Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chandrapur442401

चंद्रपुर के घुग्गुस नगर परिषद निर्वाचन प्रक्रिया आज फिर शुरू, चिन्हवाटप 11 दिसम्बर

AAASHISH AMBADE
Dec 04, 2025 08:52:18
Chandrapur, Maharashtra
टायटल:-- चंद्रपुर जिल्ह्यातील घुग्गुस नगर परिषद निवडणूक प्रक्रियेला आजपासून पुन्हा सुरुवात झाली आहे. 11 डिसेंबर रोजी चिन्हवाटप होणार असून 20 डिसेंबर रोजी मतदान तर 21 डिसेंबर रोजी एकत्र मतमोजणी केली जाणार आहे. जुन्या प्रक्रियेतले केवळ अर्ज परत घेता येणार असून नव्याने कुणालाही उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाही. असे असले तरी उमेदवारांच्या आधीच खर्च झालेलेल्या जुन्या आणि नव्या खर्चाबाबत आयोगाकडून अजूनही स्पष्ट निर्देश आलेले नाहीत.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PTPRATHAMESH TAWADE
Dec 04, 2025 09:23:39
26
comment0
Report
SKShubham Koli
Dec 04, 2025 09:04:47
Thane, Maharashtra:परिवहन मंत्री प्रताप सरनाईक byte पॉइंटर नहीं रहा। ऑन लोकार्पण सोहळा माजीवाडा विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात लोकार्पण और भूमिपूजन सोहळा पार पडत आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे अनेक ठिकाणी विविध विकास प्रकल्प कामे होत आहेत. स्थानिक आमदार और मंत्री असल्यामुळे या विकास कामाच लोकार्पण शुभारंभ करत आहेत। ऑन निवडणूक आयोग महानगरपालिका निवडणूक बैठक 10 तारखेला प्रभाग निहाय मतदार याद्या प्रसारित होत आहेत। शक्य झालं तर साधारणपणे 15 ते 20 जानेवारी दरम्यान आचारसंहिता लागू शकते और 15 ते 20 जानेवारी दरम्यान निवडणुका लागू शकतात। आम्ही शिवसैनिक आहोत निवडणुका तोंडावरती घेऊन विकास करत नसतो 365 दिवस सर्वसामान्य जनतेपर्यंत 24 तास राहण्याचा काम एकनाथ शिंदे आणि त्यांच्या अनुयायी करत असतो. निवडणुका आज किंवा उद्या लागल्या किंवा आज लागल्या आम्हाला काही फरक पडत नाही। शिवसैनिक 365 दिवस निवडणुकीला सामोरे जायला सज्ज असते. ऑनभरत गोगावले और तटकरे राडा निवडणुकीत तळागाळातला कार्यकर्ता नशीब आजमावत असतो. काही ठिकाणी एकत्र काही ठिकाणी वेगळे लढलो आहोत। संमिश्र प्रतिसाद मिळत आहे 21 तारखेला कळेल 75 टक्के पेक्षा जास्त जागा महायुतीला मिळणार. ऑन कल्याण डोंबिवली भाजप शिवसेना पक्ष प्रवेश वाद उफाळला. या सर्व कटो कल्पित बातम्या आहेत। या फक्त बातम्या आहेत काही लोक आर्थिक गोष्टींचा विचार करून इथून तिथून पक्ष बदल करत असतात. ठाणे जिल्ह्याचा इतिहास आहे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी ठाणेचा विकास केलाय अजून देखील उपमुख्यमंत्री काम करत असताना शिंदे यांनी विकास केलेला आहे जिल्ह्याचा. जनतेला न्याय देण्याचा काम एकनाथ शिंदे करत आहे। ऑनमंसे नेते अविनाश जाधव हजार कोटी निवडणुकीत वाटप. नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये राज्यामध्ये तीनच नेते फिरत होते. देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे पायाला भिंगरी बांधून 53 सभा दहा दिवसात घेतल्या हा इतिहास आहे. कोणीही वल्गना करू नये. त्यांना जर बोलायचं असेल तर त्यांनी त्याच्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत प्रचारासाठी कोण उतरल. कोणी काही बोलू नये. ठाकरे बंधू कुठे दिसले नाही शरद पवार, सुप्रिया सुळे, काँग्रेस नेते प्रचारात उतरले नाही. वाऱ्यावर सोडून दिलं होतं आम्ही आमच्या कार्यक्रम सोबत बळ दिले होते. त्या बळामुळे कार्यकर्ते पदाधिकारी निवडून येणार. निवडून येण्यापूर्वी पैशाचा वापर वर्ग ना करत आहे 21 तारखेच्या नंतर कळेल. ऑन उद्धव ठाकरे आपापसात मारणारी आणि धाडी. निवडणुकीचा कौल पूर्णपणे महायुतीच्या बाजूने असणार. प्रचारामध्ये उडी मारली असेल तर तो त्यांना नैतिक अधिकार होता. आता त्यांना तू अनैतिक अधिकार राहिलेला नाही. चुकिचं करत असतील तर धाड. असं काही नाही सांगोल्या मध्ये सर्वच पक्षाच्या उमेदवारांच्या घरावर आणि कार्यालय मध्ये धाडी टाकलेल्या आहेत. असं चुकीचं काही नाही निवडणूक आयोग त्यांच्या पद्धतीने काम करत आहे. Evm मशीन सेफ. EVM मशीन सेफ आहे. लोकसभेमध्ये उमेदवारांना विजय मिळाला आणि जास्त टाकत मिळाली होती तेव्हा EVM मशीन योग्य होती आणि विधानसभा मध्ये उमेदवारांना कमी मत पडली. आमचा लाडक्या बहिणीमुळे मत मिळाली तेव्हा EVM मशीन लगेच चुकीची। एकावेळी वेगळा निर्णय घ्यायचा असं बोलणं योग्य नाही... ऑन ubt माजी नगरसेवक सुधीर भगत उमेदवार नाव निवडणूक यादी मध्ये नाव वगळले. यावर मला माहिती नाही असं जर घडलं असेल तर निश्चितपणे त्यांना न्यायालयात न्याय मिळेल. ऑन तपोवन और संतोष बांगर तपोवन बद्दல मला कोण काय बोलले ते माहिती नाही. संतोष बांगर व्हिडिओ बाबत मला माहिती नाही... मी ते बघितलं नाही..
71
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Dec 04, 2025 08:51:56
93
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 04, 2025 07:53:14
Washim, Maharashtra:नगर परिषदच्या नगराध्यक्ष आणि सर्व 32 नगर सेवकांच्या जागांसाठी तसेच रिसोड नगर परिषदेच्या प्रभाग 5 ब आणि 10 अ या दोन नगर सेवकांच्या जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणुक कार्यक्रम घोषित केला आहे. वाशिम च्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारावर आणि रिसोड नगर परिषदेच्या 02 नगर सेवकाच्या उमेदवारांवर आक्षेप घेण्यात आला होता त्यामुळे या ठिकाणी निवडणूक लांबवण्यात आली. या दोन्ही ठिकाणच्या जागांसाठी उमेदवारी दाखल केलेल्या उमेदवारांना 10 डिसेंम्बर पर्यंत आपली उमेदवारी मागे घेता येणार आहे. त्या नंतर 11 डिसेंम्बर रोजी निवडणूक चिन्ह नेमून देऊन उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार असून 20 डिसेंम्बर ला मतदान पार पडणार आहे. या मतदानाची मतमोजणी तसेच जिल्ह्यातील रिसोड, मंगरूळपीर, कारंजा या 03 नगर परिषद आणि मालेगांव या एका नगर पंचायत साठी पार पडलेल्या मतदानाची मतमोजणी ही 21 डिसेंम्बर ला पार पडणार आहे. वाशिम ची संपूर्ण निवडणूक आणि रिसोड नगर परिषदेच्या प्रभाग 5 ब आणि 10 अ च्या नगर सेवकांच्या जागेसाठी ची निवडणूक लांबल्याने उमेदवारांमध्ये नाराजी असून त्यांच्या निवडणुकीचा खर्च तसेच सलग 20 दिवस प्रचार आणि मतदारांच्या भेटी, रॅली या काढण्यासाठी प्रचंड तणाव येत आहे.
83
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Dec 04, 2025 07:32:27
Dhule, Maharashtra:मानभाव पंथाचे एकमुखी दत्ताचे मांडलिक स्थान म्हणून प्रसिद्ध असलेले सारंगखेडा येथील दत्त जयंतीच्या यात्रेला सुरुवात झाली. दत्त मंदिरावर दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. दत्त जयंती पासून सुरु होणाऱ्या सारंगखेड्याच्या घोडेबाजाराला आजपासून सुरुवात होत आहे. हजारो घोडे विक्रीसाठी सारंखेडा घोडेबाजारात दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे सारंखेडाचा दत्त मंदिरावर देशभरातील भाविक दत्ताच्या दर्शनासाठी गर्दी करतात. या ठिकाणी नवस फेडण्याची अनोखी परंपरा पाहण्यास मिळते. एकूणच सारंखेडा बाजाराला आणि यात्रेला आजपासून सुरुवात झाली असून, पुढील पंधरा दिवस ही यात्रा सुरू राहणार आहे. लाखो भाविक या ठिकाणी भेट देत असतात. देशातील नामांकित घोडे व्यापारी येथे आपलें. घोडे विक्रीसाठी आणणात.
122
comment0
Report
SMSarfaraj Musa
Dec 04, 2025 07:16:49
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:तीन महिने उलटून देखील पुरस्काराच्या रक्कमेपासून खेळाडू वंचित. तीन महिने उलटून देखील सांगली जिल्हा परिषदेच्यावतीने देण्यात आलेल्या पुरस्कारांची रक्कमेपासून खेळाडू वंचित असल्याचा प्रकार समोर आला आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी वसंतरावदादा पाटील क्रीडा पुरस्कार देण्यात येतो, या पुरस्कारामध्ये रोख रक्कम देऊन क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या जिल्ह्यातल्या खेळाडूंना सत्कार करण्यात येतो. सप्टेंबर महिन्यात जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातल्या 7 उत्कृष्ट खेळाडूंना हा पुरस्कार दिला, मात्र या पुरस्कारातील रक्कम तीन महिने उलटून देखील अद्याप देण्यात आली; नसल्याने खेळाडूंमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून हा भोंगळ कारभार करण्यात आल्याचा आरोप संबंधित खेळाडूंकडून करण्यात आला आहे.
74
comment0
Report
SNSWATI NAIK
Dec 04, 2025 07:16:05
Navi Mumbai, Maharashtra:पोलिसांची बिवलकर जमीन घोटाळ्याप्रकरणी बिवलकरांना क्लीनचिट, दखलपात्र गुन्हा घडल्याचे दिसून येत नसल्याचे स्पष्ट. आमदार रोहित पवार यांनी बिवलकर भूखंड घोटाळ्याचे प्रकरण उघडकीस आणल्यानंतर वनविभागाने पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. शासनाने याप्रकरणी बिवलकर कुटुंबीयांच्या नावे असलेल्या जमिनीच्या मालकी हक्काच्या निश्चितीबाबत विभागीय आयुक्त कोकण यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती ज्याचा अहवाल दोन महिन्यात देण्याचे निर्देश देण्यात आले होते. चौकशी समितीचा अहवाल येण्याआधीच नवी मुंबई पोलीसांनी वन विभागाच्या तक्रारीच्या अनुषंगाने केलेल्या प्राथमिक चौकशीत सदर प्रकरणात दखलपात्र गुन्हा घडल्याचे दिसून येत नसल्याचे स्पष्ट केल्याने आतंरग मनोगते निर्माण झाले आहेत. पोलिसांनी कोणत्या कागदपत्राच्या आधारे हा निष्कर्ष काढला? त्या कागदपत्रांच्या सत्यतेची पोलिसांनी पडताळणी कशी केली? कॉन्शिअस सिटीझन फोरमचे कायदेविषयक सल्लागार ॲड. स्वप्नील इरपनवार यांनी यातले प्रश्न व्यक्त केले आहेत.
127
comment0
Report
AAASHISH AMBADE
Dec 04, 2025 06:48:36
Chandrapur, Maharashtra:टायटल:--चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात लाखोंचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जप्त, गोडाउनमध्ये ठेवून वाहनातून होत होती तस्करी, वरोरा पोलिसांची कारवाई अँकर:--राज्यात प्रतिबंधित असलेला सुगंधित तंबाखू वरोरा येथील एका गोडाउनमध्ये ठेवल्याची तसेच वाहनातून त्याची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली. शिवसेनेचे नेते मुकेश जीवतोडे आणि चंद्रपूर जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनी पुढाकार घेऊन सुगंधित तंबाखू पोलिसांना पकडून दिला. वरोरा तालुका व शहर परिसरात महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखूची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याची माहिती जीवतोडे आणि मत्ते यांना मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी गोडाउनवर धाड घालून सुगंधित तंबाखूची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई केली. यात २० ते २५ लाख रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला. एका तंबाखूविक्रेत्याच्या घरातून मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखू पोलिसांनी हस्तगत केला. पोलिसांनी साठा जप्त करून अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना कारवाईसाठी पाचारण केले.
148
comment0
Report
Advertisement
Back to top