Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001

नाशिक पुलिस अवैध निर्माण पर कार्रवाई की तैयारी, लोंढे गैंग को नोटिस

YKYOGESH KHARE
Oct 12, 2025 07:48:14
Nashik, Maharashtra
नाशिक पोलीस आता गुन्हेगारांच्या अवैध बांधकामांवर पाडणार हातोडा सातपूर परिसरातील लोंढे गॅंगच्या नंदिनी नदीपात्राजवळील अनाधिकृत ईमारतीला पोलीस आणि महापालिकेकडून बजावण्यात आली नोटीस गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे आणि त्यांच्या दोन्ही मुलांच्या नावे बजावण्यात आली नोटीस सध्या प्रकाश लोंढेचा मुलगा सराईत गुन्हेगार भूषण लोंढे गोळीबार प्रकरणात आहे फरार
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GDGAJANAN DESHMUKH
Oct 12, 2025 11:01:18
Parbhani, Maharashtra:अँकर - जिल्हा परिषदेच्या शाळा अनेक ठिकाणी बंद पडत असून दर दिवशी शाळेतील पटावरील संख्या घटत असताना सर्वत्र पाहायला मिळत आहे. पण जिल्हा परिषदेच्या शाळा आणि शाळेतील गुणवत्ता सुधारावी यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविणाऱ्या उपक्रमशील शिक्षकांचा आज परभणीच्या गंगाखेड येथे आमदार रत्नदीप आदर्श पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. राष्ट्र उभारणीसाठी सजग नागरिक शाळेतून घडत असतो. बाल वयात शिक्षक विद्यार्थ्यां सर्वगुणसंपन्न होण्यासाठी संस्कार करीत असतात. देशाचे उज्वल भविष्य निर्माण करणाऱ्या या शिक्षकांच कौतुक केल्यास इतर शिक्षकांना यातून प्रेरणा मिळेल. यासाठी आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या कल्पनेतून आज पालम,पूर्णा आणि गंगाखेड तालुक्यातील समितीने निवड केलेल्या 81 प्रयोगशील शिक्षकांना आमदार रत्नदीप आदर्श पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. दरवर्षी हा पुरस्कार देऊन इतर शिक्षकांनाही गौरवण्यात येईल असं यावेळी आमदार गुट्टे म्हणाले.
0
comment0
Report
UJUmesh Jadhav
Oct 12, 2025 10:50:49
Thane, Maharashtra:ब्रेकिंग शहापुर मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीला भिषण अपघात अपघातात एका तरुणाचा मृत्यू, तर एक गंभीर ठाणे कळवा येथील रुहान फारूख शेख (१६) व राजीक रफीक खान (२०) हे दोन मित्र आपल्या शहापूरातील मित्राच्या फार्म हाऊस रात्री उशीरा टीव्हीएस दुचाकीवर गेले होते. तेथून सकाळी ते पुन्हा आपल्या घरी परतत असताना शहापूरात मुंबई-नाशिक महामार्गावर पु़ंधे पाट्या जवळ दुचाकी घसरून भिषण अपघात झाला. या अपघातात रुहान हा महामार्गाच्या गटारात पडला व त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे, तर राजीक हा गंभीर जखमी झाला आहे. राजीक याला प्रथम शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी ठाणे येथे पाठविण्यात आले आहे.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Oct 12, 2025 10:49:16
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - जमीन लाटण्याचा गोपीचंद पडळकर यांचा धंदा - ज्या जमिनी लाटल्या त्यांचं काय झालं ? हे आधी पडळकरांनी स्पष्ट करावं - राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाचा आरोप. अँकर - गोपीचंद पडळकर यांचाचं जमिनी हडप करण्याचा उद्योग असून त्यांच्या भानगडी बाहेर येऊ नयेत,म्हणून पडळकरांकडून जयंत पाटलांवर बेछुट व बिनबुडाचे आरोप करण्यात आल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक आयुब बारगीर यांनी केले आहे,वास्तविक पडळकर वाडीतल्या आजीबाईंची जमीन कोणी लाटली ? मिरजेतील 50 दुकानांवर झोपडपट्ट्यांवर रात्री बोललो तर कोणी चालवला त्याचं काय झालं, असा सवाल करत गोपीचंद पडळकर यांचा जमिनी लाटण्याचा धंदा असल्याचा आरोप देखील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष आयुब बारगीर यांनी पडळकर यांना केलाय.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Oct 12, 2025 10:28:06
Kolhapur, Maharashtra:राज्यांमधील महायुतीचे नेते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात महायुती म्हणून निवडणुका लढवतील असं सर्वांनाच वाटलं होतं. पण महायुती मधील अनेक पक्ष स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत. इच्छुकांची भाऊ गर्दी आणि जागा वाटपाचा तिढा वाढू नये यासाठी महायुती जिथे शक्य आहे तिथं युती करून तर जिथे शक्य नाही तिथे स्वबळावर अशा प्रकारची तयारी करत असताना दिसत होते. याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दुजोरा दिला आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात महायुती मधील अनेक पक्ष स्वबळावरच निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर सोलापूर जिल्ह्यात नेमकी काय परिस्थिती आहे त्यावर एक नजर टाकूया. कोल्हापूर कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने जागा वाटपावरून भाजपा शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाला. यानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपा आणि शिंदे शिवसेना अर्ध्या अर्ध्या जागा घेणार असतील तर आम्ही स्वबळावर निवडणुकी लढू असे विधान केले होते. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत माहिती स्वतंत्र लढण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये देखील सर्वच पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकांना सामोरे जाण्याची शक्यता आहे. गावागावातील गटातटाच राजकारण यामुळे प्रत्येक पक्ष जिल्हा परिषद निवडणुकीत स्वतंत्रपणे ताकद आजमावण्याची शक्यता आहे. सातारा - यावेळी सातारा नगरपालिका निवडणुकीत खा.उदयनराजे आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचं मनोमिलन होईल असं चित्र निर्माण झालं आहे. त्यात हे दोघेही भाजप मध्ये असल्याने या दोघांच्या आघाड्या आणि भाजप यांच्याकडेच जास्त नगरसेवक असतील असे चित्र आहे. शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार राष्ट्रवादी गट मात्र शहरात अल्प प्रमाणात असल्याने त्यांना खूप कमी जागांवर निवडणूक लढतील. सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना वेगवेगळे लढतील असच चित्र आहे. मात्र जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचाच प्रभाव राहील. सोलापूर सोलापूर महानगरपालिकेत भाजपाचे प्राबल्य अधिक आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजपाचा महापौर होईल असे वक्तव्य भाजपाचे आमदार देवेंद्र कोठे यांनी केले होते. राष्ट्रवादी अजित पवार गटाची ताकद शहरात कमी प्रमाणात आहे. भाजपाचे तीन आमदार असल्यामुळे महापालिकेत भाजपचा दबदबा असणार आहे. भाजपाचे स्थानिक आमदार महायुती म्हणून लढण्यास इच्छुक आहेत मात्र शिवसेना शिंदे गटाला समाधानकारक जागांची अपेक्षा आहे नाहीतर स्वतंत्र लढण्याची तयारी ठेवण्यात आलीय. त्यामुळे सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत महायुती स्वतंत्र लढण्याची शक्यता आहे. सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये सर्वच पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता आहे. तालुका आणि गावांमध्ये गटातटाचे राजकारण असल्यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेची निवडणूक प्रत्येक जण आपल्या ताकदीवर लढवण्याची शक्यता आहे.
1
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Oct 12, 2025 10:27:00
Satara, Maharashtra:सातारा – राष्ट्रीय पातळीवरील 2024-25 या वर्षीची 38 वी हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा यंदा सातारा जिल्ह्यात रंगणार आहे. राजेश्वर प्रतिष्ठान, सातारा यांचे दीपक पवार यांना राष्ट्रीय महा कुस्ती संघाचे महासचिव गौरव रोशनलाल यांनी या स्पर्धेचे अधिकृत पत्र सुपूर्द केले आहे.ही प्रतिष्ठेची स्पर्धा 20 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर दरम्यान छत्रपती शाहू स्टेडियम, सातारा येथे पार पडणार असून देशभरातून कुस्तीपटूंनी भरलेला हा थरारक सामना रंगणार आहे. या स्पर्धेत देशातील 26 राज्यांतील पुरुष आणि महिला संघ तसेच 7 सेवा संघ सहभागी होणार आहेत. एकूण 500 पुरुष आणि 250 महिला मल्ल या राष्ट्रीय हिंदकेसरी स्पर्धेत आपले कौशल्य दाखवणार आहेत. प्रथम क्रमांक विजेत्यास थार जीप आणि चांदीची गदा द्वितीय क्रमांक विजेत्यास ट्रॅक्टर तृतीय क्रमांक विजेत्यांना बुलेट आणि दुचाकी इतर वजनी गटांतील विजेत्यांसाठीही रोख रक्कम आणि आकर्षक बक्षिसांची सोय करण्यात आली आहे. राजधानी साताऱ्यात ही राष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धा होणार असल्याने जिल्हाभरात उत्साहाचे वातावरण आहे.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Oct 12, 2025 10:22:07
Bhandara, Maharashtra:भंडारा जिल्ह्यात महायुतीत मिठाचा खडा.... आमदार अहंकारी असल्याच केला दावा.... तर बावनकुळे साहेब स्वतः वाळू माफियापासून दूर राहण्याचा सल्ला मला दिला होता.... मग आता भाजप मध्ये वाळू माफियाला भाजपमध्ये प्रवेश दिल्याने वॉशिंग मशीन मध्ये स्वछ झाला..... आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा बावनकुळे यांना प्रश्न.... भंडारा जिल्ह्यातील शिवसेना (शिंदे) पक्षाचे लोकसभा युवा प्रमुख जॅकी रावलाणी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये पक्ष प्रवेश केला आहे... शिवसेनेचे स्थानिक आमदार नरेंद्र भोंडेकर हे अहंकारी असून त्यांच्या अहंकाराला त्रस्त होऊन मी भाजप मध्ये पक्ष प्रवेश घेतला असल्याचं सांगितलं आहे.... जॅकी रावलाणी, - तर जॅकी रावलानी हे प्रत्येक निवडणुकीच्या वेळी मी पक्ष सोडतो असे सांगत होते. आम्हाला वाटलं की या वेळी देखील ते असेच करत आहे. पण ते भाजपा मध्ये गेले असल्याने त्यांना शुभेच्छा आहेत. पण सहा महिन्यापूर्वी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जॅकी रावलाणी हा वाळू माफिया आहे. असा फालतू लोकांना माझ्याकडे आणायचा नाही व स्वतः दूर रहायचा सल्ला मला दिला होता. पण आता बावनकुळे साहेबांनी स्वतःच्या पक्षात जॅकी रावलाणी यांना प्रवेश दिल्याने भाजपाच्या वॉशिंग मशीन मध्ये स्वच्छ झाले का असा सवाल आमदारांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे भंडारा जिल्ह्यात महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे... येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आता भंडारा जिल्ह्याचा वातावरण तापला आहे。
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Oct 12, 2025 10:19:53
Akola, Maharashtra:ॲसेस टू जस्टीस प्रकल्पांतर्गत इंडियन सोशल वेलफेअर सोसायटीतर्फे आंतरराष्ट्रीय बालिका दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय ते अग्रसेन चौक दरम्यान 300 हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनींची जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीत बालविवाह, बालहिंसा आणि बाल तस्करीविरोधात घोषणांनी परिसर दणाणून गेला. रॅलीनंतर जिल्हा प्रकल्प समन्वयक शंकर वाघमारे आणि समन्वयक सपना गजभिये यांनी बालहक्क, शिक्षणाचे महत्त्व व बालक सुरक्षिततेवर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात चाईल्ड लाईन सदस्य आणि स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
2
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Oct 12, 2025 10:17:43
0
comment0
Report
PNPratap Naik1
Oct 12, 2025 10:03:52
Kolhapur, Maharashtra:पट्टणकोडोली येथील श्री विठ्ठल बिरूदेव यात्रेचा आज मुख्य दिवस आहे. उद्याचा मुख्य दिवस असेल. लाखो भाविक या यात्रेनिमित्त दर्शनाला येत असतात. या यात्रेच्या काळात हेडाम नृत्य, धनगरी ढोल वादन होतं. भंडाऱ्याची उधळण करत बिरोबाच्या नावानं चांगभलं असा गजर या यात्रेत असतो. या यात्रेची भाकणूक प्रथा प्रसिद्ध आहे. दरवर्षी ही भाकणूक ऐकण्यासाठी भाविक आतुरतेने वाट पाहत असतात. फरांडे बाबा ही भाकणूक करतात. आजच्या मुख्य दिवशी बारा ते चार या काळात ही भाकणूक सादर केले जाते. साधारणतः दोन ते अडीचच्या दरम्यान उद्याची भाकणूक होण्याची शक्यता आहे. पुढचे चार दिवस रितिरिवाजप्रमाणे ही यात्रा सुरु असेल.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Oct 12, 2025 09:51:05
Nashik, Maharashtra:नाशिक ब्रेकिंग... - नाशिक गंगापूर गोळीबार प्रकरणात भाजपचे सुनील बागुल यांचा पुतण्या अजय बागुल याला कोर्टात केले हजर... - पोलिसांनी खाक्या दाखवल्यानंतर नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला म्हणत अजय बागुल कोर्टाकडे रवाना... - तिघांनाही मिळाले 17 तारखेपर्यंत पोलीस कोठडी... - उद्या होणार मामा राजवाडे यांची सुनावणी - आज सातपूर आणि गंगापूर गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपींची तीन दिवसांची पोलीस कोठडी पूर्ण - लोंढे टोळीतील मोरख्या प्रकाश लोंढे आणि गंगापूर गोळीबार प्रकरणातील मामा राजवाडे, अजय बागुल यांच्यासह इतरांना कोर्टात केले दाखल... बाईट-किरण कुमार चव्हाण, उपायुक्त क्राईम
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Oct 12, 2025 09:50:53
Nanded, Maharashtra:माजी मुख्यमंत्री राज्यसभेचे विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांचे भाषण सुरु असताना कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. नांदेडमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमामध्ये अशोक चव्हाण यांचे भाषण सुरू असताना हा प्रकार घडला. आरक्षण उपवर्गीकरण तात्काळ लागू झाले पाहिजे आणि आरक्षण वर्गीकरणाचे मुदत वाढ मुदतवाढ रद्द करण्यात यावी अशी मागणी करत हा गोंधळ घालण्यात आला. लोकस्वराज्य आंदोलन या संघटनेकडून ही घोषणाबाजी करण्यात आली. सामाजिक न्याय विभाग अंतर्गत आरटीच्या वतीने घेण्यात असलेल्या संमेलनात एकाच पक्षाच्या लोकांना आमंत्रित करण्यात आल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला。
0
comment0
Report
Advertisement
Back to top