Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chandrapur442401

चंद्रपूर में जनविकास सेना का आरोप, आयुक्त को 'अपमानपत्र' से हिला भ्रष्टाचार का पर्दाफाश

AAASHISH AMBADE
Nov 13, 2025 06:04:22
Chandrapur, Maharashtra
चंद्रपूर शहरातील बागला चौक ते राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय या रस्ता दुभाजकाच्या कामातील प्रचंड गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ जनविकास सेनेने चंद्रपूर महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांना “अप-मानपत्र” देऊन मनपातील महाभ्रष्ट अधिकाऱ्यांचा “जाहीर धुत्कार” केला. देशमुख यांनी मनपाचे सहायक अभियंता आशिष भारती यांच्यासोबत केलेल्या संयुक्त पाहणीचा अहवाल आयुक्त गायकवाड यांना दिला. तांत्रिक उपकरण, वजन काटा,टेप इत्यादी साहित्य घेऊन कामाच्या अंदाजपत्रकांनुसार स्पॉट पंचनामा केला. यावेळी साहित्याच्या प्रमाणात मोठ्या तफावती आढळल्या. अंदाजपत्रकात दाखवलेले स्टील, सिमेंट, व वृक्षलागवडीचे प्रमाण वास्तवापेक्षा तीनपट वाढवून दाखवले असल्याचे स्पष्ट झाले. तसेच दुभाजकाची लांबी आणि खर्च कृत्रिमरीत्या वाढवून 3.56 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचे पुरावे सादर करण्यात आले. या एका दुभाजकाच्या देखभालीसाठी वर्षाला 57 लक्ष रूपये खर्च अंदाजपत्रकामध्ये नमूद आहे तर दुसरीकडे शहरातील 88 बगीचे,8 डिवाइडर व 13 सौंदर्यकरणाचे स्थळ यांची देखभाल करण्यासाठी मनपा एका कंत्राटदाराला वर्षाला केवळ एक कोटी रुपये देते.
149
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
WJWalmik Joshi
Nov 13, 2025 07:20:40
Jalgaon, Maharashtra:जळगाव माध्यमिक शालेय अभ्यासक्रमात वाणिज्य विषय सहभागी होण्याची शक्यता भारतीय सनदी लेखाकार समितीने शिक्षण मंत्री दादा भुसे यांची भेट घेतली वाणिज्य विषय माध्यमिक अभ्यासक्रमात सहभागी करण्याबाबत शिक्षण मंत्री सकारात्मक असल्याचे शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांकडे तात्काळ प्रस्ताव सादर करण्याच्या केल्या सूचना माध्यमिक शालेय अभ्यासक्रमात पुढील वर्षात वाणिज्य विषयाचा सहभाग होण्याची शक्यता असून भारतीय सनदी लेखाकर समितीच्या वतीने याबाबत शिक्षण मंत्री दादा भुसे यांची भेट घेतली इस भेटीदरम्यान दादा भुसे यांनी वाणिज्य विषय अभ्यासक्रमात सहभागी करण्याबाबत सकारात्मक असल्याचेही भारतीय सनदी लेखाकार समितीने स्पष्ट केले आहे. तर याबाबत 19 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांकडे समिती प्रस्ताव सादर करणार असून या प्रस्तावानंतर पुढील वर्षाच्या माध्यमिक शालेय अभ्यासक्रम आत वाणिज्य विषय सहभागी होण्याची शक्यता आहे.
1
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Nov 13, 2025 07:08:37
Pune, Maharashtra:अहिल्यानगर तालुक्यातील खारे कर्जुने गावात बिबट्याने रियांका पवार या पाच वर्षीय मुलीला उचलून नेल्याची घटना घातलीये...दरम्यान ग्रामस्थांच्या मागणीनंतर वनविभागाने परिसरात पिंजरा लावण्यात आलाय...मात्र खारे कर्जुने येथे लावण्यात आलेला पिंजरा नादुरुस्त असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे... गावाच्या परिसरात सहा ते सात इंग्रजी आवश्यकता आहे असं असताना तीन दिवसांपूर्वी ग्रामस्थांनी स्वखर्चाने एक पिंजरा घेऊन आले आहेत मात्र त्या पिंजऱ्याला स्टॉपर नसल्याने ग्रामस्थांनी जुगाड केलाय...आढावा घेत ग्रामस्थांशी संवाद साधलाय आमचे अहिल्यानगर प्रतिनिधी लैलेश बारगजे यांनी
1
comment0
Report
KJKunal Jamdade
Nov 13, 2025 06:32:09
Shirdi, Maharashtra:Anc - साईबाबांच्या दर्शनानंतर अंध मुलाला दृष्टी मिळाल्याचा दावा केला जातोय.. उत्तराखंड येथील एक कुटुं ल शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आले होते.. 10 वर्षीय मुलाला जन्मापासूनच एका डोळ्याने दिसत नव्हते, द्वारकामाईत दर्शन केल्यानंतर हा चमत्कार झाल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे.. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मात्र साईब बाबा संस्थानने या कथित चमत्काराला थारा देऊ नये असं म्हटलंय.. सत्यशोधनासाठी आम्ही साईबांबाचे भक्त असलेले पाच नेत्रहीन व्यक्ती पुरवतो.. त्यांना चमत्काराने दृष्टी आल्यास आम्ही जनतेतुन गोळा केलेले एकवीस लाखाचे बक्षीस देऊ आणि आमची चळवळ बंद करु असे आव्हान अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाहक कृष्णा चांदगुडे यांनी दिलंय.
1
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 13, 2025 06:31:46
1
comment0
Report
SMSarfaraj Musa
Nov 13, 2025 05:47:36
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - कोल्हापूर पाठोपाठ सांगलीतील राष्ट्रवादी एकजूट,जत मध्ये भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात आघाडी.. नगरपरिषदेसाठी एकत्रित लढण्यात येणार असल्याचा जाहीर केला आहे.त्याचबरोबर नगराध्यक्षपद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सुरेश शिंदे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.त्याच बरोबर या निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी घड्याळ चिन्हावर लढवणार असल्याचेही माजी आमदार विलासराव जगताप यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादीच्या या आघाडीमध्ये बसपा देखील असा सामील झाली आहे. बाईट - विलासराव जगताप - माजी आमदार - राष्ट्रवादी अजित पवार पक्ष . बाईट - सुरेश शिंदे - नेते,राष्ट्रवादी शरद पवार पक्ष व नगराध्यक्ष उमेदवार नगरपरिषद - जत.
118
comment0
Report
Advertisement
Back to top