Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chandrapur442401

चंद्रपुर जिले में मानव-वन्यजीव संघर्ष रोकने के लिए गुराखी- किसानों को सुरक्षा सामग्री वितरित

AAASHISH AMBADE
Nov 16, 2025 06:18:11
Chandrapur, Maharashtra
चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यांपासून बचावासाठी गुराखी आणि ग्रामस्थांना संरक्षक साहित्याचे वितरण, त्रिशूल असलेली काठी, इलेक्ट्रिक करंट असलेली स्टिक, मानवी मुखवटे आणि घुंगरू असलेल्या काठीचे वितरण चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही वर्षात मानव-वन्यजीव संघर्ष टोकाला गेला आहे. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये ग्रामीण भागातील नागरिक, विशेषतः शेतात काम करणारे शेतकरी आणि गुराखी हे बळी पडतात. यावर उपाय म्हणून सावली वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये गुराखी आणि ग्रामस्थांना त्रिशूल असलेली काठी, इलेक्ट्रिक करंट असलेली स्टिक, मानवी मुखवटे आणि घुंगरू असलेल्या काठी यासह इतर साहित्य वाटप करण्यात आले आहे. या साहित्यामुळे अचानक वन्यप्राण्यांचा हल्ला झाल्यास बचाव करणे सोपं जाते. त्यामुळे काही प्रमाणात तरी मानव-वन्यजीव संघर्ष टाळता येईल ही अपेक्षा आहे. बाईट १) विनोद धुर्वे, वनपरिक्षेत्राधिकारी, सावली आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
202
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAABHISHEK ADEPPA
Nov 16, 2025 07:46:15
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - तब्बल दीड वर्षानंतर सोलापूर शहरात शरद पवार आणि सुशिलकुमार शिंदे येणार एकाच व्यासपीठावर तब्बल दीड वर्षानंतर सोलापूर शहरात शरद पवार आणि सुशिलकुमार शिंदे येणार एकाच व्यासपीठावर माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे सोलापुरात दिसणार एकत्र लोकसभा निवडणूकीपूर्वी शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांची सोलापुरात झाली होती भेट आज सोलापूर शहराचे माजी महापौर ऍड.यु.एन.बेरिया यांच्या 'सुवर्णपथ' या गौरवग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याला असणार दोघांची हजेरी या भेटी नंतर कांही तासांच्या अंतराने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष महेश गादेकर यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्याला ही असणार दोघांची उपस्थिती त्यामुळे एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांना देशातील दिग्गज नेत्यांची भेट होणार असल्याने चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे.
93
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 16, 2025 07:45:11
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:सीएम देवेंद्र फडणवीस महायुती पर परवा पर्यंत चित्र स्पष्ट होईल, स्थानिक पातळीवर चर्चा होत आहे. जागा वाटप जिल्ह्यामध्ये होते सोयी प्रमाणे युती होईल, कुठे कुठे निर्णय झाले आहेत, तिथे तिथे निर्णय होतील, याबाबत सगळं निर्णय स्थानिक पातळीवर होईल, महापालिके बाबत निर्णय वेगळा आहे त्याबाबत राज्यात बैठक घेऊन निर्णय होईल... प्रफुल पटेल म्हणाले त्यांच्या रोख आमच्याकडे नाही, और अजित पवार जे म्हणाले ते खरंय बिहार निवडणुकीची त्यांची तयारी नव्हती आणि त्यांची इच्छा पण नव्हती... सगळे तोंड पाहणार, समाज माध्यमांवर आलेले मॅप जुने आहेत, अंतिम आराखडा आल्यावर बदल होतील. चिंता करु नाका पुणे highway दूरअवस्था त्याची दखल आम्ही घेतली आहे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला सांगितले आहे, दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेतोय... वसई किल्ला पार्टी पार्टीचा व्हिडिओ पाहिला नाही, मात्र माहिती घेतली आहे, कारवाईचे निर्देश दिले आहेत,
46
comment0
Report
SGSagar Gaikwad
Nov 16, 2025 07:32:14
46
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 16, 2025 07:20:25
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - इंस्टाग्राम स्टोरी ठेवत सोलापुरातील तरुणाने संपवले जीवन अँकर - सोलापूर शहरातील सुशील नगर, विजापूर रोड येतील १८ वर्षीय तरुणाने राहत्या घर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. योगेश अशोक ख्यागे (वय १८, रा. सुशील नगर, विजापूर रोड, सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. Nरेवाईकांनी योगेशला बेशुद्ध अवस्थेत खाली उतरवले आणि तात्काळ सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले. आत्महत्येपूर्वी योगेशने इंस्टाग्रामवर एक स्टोरी अपलोड केली होती. त्यात त्याने लिहिले होते,“मरायच्या आधी सर्वांच्या मनातून उतरून जायचं आहे मला, जेणेकरून मी मेल्यानंतर कोणी माझी आठवण नाही काढली पाहिजे.. घटनेच्या वेळी योगेशचे आई-वडील नातेवाईकांकडे गेले होते, तर तो घरात एकटाच होता. योगेश एका बेकरी दुकानात काम करत होता, तर त्याचे वडील वॉचमन म्हणून काम करतात. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि मित्रांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, योगेशच्या जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
67
comment0
Report
SKSudarshan Khillare
Nov 16, 2025 07:00:30
Niphad, Maharashtra:नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसा घरफोड्या आणि चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर निफाड तालुक्यातील चेहडी गावाने एक अनोखा निर्णय घेतला आहे. गावात चोरी, संशयास्पद हालचाली आणि फिरस्त्या व्यक्तींच्या वर्दळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गावाच्या प्रवेशद्वारावरच ‘फेरीवाले, भंगारवाले, भोंदू साधू—प्रवेश बंदी’ असा फलक लावण्यात आला आहे. या फलकामुळे गावात अनोळखी आणि संशयित लोकांची ये-जा रोखली जाणार असून ग्रामस्थांनी हा निर्णय एकमताने घेतल्याची माहिती मिळते. या संदर्भात आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी
63
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 16, 2025 06:00:13
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरातील आकाश - अंजलीबाई यांच्या संघर्षमय प्रेमकथेची देशभरात होतेय चर्चा ( PKG ) - सोलापुरातील आकाश - अंजलीबाई या रीलस्टारची अंगावर शहारे आणणारी प्रेमकथा - अंजली आणि आकाश नारायणकर यांनी सोशल मीडियावर अंजलीबाई नावाने सुरू केलेल्या रील्सना देशभरातून तुफान प्रतिसाद - अंजलीबाई आणि आकाशच्या संघर्षमय प्रेम कहानीची तेलगू फिल्म इंडस्ट्रीज ने घेतली दखल - अंजलीबाई आणि आकाशचा प्रेमकथेवर आधारित लव यू मुद्दू नावाचा तेलगू चित्रपट दक्षिण भारतात नुकताच प्रदर्शित - बाईट - अंजली नारायणकर ( रीलस्टार ) अंजली आणि आकाश यांच्या प्रेमाची चर्चा आता देशभरात होतेय... प्रेमात किती ताकत असते हे या दोघांनी दाखवून दिलय... आयुष्यात छोट्या-मोठ्या संकटांना डगमगून न जाता त्याला कशा पद्धतीने सामोरे गेला पाहिजे याच उत्तम उदाहरण म्हणजे अंजली आणि आकाश.... ( अभिषेक आदेप्पा, सोलापूर प्रतिनिधी )
274
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Nov 16, 2025 05:33:01
Akola, Maharashtra:अकोल्यात भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा उत्साहात काढण्यात आली. या शोभायात्रेत आदिवासी समाजाच्या परंपरा, संस्कृती आणि जीवनमानाचे दर्शन घडवणारे विविध देखावे आकर्षणाचे केंद्र ठरले. शोभायात्रेत पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या आदिवासी बांधवांनी नृत्य आणि गायनाच्या माध्यमातून आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची सुंदर प्रस्तुती केली. ढोल, मांदरी आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात सादर झालेल्या नृत्याविष्कारांना प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मोठ्या संख्येने आदिवासी बांधवांनी सहभाग घेतल्यामुळे शोभायात्रेला विशेष उत्साह लाभला. संपूर्ण शहरात सांस्कृतिक जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते. भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मृतीस वंदन करीत आदिवासी समाजाने सामाजिक ऐक्याचा संदेश या माध्यमातून दिला.
136
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 16, 2025 05:16:13
146
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Nov 16, 2025 05:15:48
166
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Nov 16, 2025 05:00:17
Satara, Maharashtra:अँकर-म्हसवड मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करत जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे यांच्या आघाडीचे नगराध्यक्षासह आठ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.शेखर गोरे यांचे बंधू सार्वजनिक बांधकाम मंत्री जयकुमार गोरे यांनी भाजपच्या चिन्हावर ही निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत.असे असताना शेखर गोरे यांच्या गटाकडून नगराध्यक्ष पदासह आठ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने म्हसवड मधील राजकीय वातावरण आता ढवळून निघाले आहे.आत्ताच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये शेखर गोरे यांनी बंधू जयकुमार गोरे यांना जाहीर पाठिंबा दिल्याने जयकुमार गोरे यांचा विजय सोपा झाला होता.परंतु आता म्हसवड मध्ये शेखर गोरेंच्या गटाने आपली वेगळी चूल मांडल्याने भाजपच्या चिंतेत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
271
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Nov 16, 2025 04:47:02
Pune, Maharashtra:Headline -लोणावळ्यात आमदार सुनील शेळके यांनी केली माजीमंत्री बाळा भेगडे यांच्यावर सडकून टीका Anchor: लोणावळा शहरात राष्ट्रवादी काँग्रेसने भव्य शक्तिप्रदर्शन करत निवडणुकीतील आपली ताकद दाखवली. रॅलीदरम्यान आमदार सुनील शेळके यांनी भाजपवर जोरदार प्रहार केला. नाव न घेता माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा पलटूराम म्हणत एकेरी शब्दांत उल्लेख केला तसेच लोणावळ्यातील युतीचा फार्मूला भाजप च्या कोर कमिटीने फेटाळून लावला. त्यामुळे आमदार सुनील शेळके यांनी तळेगांवच्या निवडणूका स्वबळावर लढण्याची तयारी केली असता, भाजपच्या गोटात भिती बसली आणि अनेक भाजप नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी रांगेत उभे होते असा खळबळजनक आरोप आमदार शेळकेंनी बाळा भेगडे यांच्यावर नाव न घेता केला. भाजपची राजकीय तळेगांव येथील परिस्थिती पाहता भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात युती पॅटर्न करण्यात आलं..यात राष्ट्रवादीला १७ जागा तर भाजपला ११ जागांवर समाधान मानावे लागले, तर भाजपचा नगराध्यक्ष तळेगांव मध्ये लढण्यास तयार झालाय त्यामुळे तळेगांव जरी युती पॅटर्न असेल तरी लोणावळा आणि वडगांव स्वबळावर लढण्याची तयारी राष्ट्रवादी आणि भाजपने केलीये. यामुळे लोणावळ्यातील राजकीय समीकरणं आता नव्या वळणावर गेली आहेत. साऊंड बाईट :सुनील शेळके, आमदार (file no.03)
130
comment0
Report
Advertisement
Back to top