Back
साप चावने से चार साल की बच्ची की मौत: शास्त्री नगर अस्पताल पर आरोप
ABATISH BHOIR
Sept 30, 2025 09:37:35
Kalyan, Maharashtra
साप चावल्याने चार वर्षीय बालिकेचा मृत्यू ,उपचार घेत असलेल्या मावशीचाही मृत्यू
शास्त्री नगर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा कुटीबीयांचा आरोप
कुटुंबीय आक्रमक.. केडीएमसी वैद्यकीय अधिकाऱ्याच्या दालनात ठिय्या आंदोलन करत केली कारवाईची मागणी
साप चावल्यानंतर उपचारादरम्यान ४ वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना डोंबिवलीत घडली होती तर या मुलीच्या मावशीला देखील साप चावल्याने तिचा कळवा येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला .या घटनेनंतर मयत मुलीच्या कुटुंबीयांनी केडीएमसीच्या शास्त्री नगर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे या दोघींचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप केला .संतापलेल्या कुटुंबीयांनी आज केडीएमसी आरोग्य विभागाच्या दालनात ठिय्या आंदोलन करत संताप व्यक्त केला .या दोघींचा मृत्यू शास्त्री नगर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप करत उपचारात हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी केली त्यामुळे केडीएमसीचा आरोग्य विभाग पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे .या प्रकरणी चौकशी करून अहवाल आल्यानंतर संबंधित दोषींविरोधात कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन देण्यात आल्या नंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र दोषीवर कारवाई केली नाही तर दोन्ही हॉस्पिटल ला टोळे ठोकन्याचा इशारा नातेवाईकांनी दिला.
Vo..डोंबिवली जवळील आजदे गावातील भागीरथी अपार्टमेंटमध्ये आपल्या कुटूंबासह राहणारी प्राणगी विकी भोईर ( ४) शनिवार-रविवार सुट्टी असल्यामुळे खंबाळपाड्यात राहणाऱ्या तिची मावशी श्रुती ठाकूर (२४ ) कडे पाहुणी म्हणून राहण्यासाठी गेली होती.
मावशी श्रुती अनिल ठाकूर ( २३) हिच्या जवळ प्राणगी झोपली असताना पहाटे पाच वाजता दोघींनाही सापाने दंश केला.विषारी दंशानंतर प्राणगीला तातडीने महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दवाखान्यात केले तेथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तर मावशीला प्रथम केडीएमसीच्या पश्चिम डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर झाल्याने तिला ठाणे सिव्हील हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले तेथे अतिदक्षता विभागात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला .दरम्यान, मृत मुलीच्या कुटुंबीयांनी शास्त्रीनगर रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. या दोघींवर केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात योग्य ते उपचार न झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप मयत मुलींच्या कुटुंबीयांनी केला .आज मयत मुलींच्या कुटुंबीय सत्यवान म्हात्रे ,राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष भालचंद्र पाटील कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी दीपा शुक्ल यांचे कार्यालय गाठले . कार्यालयातच ठिय्या आंदोलन करत या मुलींच्या मृत्यूस जबाबदार असलेल्यांवर कारवाई करा, गुन्हे दाखल करा अशी मागणी केली .जवळपास दीड ते दोन तास ठिय्या आंदोलन कार्यालयात सुरू होतं त्यानंतर केडीएमसीच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले
Byte... सत्यवान म्हात्रे
नातेवाईक
Byte... भालचंद्र पाटील
राष्ट्रवादी कॉग्रेस डोंबिवली शहर अध्यक्ष
Byte.. दिपा शुक्ल
मुख्य वैदकीय अधिकारी केडीएमसी
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 30, 2025 11:30:320
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowSept 30, 2025 11:18:010
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowSept 30, 2025 11:17:530
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowSept 30, 2025 11:17:150
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowSept 30, 2025 11:17:040
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 30, 2025 10:37:560
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 30, 2025 10:36:480
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowSept 30, 2025 10:33:280
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 30, 2025 10:32:420
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowSept 30, 2025 10:31:070
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 30, 2025 10:23:140
Report
0
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowSept 30, 2025 10:06:170
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowSept 30, 2025 10:01:570
Report
JMJAVED MULANI
FollowSept 30, 2025 09:51:240
Report