Back
मराठवाड़े के वरिष्ठ विचारक डॉ. जे.एम. वाघमारे का निधन, शिक्षा क्षेत्र में शोक
VBVAIBHAV BALKUNDE
Mar 02, 2026 05:17:00
Latur, Maharashtra
लातूर ब्रेकिंग न्यूज...
स्किप्ट ::- ज्येष्ठ विचारवंत डॉ. जे. एम. वाघमारे यांचे वृद्धापकाळाने निधन... माजी खासदार आणि माजी कुलगुरूंच्या जाण्याने शैक्षणिक क्षेत्रात शोककळा...
AC ::- लातूर जिल्ह्याचे ज्येष्ठ विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, माजी खासदार आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. जे. एम. वाघमारे यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. डॉ. वाघमारे यांनी शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान देत मराठवाड्यातील उच्च शिक्षणाला नवी दिशा दिली. कुलगुरू म्हणून कार्य करताना त्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधन आणि सामाजिक बांधिलकी यावर विशेष भर दिला. राजकारणातही त्यांचा प्रवास उल्लेखनीय राहिला. लातूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आणि पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यसभेवर खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले. स्थानिक स्वराज्य संस्थेपासून ते संसदेपर्यंतचा त्यांचा प्रवास प्रेरणादायी मानला जातो. खासदार म्हणून त्यांनी लोकहिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडले. त्यांच्या पार्थिवावर औसा तालुक्यातील त्यांच्या मूळगावी कवठा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. विविध क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी आणि नागरिक त्यांच्या अंतिम दर्शनासाठी उपस्थित राहणार आहेत.
डॉ. वाघमारे यांच्या निधनाने मराठवाड्याने एक प्रगल्भ विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ आणि दूरदृष्टी असलेला नेता गमावला आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSACHIN KASABE
FollowMar 02, 2026 06:45:180
Report
KJKunal Jamdade
FollowMar 02, 2026 06:36:150
Report
KPKAILAS PURI
FollowMar 02, 2026 06:35:530
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 02, 2026 06:32:390
Report
AKAMAR KANE
FollowMar 02, 2026 06:00:180
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 02, 2026 06:00:070
Report
AKAMAR KANE
FollowMar 02, 2026 05:49:320
Report
PNPratap Naik1
FollowMar 02, 2026 05:48:550
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 02, 2026 05:48:260
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 02, 2026 05:47:220
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 02, 2026 05:46:250
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 02, 2026 05:30:460
Report
AKAMAR KANE
FollowMar 02, 2026 05:05:200
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 02, 2026 05:00:210
Report
