Back
बुलढाणा किसान परिषद में बच्चू कडू का आक्रोश, जाति-धर्म पर तीखी बहस
MNMAYUR NIKAM
Oct 20, 2025 04:17:44
Buldhana, Maharashtra
बुलढाणा ब्रेकिंग
बुलढाण्यात पार पडलेल्या शेतकरी हक्क राज्यव्यापी परिषदेत बच्चू कडूंचा संताप.
संभाजी राजांना मारण्यात औरंगजेब बदनाम झाला पण संभाजी राजांना त्यांच्याच सासर्यांनी मारलं. - बच्चू कडू
काल बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा गावात राज्यव्यापी शेतकरी हक्क परिषद पार पडली या परिषदेत बच्चू कडू महादेव जानकर दीपक केदार उपस्थित होते यावेळी बच्चू कडू यांनी शेतकऱ्याला आपण जर विचारलं की तुला काय येतं तर त्याला काहीच येत नाही मग आत्महत्या का करतो अरे आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाक असा संताप बच्चू कडू यांनी व्यक्त केला या परिषदेत दीपक केदार यांनीही सरकारवर शेतकऱ्यांच्या अधोगतीला कारणीभूत ठरवत संताप व्यक्त केला...
बच्चू कडू पॉईंट्स....
ही वेदनाची परिषद दुःखाची परिषद आहे व दिवाळीच्या दिवशी ही घ्यावी लागत आहे.
तुम्ही विचाराची लढाई सोडली आणि जातीपातीची लढाई सुरू केली त्यामुळे शेतकरी मागे राहिला.
शेतकऱ्यांना कमी भावात सोयाबीन विकावं लागत असेल तर शेतकऱ्यांनी बांगड्या भराव्यात....
मोर्चे मेळावे प्रचाराला गर्दी असते मात्र शेतकरी परिषदेला गर्दी कमी असते.
बाबासाहेबांनी तलवारीने सुरू झालेली लढाई लेखणीने संपविली...
शरद जोशी यांनी तुमच्यासाठी काही कमी केलं का ? अडीच लाख पगाराची नोकरी सोडून शेतकऱ्यांसाठी लढले.
या सरकारने शेतकऱ्यांना भगवा हिरवा निळा रंगात वाटलं आणि त्यामुळे शेतकरी वाटल्या गेला.
शरद जोशींना शेतकऱ्यांनी पाडलं, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही पाडलं, मलाही शेतकऱ्यांनीच पडलं.. कारण मी जातीत बसलो नाही. तुम्ही असंच कराल तर तुमच्यासाठी कोणीही लढणार नाही...
लोकसभेची निवडणूक असताना तुम्ही कापसाला भाव मागितला का...? सोयाबीनला भाव मागितला का..? तुम्ही जात पाहिली...
पण सर्व जाती याच मातीमुळे जगतात हे विसरू नका....
शेतकरी हे सगळ्या जातीत सापडतात.
सर्वात जास्त मेहनत आमची आणि आपल्याला हे लुटतात
सरकार हे डुकरासारखा आहे डुक्कर परवडलं पण सरकार नाही.
शहरातले आमदार परवडले पण शेतकऱ्यांचा आमदार परवडत नाही. शहरातल्या आमदारांचे मस्त असतं हप्ते वसूल केले की झालं.
तुमच्यापेक्षा तुमचा बैल बरा त्याला लाथ तरी मारता येतं.
आमच्या मालाला भाव मिळाला तर आम्ही लोकांना नोकरीला ठेवू.
आरक्षणामुळे एखादी परिवार किंवा समाज सुखी होऊ शकतो मात्र मालाला भाव मिळाला तर अख्खा गाव सुखी होईल.
संभाजी राजांना मारण्यात औरंगजेब बदनाम झाला पण संभाजी राजांना त्यांच्याच सासर्यांनी मारलं.
शेतकऱ्यांना जाती धर्मात विभागल्याने शेतकरी एकत्र येत नाही नाहीतर सरकार एका दिवसात सरळ होईल..
मोदींनी शंभर लाख गाठी कापसाच्या अमेरिकेतून मागितल्या आहे... कुठे मीडियात बातमी आहे का..? या मीडिया वाल्यांचे अर्धे मालक भाजपचे आहे
जोपर्यंत मातीची किंमत होत नाही तोपर्यंत जग सुधरत नाही.
गाव आणि शेतकरी गरीब राहिला तरच शहर श्रीमंत होतील अस यांचे हे तत्व आहे.
28 तारखेला आपण नागपूरला जाणार....
पंजाबच्या शेतकऱ्यांनी 13 महिने आंदोलन करून काळे कायदे रद्द करायला लावले. आणि आम्ही बायकोची आठवण आली की चाललो घरी.
जेवढी शेतात मेहनत करता त्याच्या एक टक्के आंदोलनात मेहनत करा आणि तुमचं काम होईल.
जेव्हा सगळ्या रंगाचे झेंडे घेऊन शेतकरी लढेल त्यावेळेस सुखाचे दिवस येतील..
6
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KJKunal Jamdade
FollowOct 20, 2025 15:15:230
Report
1
Report
UPUmesh Parab
FollowOct 20, 2025 13:47:394
Report
ASAshok Singh Shekhawat
FollowOct 20, 2025 13:45:460
Report
MDMahendra Dubey
FollowOct 20, 2025 13:45:300
Report
RSRajendra sharma
FollowOct 20, 2025 13:45:170
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowOct 20, 2025 13:00:492
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowOct 20, 2025 12:46:354
Report
PNPratap Naik1
FollowOct 20, 2025 12:31:070
Report
SGSagar Gaikwad
FollowOct 20, 2025 12:30:140
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowOct 20, 2025 11:48:536
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 20, 2025 11:18:190
Report
JMJAVED MULANI
FollowOct 20, 2025 11:16:590
Report
JMJAVED MULANI
FollowOct 20, 2025 11:04:173
Report
JMJAVED MULANI
FollowOct 20, 2025 11:03:291
Report