Back
पंढरपुर के विकट कॉरिडोर मसौदे पर व्यापारी-नागरिकों का विरोध, नुकसान मुआवले पर चर्चा जारी
SKSACHIN KASABE
Mar 02, 2026 06:32:39
Pandharpur, Maharashtra
पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात होणाऱ्या प्रस्तावित कॉरिडॉर प्रकल्पाला पालकमंत्र्यांच्या समितीने मान्यता दिली आहे. त्यामुळे हा प्रकल्प होणार या वर आता शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र दुसरीकडे या प्रकल्पात बाधित होणाऱ्या व्यापारी आणि नागरिकांनी आज मंदिर परिसर बंद ठेवून या प्रकल्पाला विरोध केला आहे.
राज्य भरातून येणाऱ्या वारकरी आणि भाविकांना पंढरपूर मध्ये आल्यानंतर सुलभपणे दर्शन घेता यावे. यासाठी मंदिर परिसरात कॉरिडॉर प्रकल्प करण्यात येणार आहे. उज्जैन, वाराणसी धर्तीवर पंढरपूर तीर्थक्षेत्राचा विकास करून जागतिक पातळीवर नेण्यासाठी शासनाचा प्रयत्न आहे. यातही चार हजार कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे.
या प्रकल्पात मंदिर परिसरातील 630 घरे आणि दुकाने पाडली जाणार आहेत. मंदिर केंद्र बिंदू येऊन अंदाजे १०० मीटर परिघात विकास केला जाणार आहे. बाधितांना मोबदला देण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी बाधितांशी संवाद साधून त्यांना समाधानकारक मोबदला देण्याबद्दल चर्चा केली आहे. यांमध्ये अनेक बाधितांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
आज कॉरिडॉर विरोध करताना या सहभागी नागरिकांनी आम्हाला मोबदला नको. या परिसरात आम्ही वर्षानुवर्ष रहिवाशी आहे. त्यामुळे कॉरिडॉर करून आम्हाला उध्वस्त करू नका अशी मागणी केली आहे. यामुळे मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांनी आज दुकाने बंद ठेवून या कॉरिडॉर प्रकल्पाला विरोध केला आहे.
संत नामदेव पायरी पासून बाधित नागरिकांनी मोर्चा काढला. तहसील कार्यालय येथे जाऊन प्रशासनाला या प्रकल्पाला विरोध असल्याचे निवेदन मोर्चा काढणाऱ्या आंदोलकांनी दिले.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
LBLAILESH BARGAJE
FollowMar 02, 2026 07:46:380
Report
AKAMAR KANE
FollowMar 02, 2026 07:36:190
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 02, 2026 07:34:370
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 02, 2026 07:34:240
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 02, 2026 07:34:090
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 02, 2026 07:33:550
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 02, 2026 07:16:320
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 02, 2026 06:45:180
Report
KJKunal Jamdade
FollowMar 02, 2026 06:36:150
Report
KPKAILAS PURI
FollowMar 02, 2026 06:35:530
Report
AKAMAR KANE
FollowMar 02, 2026 06:00:180
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 02, 2026 06:00:070
Report
AKAMAR KANE
FollowMar 02, 2026 05:49:320
Report
PNPratap Naik1
FollowMar 02, 2026 05:48:550
Report
