Back
झी 24 तास की स्पष्टीकरण के बाद सरकार ने बोगस दिव्यांगों के खिलाफ एक्शन लिया
PTPRAVIN TANDEKAR
Oct 11, 2025 08:36:53
Bhandara, Maharashtra
अखेर झी 24 तासाचा इम्पॅक्ट... शासनाने परिपत्रक काढले.... राज्यातील बोगस दिव्यांगांवर होणार कारवाई.... भंडारा जिल्ह्यात असलेल्या बोगस दिव्यांग बातमी झी 24 तासाने चालविली होती..... बोगस दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांवर सुद्धा कारवाईची मागणी ..... Anchor :- झी 24 तासाच्या बातमीच्या पाठपुराव्याची राज्य सरकारने दखल घेतली. अखेर प्रशासकीय सेवेत बोगस दिव्यांगाची तपासणी करण्यात येणार असून 40 टक्क्यांपेक्षा कमी दिव्यांगणावर कारवाई होणार आहे...... Vo :- "अखेर झी 24 तासचा दणका" भंडारा जिल्ह्यात शासकीय नोकरीत बोगस दिव्यांग आहेत. याची माहिती सामाजिक कार्यकर्ते विजय शिरसागर यांनी माहिती अधिकारात मागितली व जिल्ह्यात प्रशासकीय सेवेत असलेल्या बोगस दिव्यांगणाची चौकशी व्हावी म्हणून दोन वर्षापासून शासनाला पत्र व्यवहार केलं पण त्यांच्या तक्रारीला केराची टोपी दाखवण्यात आली होती.... अखेर सामाजिक कार्यकर्त्याला झी 24 तासाची साथ मिळाली व झी 24 तासाने हा मुद्दा उचलून धरला. प्रशासकीय सेवेत असलेल्या बोगस दिव्यांगांची तपासणीची मागणी करण्यात आली. पण अधिकाऱ्यांनी फक्त "तारीख पे तारीख" देत वेळकाढू पना केला होता..... बातमी झी 24 तासाने 27 मे रोजी दाखविली होती. या संदर्भात तत्कालीन पालकमंत्री यांनी चौकशीचे आदेश देत एका महिन्यात सर्वांची मेडिकल तपासणी करून कारवाईचे आदेश दिले होते. पण अद्यापही कारवाई करण्यात आली नव्हती. झी 24 तासाने बातमी लावून धरली होती. आता 9 ऑक्टोंबरला शासन निर्णय काढण्यात आला आहे... राज्यभरातील सर्व विभागातील दिव्यांग प्रवर्गात नोकरीला असलेल्या सर्व अधिकारी कर्मचारी यांनी वैश्विक ओळखपत्र (UDID) अद्यावत करणे बंधनकारक आहे. जर मेडिकल तपासणीत 40 टक्क्यांपेक्षा कमी आढळून आले तर अशांवर कलम 91 नुसार शिस्त भंगाची कारवाई करण्यात यावी तसेच त्यांच्याकडून घेतलेल्या लाभाची वसुली करावी व तीन महिन्यात शासनाला तसा अहवाल सादर करावा असे आदेश दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी काढले आहे. BYTE :- विजय शिरसागर, तक्रारदार BYTE :- नरेंद्र भोंडेकर, आमदार शिवसेना शिंदे VO :- दिव्यांग प्रवर्गात जे दिव्यांग आहेत त्यांना नोकरी मिळत नाही. उलट भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात बोगस दिव्यांगांना प्रमाणपत्र दिले जात होते. त्यामुळे आमच्या खऱ्या दिव्यांग लोकांना न्याय मिळत नव्हतं अस आरोपी दिव्यांग लोकांनी केला आहे. त्यामुळे दिव्यांग लोकांनी सत्य समोर आणलं म्हणून झी 24 तासाचे आभार मानले आहे... पण दिव्यांग प्रमाणपत्र तयार करणाऱ्या डॉक्टरांची चौकसी करून बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या असा डॉक्टरांवर सुद्धा कारवाई करण्याची गरज आहे... BYTE :- प्रशांत शिवणकर, दिव्यांग VO :- आता राज्यातील प्रशासकीय सेवेत असलेल्या बोगस दिव्यांग लोकांचे धाबे दणाणले आहे. कारण दिव्यांग मंत्रालयात दबंग असे कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंढे रुजू झाले आहे. त्यामुळे आता या माध्यमातून खऱ्या दिव्यांग लोकांवर होणारा अन्याय दूर होणार आहे.. समाजात होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याच काम झी 24 तास सतत करतच राहणार आहे...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSACHIN KASABE
FollowOct 12, 2025 08:32:110
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowOct 12, 2025 08:31:170
Report
SNSWATI NAIK
FollowOct 12, 2025 08:19:240
Report
PPPRANAV POLEKAR
FollowOct 12, 2025 08:15:550
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowOct 12, 2025 08:04:390
Report
PPPRANAV POLEKAR
FollowOct 12, 2025 07:52:310
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 12, 2025 07:48:140
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 12, 2025 07:47:580
Report
SMSATISH MOHITE
FollowOct 12, 2025 07:47:450
Report
PPPRANAV POLEKAR
FollowOct 12, 2025 07:35:050
Report
SKSudarshan Khillare
FollowOct 12, 2025 07:05:230
Report
MAMILIND ANDE
FollowOct 12, 2025 07:05:090
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowOct 12, 2025 07:00:240
Report
SKSudarshan Khillare
FollowOct 12, 2025 06:48:530
Report
APAMOL PEDNEKAR
FollowOct 12, 2025 06:31:110
Report