Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001
नाशिक में बिडी भालेकर स्कूल के विश्रामगृह विवाद पर मोर्चा टला: शिक्षा मंत्री के आश्वासन के बाद
SGSagar Gaikwad
Nov 16, 2025 07:32:14
Nashik, Maharashtra
नाशिक ब्रेकिंग... नाशिकमधली बिडी भालेकर शाळेच्या ठिकाणी विश्रामगृह उभारण्याचा पालिका प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाला शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंकडून स्थगिती... शाळा बचाव समितीकडून बुधवारी पालिका प्रशासना विरोधात एल्गार मोर्चाची सुरू होती तयारी... शालेय शिक्षण मंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर शाळा समितीकडून आंदोलन स्थगित, शाळेच्या ठिकाणी पुन्हा शाळा उभारणार दादा भुसेंचे आश्वासन... बिडी भालेकर शाळेची नाशिकमधली पहिली मराठी माध्यमिक शाळा म्हणून ओळख... याबाबत आंदोलकांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी
53
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SNSWATI NAIK
Nov 16, 2025 09:16:00
Navi Mumbai, Maharashtra:नेरुळ येथे मनसे नेते अमित ठाकरे आक्रमक. अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेचे आक्रमक आंदोलन. नेरूळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभारण्यात आलेल्या महाराजांच्या पुतळ्याचे मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते प्रतिकात्मक अनावरण. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर घालण्यात आलेला पडदा फाडून टाकत महाराजांची मूर्ती केली मोकळी. महाराजांच्या मूर्तीला पाण्याने धुवून अमित ठाकरे यांनी पुष्पहार घालत महाराजांच्या पुतळ्याचे केले अनावरण. चार महिन्यांपासून महाराजांना अशा अवस्थेत ठेवण्यात आले ते मला पहावल नाही. अनेक नेते विविध कार्यक्रमांसाठी आले मात्र त्यांना महाराजांच्या मूर्तीचे अनावरण करण्यासाठी वेळ मिळत नव्हता. याप्रकरणी माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरी चालेल महाराजांसाठी गुन्हा घेण्यास तयार. बाईट - अमित ठाकरे - मनसे नेते
21
comment0
Report
SMSarfaraj Musa
Nov 16, 2025 09:04:09
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - विरोधकांचे माझ्यावर विशेष प्रेम, म्हणून मी टार्गेट - जयंत पाटलांच्या विरोधकांना चिमटा.. अँकर - मला टार्गेट वर्ग करतात,कारण माझ्यावर विशेष प्रेम आहे,पण माझ्या ऐवजी विरोधकांनी ईश्वरपूरच्या विकासला टार्गेट करावा,असा टोला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी विरोधकांना लगावला आहे. गेल्या 9 वर्षात ईश्वरपूर शहराचा विकास विरोधकांना करता आला नाही त्यावर विरोधकांनी बोललं पाहिजे आपण आणलेल्या विकास कामे देखील पूर्ण झाले नाहीत,त्यावर विरोधकांनी बोलायला हवं,असा आवाहन देखील आमदार जयंत पाटलांनी विरोधकांना केला आहे.ईश्वरपूर नगर परिषदेसाठी महायुतीतील आणि ईश्वरपुर मधील सर्व विरोधक जयंत पाटलांच्या विरोधात एकवटले आहेत,त्यामुळे चुरशीने निवडणूक पार पडत आहे. बाईट - जयंत पाटील - आमदार - राष्ट्रवादी - शरद पावर पक्ष.
50
comment0
Report
SMSarfaraj Musa
Nov 16, 2025 09:03:06
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - उरुण-ईश्वरपुरसाठी राष्ट्रवादीकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दाखल.. अँकर - सांगलीच्या उरूण ईश्वरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदाची उमेदवारी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे.राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आनंदराव मलगुडे यांना उमेदवारी देण्यात आली असून आमदार जयंत पाटलांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यात आला आहे.उरुण ईश्वरपूरनगर परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस संयुक्तपणे आघाडी करत निवडणूक लढवत आहेत.तर त्यांच्या विरोधात महायुती आणि जयंत पाटलांचे विरोधक एकत्रित आले आहेत.त्यामुळे अत्यंत चुरशीने नगराध्यक्ष पदासह इतर जागांसाठी लढत होत आहे. बाईट - जयंत पाटील - आमदार - राष्ट्रवादी शरद पवार पक्ष.
47
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Nov 16, 2025 08:46:50
Chendhare, Alibag, Maharashtra:भरत गोगावलेंच्या मतदारसंघात तटकरेंचे जोरदार शक्तिप्रदर्शन...... महाडमध्ये राष्ट्रवादी , भाजप युती कडून उमेदवारी अर्ज दाखल..... सुनील तटकरेंनी शिवसेनेच्या आमदारांना सुनावले.... जिल्ह्यातील महायुतीत चांगलेच वाजले आहे जिल्ह्यातील नगर पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस ने शिवसेनेला बाजूला ठेवून भाजप सोबत युती केली मंत्री भरत गोगावले यांच्या मतदारसंघातील महाड नगर पालिकेसाठी राष्ट्रवादी , भाजप युतीने आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी खासदार सुनील तटकरे , भाजपचे जिल्हाध्यक्ष व खासदार धैर्यशील पाटील उपस्थित होते. तटकरे यांनी यावेळी शिवसेनेच्या आमदारांनी केलेल्या वक्तव्याची दखल घेत चांगलेच सुनावले अश्लाघ्य शब्दांत टिका करून सुरूवातीपासूनच राष्ट्रवादी सोबत युती नको अशी भूमिका शिवसेनेने घेतली त्यामुळे जिल्ह्यात भाजप व राष्ट्रवादीने युती केल्याचे सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले
101
comment0
Report
KJKunal Jamdade
Nov 16, 2025 08:46:22
Shirdi, Maharashtra:कारमधुन एक कोटी रक्कम जप्ती प्रकरण UPDATE - संगमनेर तालुक्यातील खांडगाव फाटा येथे काल एका कार मध्ये आढळले होते एक कोटी रुपये ... निवडणुक सर्वेक्षण पथकाने तपासणी दरम्यान केली होती रक्कम हस्तगत... पकडलेली रक्कम अजमेरा ‌आणि अक्षया कंस्ट्रक्शन कंपनीची असल्याची माहीती... बँक व्यवहार , सर्व डिटेल्स संबधित कंपन्याकडे आहेत... धाराशिव येथील बँकेतून पैसे काढल्याची माहीती... सर्वेक्षण आणि पोलिस पथकाने वाहनातून रक्कम ताब्यात घेत तीची मोजदाद करून रात्री उशिरा निवडणुक अधिका-यांकडे केली सुपुर्द... निवडणुक अधिका-यांकडून पडताळणी झाल्यानंतर सदर रक्कम सोमवारी कंपनीला हस्तांतरित होणार असल्याची माहीती... सदर रक्कम निवडणुक गैर कामासाठी नसल्याचा प्राथमिक अंदाज...
100
comment0
Report
SMSamruddhi M Kolhe
Nov 16, 2025 08:45:58
Karjat, Maharashtra:रायगड फ्लॅश नगरपालिका राजकीय धुरळा कर्जत माथेरान खोपोली नगरपालिकेवर राष्ट्रवादीचाच झेंडा फडकणार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांना विश्वास कर्जत मध्ये उबाठा सोबतच अजित दादांची राष्ट्रवादी लढण्याचे संकेत.. रायगड मध्ये कर्जत माथेरान आणि खोपोली नगरपालिकेवर राष्ट्रवादीचा च झेंडा फडकेल असा विश्वास अजित दादांच्या राष्ट्रवादीचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी व्यक्त केलाय. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कर्जत माथेरान आणि खोपोली नगरपालिकेवर राष्ट्रवादीने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत युती केली असून सुनील तटकरे यांचा राजकीय डाव आमदार महेंद्र थोरवे यांना पराभूत करण्यासाठी यशस्वी ठरेल का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. शिवाय शिंदें सेनेची साथ सोडून अजित दादांची राष्ट्रवादीत गेलेल्या माजी नगराध्यक्ष सुनील पाटील यांना राष्ट्रवादीकडून पुन्हा खोपोली नगरपालिकेसाठी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आलीय. त्यामुळे त्यांच्या रुपात राष्ट्रवादीला पुन्हा बळकटी मिळणार असल्याने राष्ट्रवादीची बाजू मजबूत झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे या तिन्ही नगरपालिकेवर शिंदे सेना विरुद्ध अजित दादांची राष्ट्रवादी सामना रंगणार आहे.
108
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Nov 16, 2025 08:33:45
Chendhare, Alibag, Maharashtra:रायगडच्या राजकारणात नवीन ट्रेंडची चर्चा आहे. आमदार महेंद्र दळवी यांच्या वक्तव्याने खळबळ उडवली. आमचा पक्ष तर बुडणारच पण सोबतच्या पक्षालाही घेऊन बुडणार असा नवीन ट्रेंड रायगडच्या राजकारणात एका कुटुंबामुळे सुरू झाल्याचं वक्तव्य शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी केलंय. आमदार दळवी यांचा रोख तटकरे कुटुंबाकडे असल्याची चर्चा रायगडच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. लोकसभा आणि विधानसभा एकमेकाच्या गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातून सध्या विस्तव जात नाही अशी स्थिती आहे. रायगडच्या पालकमंत्री पदावरून दोन पक्षांमध्ये वाद आहेच परंतु विधान सभा निवडणुकीत सुनील तटकरे यांनी आपला फसल्याचा संशय जिल्ह्यातील शिवसेनेच्या तीनही आमदारांना आहे. त्यामुळे हे तीनही आमदार सुनील तटकरे यांच्यावर तुटून पडताना पाहायला मिळताहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक महायुती म्हणून लढण्याच्या राज्य पातळीवरून सूचना आहेत परंतु रायगड जिल्ह्यात मात्र महायुती कुठं दिसत नाही. शिवसेनेला बाजूला ठेवून बऱ्याचशा नगर पालिकांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले आहेत. त्यामुळे रायगडात महायुती फुटल्याचे स्पष्ट झालं आहे. राज्यात महायुती असताना आपल्याला डावललं जात असल्याची भावना शिवसेनेत निर्माण झाली आहे. आम्ही महायुतीचा प्रस्ताव दिला होता परंतु कुणी सोबत यायला तयार नसेल तर आम्ही एकटे लढायला तयार आहोत असा पवित्रा शिवसेनेनं घेतलाय. राष्ट्रवादी काँग्रेसकडून महेंद्र दळवी यांनी स्पष्टीकरण दिलंय. जिल्ह्यात भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आली आहे आणि हा हम तो डूबेंगे सनम असा ट्रेंड असा दावा महेंद्र दळवी यांनी केल्याचं दिसतं. कोण बुडणार आहे हे निवडणुकांच्या परिणामानंतरच समजेल असा टोला त्यांनी दळवी यांना लगावलाय. निवडणुकांच्या प्रचाराची रंगत आणखी वाढणार आहे. राज्यातील महायुतीत एकत्र नांदणारे पक्ष एकमेकांवर तुटून पडतील. मात्र दळवी यांनी सांगितलेल्या नवीन ट्रेंडची चर्चा तर होणारच.
102
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Nov 16, 2025 08:31:21
Pune, Maharashtra:Headline : तळेगाव दाभाडे नगरपरिषद परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप महायुती चे उमेदवार आज अर्ज दाखल करणार असल्याने पोलिसांचा बंदोबस्त Anchor: मावळातील तळेगाव दाभाडे येथे महायुतीच्या उमेदवारांचा अर्ज दाखल करण्यासाठी नेते आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी अपेक्षित असल्याने तळेगाव नगरपरिषद प्रांगणात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. तळेगाव पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी मिळून तब्बल १०० जणांची फौज तैनात असून परिसरात ठिकठिकाणी बॅरिगेट्स उभारण्यात आले आहेत. उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची अनावश्यक गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी हा विशेष बंदोबस्त करण्यात आला आहे.
99
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Nov 16, 2025 08:22:29
31
comment0
Report
UPUmesh Parab
Nov 16, 2025 08:08:17
Oros, Maharashtra:हमी युती साठी सकारात्मक होतो. काही लोकांना आमच्या सोबत युती करायची नहोती नाही झाली आणि काहींना करायची आहे त्याच्या सोबत होणार.... ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या शहर विकास आघाडीसाठी दिलेल्या निमंत्रणाला निलेश राणे यांनी प्रतिसाद दिलाय... सिंधुदुर्गात युती होण्याची शक्यता आता धूसर होत चाललीय. त्यामुळेच जिल्ह्यात आता भाजपा आणि शिवसेना आमनेसामने पाहायला मिळण्याची शक्यता आहे. आज शिवसेनेच्या माध्यमातून आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवनात जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी आम्ही युतीसाठी प्रयत्न केले. राणे साहेबांनी सांगितल्यामुळे आम्ही थांबलो होतो मात्र आतां राणे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही मैदानात उतरलोय. आमची ताकद मोठी आहे. आमच्या अस्तित्वाची चर्चा करणाऱ्यांनी तीन तारिखला आमचे फटाके पाहावेत असं थेट आव्हानच निलेश राणे यांनी भाजपाला दिलंय.
104
comment0
Report
SGSagar Gaikwad
Nov 16, 2025 08:07:16
Nashik, Maharashtra:मंत्री नरहरी झिरवाळ आणि माजी आमदार जेपी गावित यांचे सुपुत्र एकाच पॅनल मधून आले निवडून महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाची तब्बल पंधरा वर्षानंतर निवडणूक पार पडली या निवडणुकीमध्ये नाशिक जिल्ह्यातील कट्टर राजकीय विरोधक जे पी गावित आणि नरहरी झिरवाळ यांच्या पहिल्याच पिढीची युती पाहायला मिळाली...मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या पुत्रासह माजी आमदार जे पी गावित यांच्या मुलाचा पॅनल होता.पॅनल मधील सहा उमेदवारांपैकी राज्य संचालक मंडळाच्या निवडणुकीत दोघांचा विजय झालाय... या विजयानंतर जल्लोष साजरा करण्यात आला नरहरी सुपुत्र गोकुळ झिरवळ आणि माजी आमदार जे पी गावित यांचे सुपुत्र इंद्रजीत गावित विजयानंतर एकत्र जल्लोष साजरा केला पुढच्या निवडणुकीमध्ये आम्ही सोबत असू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तर झेडपीच्या निवडणुकीमध्ये नरहरी झिरवाळ यांचे सुपुत्र हे निवडणूक लढणार असले तर त्यांना आम्ही मदत करू असं इंद्रजीत गावित यांनी म्हटले... निवडून आल्यानंतर इंद्रजीत गावित आणि गोकुळ शिरवळ यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी....
65
comment0
Report
Advertisement
Back to top