्त्याबाबत कोणताही निर्णय न झाल्याने जाधव वस्तीतील नागरिकांनी ,विद्यार्थ्यांसह ,महिलावर्ग एकत्रित येत हलगीच्या निनादात गावातून मोर्चा काढत ग्रामपंचायत समोर धरणे आंदोलनास सुरुवात केली आहे जोपर्यंत रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून उठणार नाही असा पवित्रा देखील नागरिकांनी घेतलाय...
0
comment0
Report
Dussera 2025
Advertisement
Back to top