Back
वर्धा नदी के बामर्डा घाट पर अवैध रेती उत्खनन के विवाद में एक की मौत
AAASHISH AMBADE
Mar 02, 2026 05:46:25
Chandrapur, Maharashtra
अवैध रेती उत्खनन आणि सीमांकनाच्या वादावरून तस्करांच्या दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झालीये. हाणामारीत एकाचा मृत्यू तर दोन जखमी झाले आहेत. वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील रहिवासी भारत नागपाल (40) असं मृतकाचं नाव असून तो वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील रहिवासी आहे. चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर वरोरा तालुक्यातील वर्धा नदीच्या तीरावर असलेल्या बामर्डा घाटावर काल रात्री हा प्रकार घडला. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात असलेल्या वर्धा नदीच्या ढिवरी-पिपर येथील रेती घाटाचा शासनाकडून लिलाव झाला होता. मात्र या घाटावरून रेती उत्खनन आणि सीमांकनावरून वर्धा जिल्ह्यातीलच दोन गटांमध्ये काल रात्री वाद झाला. मारामारी करत हे सर्व चंद्रपूर जिल्ह्यासोबतच्या हद्दीत आले आणि या ठिकाणी धारदार शस्त्राच्या वापरात नागपालचा मृत्यू झाल्याचे बोलले जाते. रात्री उशिरा झालेल्या या प्रकाराने महसूल- पोलीस हादरले. वरोरा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. वर्धा जिल्ह्यातील वडनेर पोलिसांनी अटक केलेल्या 3 लोकांना वरोरा पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले आहे. मृतक नागपाल याचा मृतदेह हिंगणघाट येथे नेण्यात आल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VKVISHAL KAROLE
FollowMar 02, 2026 07:16:320
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 02, 2026 06:45:180
Report
KJKunal Jamdade
FollowMar 02, 2026 06:36:150
Report
KPKAILAS PURI
FollowMar 02, 2026 06:35:530
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 02, 2026 06:32:390
Report
AKAMAR KANE
FollowMar 02, 2026 06:00:180
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 02, 2026 06:00:070
Report
AKAMAR KANE
FollowMar 02, 2026 05:49:320
Report
PNPratap Naik1
FollowMar 02, 2026 05:48:550
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 02, 2026 05:48:260
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 02, 2026 05:47:220
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 02, 2026 05:30:460
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 02, 2026 05:17:000
Report
AKAMAR KANE
FollowMar 02, 2026 05:05:200
Report
