Back
चंद्रपुर में 500 के 91 लाख फर्जी नोट पकड़े गए; टोली हिरासत में
AAASHISH AMBADE
Mar 11, 2026 14:05:00
Chandrapur, Maharashtra
टायटल: ५०० च्या ९१ लाख रूपयाच्या बनावट नोटा जप्त, चंद्रपूर पोलिसांच्या धाडीने हातात आली टोळी, रंगीत छायांकीत नोटा, प्रिंटर आणि साहीत्य जप्त, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांच्या कारवाईत मोठा खुलासा अँकर: चंद्रपुरात ५०० च्या ९१ लाख रूपयाच्या बनावट नोटा जप्त झाल्याने खळबळ उडाली आहे. चंद्रपूर पोलिसांच्या धाडीने एक टोळीच हातात आली आहे. एका बंद फ्लॅटमध्ये रंगीत छायांकीत नोटा, प्रिंटर आणि साहीत्य जप्त करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांच्या कारवाईत हा मोठा खुलासा झाला. शहरातील उर्जानगर मेजर गेट जवळ असलेल्या राजश्री अपार्टमेंट फ्लॅट नंबर २०३ मध्ये काही इसम हे अवैधरित्या ५०० रू च्या रंगीत छायांकीत नोटा तयार करीत असल्याबद्दल गुप्त माहिती मिळाल्यावर सापळा रचण्यात आला. सुमित कालीपथ पॉल, रा. बंगाली कॅम्प चंद्रपूर याच्या मालकीच्या या कुलूपबंद फ्लॅटमध्ये मध्यप्रदेश राज्यातील नागरिक वास्तव्याला असल्याचे समजले. कुलूप तोडून फ्लॅटची झडती घेतल्यावर खर्ड्याच्या 10 बॉक्समध्ये ५०० रू दराच्या रंगीत छायांकीत नोटा आणि मुद्देमाल आढळला. याप्रकरणी शुभम दिनेश नागर, वय २६ वर्ष, राह. पंचेड, तहसिल रतलाम, जि. रतलाम, मध्यप्रदेश याला ताब्यात घेण्यात आले. पुढील तपास पो.स्टे. दुर्गापूरचे पथक करीत आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SNSWATI NAIK
FollowMar 11, 2026 15:51:140
Report
SNSWATI NAIK
FollowMar 11, 2026 15:50:070
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 11, 2026 14:06:310
Report
MAMILIND ANDE
FollowMar 11, 2026 14:05:450
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 11, 2026 14:04:370
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 11, 2026 13:30:150
Report
APAMOL PEDNEKAR
FollowMar 11, 2026 13:23:500
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 11, 2026 13:18:240
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 11, 2026 13:00:510
Report
AKAMAR KANE
FollowMar 11, 2026 13:00:350
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 11, 2026 12:48:090
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 11, 2026 12:46:150
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 11, 2026 12:18:430
Report
SNSWATI NAIK
FollowMar 11, 2026 11:36:390
Report