Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Bhandara441904

नाना पटोले ने प्रफुल्ल पटेल पर तीखी टिप्पणी, बंगाल में घमासान बढ़ा

PTPRAVIN TANDEKAR
Nov 21, 2025 11:19:05
Bhandara, Maharashtra
माझ्या ऑफिस मध्ये सर्व सामान्य लोक बसतात, पण त्या बंगल्यात कुत्रे असतात... ज्या व्यक्तीने गोंदियाचा विकास केला नाही ते भंडारा, सakoलीचा विकास काय करणार.... आधी आपली धुतली पाहिजे मग दुसऱ्याची धुवायला पाहिजे..... नाना पटोले यांची प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीका.... त्या प्रफुल्ल पटेल नी स्वतःच्या गोंदिया चांगला नाही केलं ते साकोली, भंडारा कसा चांगला करणार गोंदिया आमच्यापेक्षाही घाण आहे... त्यामुळे 'आधी आपली धुतली पाहिजे मग दुसऱ्याची धुवायला पाहिजे' असं जे मन आहे आमच्याकडे त्या मणिप्रमाणे वागाव... नाना पटोले यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीका केली आहे...
89
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GMGANESH MOHALE
Nov 21, 2025 12:07:41
Washim, Maharashtra:अँकर:वाशिम जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होत आणि माघारीमुळे राजकीय वातावरण अक्षरशः ढवळून निघालं आहे.वाशिम नगरपरिषदेत १६ प्रभागांतील ३२ जागांसाठी एकूण २२२ उमेदवार मैदानात होते.परंतु आज तब्बल ५० उमेदवारांनी अर्ज मागे घेतला.आता १७२ उमेदवार निवडणूक रिंगणात कायम आहेत.नगराध्यक्ष पदासाठीही आज महत्त्वाची उलथापालथ पाहायला मिळाली.दाखल झालेले १७ अर्ज परंतु ३ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता १४ उमेदवारांमध्ये चुरस रंगणार आहे.ठाकरे गटाचे माजी उपजिल्हा प्रमुख नागोराव ठेंगडे यांनी काल पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर आज अपक्ष उमेदवारीही मागे घेतली.समाजातून चांगला उमेदवार समोर आल्याने आपण माघार घेतल्याचं त्यांनी सांगितलं.आता ते कोणाला पाठिंबा देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.तसेच माजी नगराध्यक्ष लक्ष्मण इंगोले यांनीही अपक्ष उमेदवारी मागे घेतली असून स्थानिक समीकरणात मोठा बदल होण्याचे संकेत आहेत.२ डिसेंबरला मतदान आणि ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.आजच्या माघारीनंतर वाशिममधील निवडणुकीचं राजकीय वातावरण पूर्णपणे बदललेलं दिसत आहे.हे बदल अंतिम निकालावर कितपत परिणाम करणार हे पाहणं आता सर्वांसाठी महत्त्वाचं ठरणार आहे.
14
comment0
Report
KJKunal Jamdade
Nov 21, 2025 12:06:32
Shirdi, Maharashtra:Shirdi News Flash शिर्डी नगरपरिषदेत अपक्ष उमेदवार बिनविरोध... अपक्ष उमेदवारासाठी चक्क भाजपच्या उमेदवाराने घेतली निवडणुकीतून माघार... शिर्डीत प्रभाग क्रमांक 8 मधील भाजपच्या उमेदवार मनिषा शिवाजी गोंदकर यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे... भाजपचे माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांच्या पत्नीची माघार... गोंदकर यांच्या माघारीमुळे अपक्ष उमेदवार छाया पोपट शिंदे या नगरसेवकपदी बिनविरोध... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिष्टाईने भाजपच्या अधिकृत उमेदवाराची निवडणूक रिंगणातून माघार... सुजय विखे यांनी जुळवून आणली राजकीय समीकरणे... सर्वसाधारण जागेवर ओबीसी उमेदवारासाठी मराठा उमेदवाराने घेतली माघार... Bite - सुजय विखे पाटील माजी खासदार Bite - शिवाजी गोंदकर माजी नगराध्यक्ष भाजप Bite - पोopat शिंदे , बिनविरोध निवडून आलेल्या छाया शिंदे यांचे पती
46
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 21, 2025 11:50:29
Kolhapur, Maharashtra:राजकीय विद्यापीठ म्हणून ओळख असणाऱ्या कागलचा रक्तरंजित राजकीय इतिहास सर्वश्रुत आहे. गेल्या दहा वर्षापासून कागल मध्ये मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजीत घाटगे यांच्यामध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळाला. पण नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने मुश्रीफ आणि घाटगे यांच्यामध्ये दिलजमाई झाली.. पण यानंतर आत्ता मंत्री हसन मुश्रीफ आणि माजी खासदार संजय मंडलिक यांच्यामध्ये नव्या राजकीय संघर्षाला सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजीत घाटगे यांच्यामध्ये दिलजमाई. मुश्रीफ आणि घाटगे यांच्यामध्ये दिलजमाई झाल्यानंतर कागल मध्ये Shinde गटाचे नेते संजय मंडलिक आक्रमक. ईडी पासून वाचण्यासाठी आणि जमिनीचा विषय मिटवण्यासाठी मुश्रीफ आणि घाटगे एकत्र आल्याची मंडलिकांची जोरदार टीका. मंडलिकांच्या टिकेला मुश्रीफांच चोख उत्तर..मी जर संजय मंडलिक यांच्या संदर्भात बोलायला लागलो तर बात दूर तक जायेगी असं प्रत्युत्तर दिलंय.
106
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Nov 21, 2025 11:49:32
Akola, Maharashtra:अकोला जिले के अकोट तालुक के मुंडगाव में एक किसान ने कठिनाईपूर्ण खेती को अधिक किफायती बनाने के लिए नया रास्ता अपनाया है। आर्थिक परेशानियों के कारण मशागती के बढ़ते खर्च को सहन करना कठिन हो रहा था, जिससे स्थानीय 35 वर्षीय किसान ऋषिकेश बहाकर ने अपने दो से तीन एकड़ खेत की साइक्ल पर आधारित डवरणी यंत्र से डवरणी कर खर्च बचाया। बहाकर के पास लगभग दो एकड़ खेती है और इस वर्ष उन्होंने सोयाबीन और चना की बोवनी ट्रैक्टर से की थी। पौधा उगने के बाद डवरणी और निंदाई आवश्यक होती है, पर इसके लिए लागत नहीं उठ पाती थी, इसलिए उन्होंने खुद बनائے गए साइक्ल डवरणी यंत्र का उपयोग करने का निर्णय लिया। इस साइक्ल यंत्र की मदद से उन्होंने पूरे खेत की डवरणी सफलतापूर्वक पूरी की। इससे उनकी मशागती का बड़ा खर्च बचा और आर्थिक संकट से निकलने में मदद मिली है। किसान की इस कल्पनाशीलता की स्थानीय स्तर पर सराहना हो रही है.
37
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Nov 21, 2025 11:45:52
Ratnagiri, Maharashtra:स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये इंटरनेटचा प्रश्न चर्चेत आला आहे... रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण तालुक्यातील तळवडे गावात नेट द्या... मग घ्या अशा आशयाचे बॅनर लावले आहे... पाहूया त्यावरचा एक रिपोर्ट... आज जग सुपरफास्ट झालाय... सोयी सुविधा सध्या लोकांच्या पायाशी लोळण घेत आहेत... माणूस मंगळावर पोहोचला... पण कोकणातला या गावात अद्यापही इंटरनेटची सुविधा नाही... सर्व गोष्टी सध्या ऑनलाईन पद्धतीने होतात... पण कोकणातले ही परिस्थिती गंभीर आणि सत्ताधाऱ्यांना विचार करायला लावणारी आहे... अन्न वस्त्र निवारा यासह इंटरनेट ही सध्या नागरिकांची प्राथमिक गरज आहे... सरकारी काम असेल किंवा शिक्षण यासाठी इंटरनेट लागते... पण रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील ही अवस्था सरकारसह स्थानिक लोकप्रतिनिधींना गंभीरपणे विचार करायला लावणारि आहे...
85
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Nov 21, 2025 11:37:35
Pune, Maharashtra:मुख्यमंत्र्यांसमोर ठरलेला शब्द बाळा भेगडेंनी फिरवला म्हणून दम भरलेल्या शरद पवारांसोबत जाण्याची वेळ आली सुनील शेळकेंचा भाजपवर गंभीर आरोप. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर ठरलेला शब्द माजी मंत्री बाळा भेगडेंनी फिरवला. त्यामुळं आज पुण्याच्या लोणावळ्यात आणि तळेगावात शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत एकत्र येण्याची वेळ आली. असं म्हणत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंनी भाजपवर गंभीर आरोप केलेत. लोकसभेवेळी शरद पवारांनी सुनील शेळकेंना सज्जड दम भरला होता. त्यावेळी शरद पवार म्हणतात मला, हे लक्षात ठेवा. असा इशारा दिल्यानंतर शेळके ही संतापले होते. मात्र आज हे सगळं विसरुन भाजपला धडा शिकवण्यासाठी शेळकेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी हात मिळवणी केलीये. लोणावळा नगरपरिषद आणि वडगाव मावळ नगरपंचायत मध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याची त्यांनी घोषणा केलीये. पहिले अडीच वर्षे तळेगावात भाजपचा नगराध्यक्ष अन लोणावळ्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष, असा मुख्यमंत्र्यांसमोर ठरलेला फॉर्म्युला भाजपने पाळला नाही. असा आरोप शेळकेनी केला अन यानिमित्ताने पवार काका-पुतण्यांची राष्ट्रवादी एकत्र आल्यावर शिक्कामोर्तब केला...
174
comment0
Report
ABATISH BHOIR
Nov 21, 2025 11:37:00
72
comment0
Report
JMJAVED MULANI
Nov 21, 2025 11:36:46
Baramati, Maharashtra:मल्हारी मार्तंडाच्या जेजुरीगडावर घटस्थापनेनंतर चंपाषष्ठी उत्सवास सुरवात..करवीरपीठाचे शंकराचार्य श्री नृसिह भारती यांच्या हस्ते घटस्थापना...Anchor : अवघ्या महाराष्ट्र राज्याचे कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर आज पासून चंपाष्टमी म्हणजेच षडरात्र उत्सवाची सुरवात झालीय.करवीरपीठाचे शंकराचार्य श्री नृसिह भारती यांच्या हस्ते सकाळी श्री खंडोबा आणि म्हाळसा देवीच्या उत्सवमूर्तीची घटस्थापना करण्यात आली.चंपाषष्टीनिमित्त जेजुरी गडावर सहा रात्री विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येते.तर या सहा दिवसात भाविक आपल्या देव्हाऱ्यातील देव खंडोबाच्या भेटीला आणत असतात.उत्सव काळात भाविकांना अडचणी येवू नयेत म्हणून देवस्थानच्या वतीने भाविकांसाठी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.तर सहा दिवस हा उत्सव चालणार असल्याची माहिती देवस्थानाच्या वतीने देण्यात आलीय...*बाईट -मंगेश घोणे (अध्यक्ष,मार्तंड देवस्थान ट्रस्ट, जेजुरी)* *बाईट - गणेश आगलावे (पुजारी)येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट या गर्जना  बेल भंडाऱ्याची मुक्त  उधळण यामुळे जेजुरी गडावर वातावरण मल्हार मय होऊन गेले  होते .जेजुरी गडावर आजपासून सुरू झालेल्या चंपाषष्ठी उत्सवाची सांगता ही मंदिरातील व घरोघरी बसवलेले देवाचे घट उठवून देवाला पुरणपोळी व वांगे भरीत तसेच रोडगा अर्पण करून तळी भंडारा चा कुलधर्म कुलाचार करून उपासनेची सांगता करण्यात येते या चंपाषष्ठी उत्सवा दरम्यान लाखो भाविक मल्हार गडावर येऊन दर्शनासाठी गर्दी करत असतात... जेजुरी गडावर चंपाषष्ठी उत्सवानिमित्त अतिशय धार्मिक वातावरण निर्माण झाले आहे.
95
comment0
Report
KJKunal Jamdade
Nov 21, 2025 11:18:41
Shirdi, Maharashtra:अर्ज माघारीच्या काही मिनिटांआधी राहाता पालिका निवडणुकीत मोठा ट्विस्ट... ठाकर ेसेनेतून निलंबित राजेंद्र पठारे यांनी नगराध्यक्ष पदाचे दोन्ही अर्ज घेतले माघारी... पक्षाच्या AB फॉर्मसह अपक्षही दाखल केली होती नगराध्यक्ष पदाची उमेदवारी... ठाकरे सेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी केला होता AB फॉर्म चोरल्याचा आरोप... माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे यांच्यासह सागर लुटे आणि उज्वला होले यांची पक्षातून हकालपट्टी... हकालपट्टींनंतर पदाधिकाऱ्यांना झाले होते अश्रू अनावर... ठाकरे सेना स्थानिक आघाडीत सहभागी असताना पठारे यांनी दखल केली होती ठाकरे सेनेकडून उमेदवारी... पठारे यांच्या उमेदवारीनंतर वरिष्ठ पातळीवरून हालचाली... पठारे यांनी अध्यक्ष पदाचे अर्ज घेतले मागे... नगरसेवक पदाचे अर्ज मात्र कायम... पक्षातून हकालपट्टी नंतरही नगरसेवक पदासाठी राजेंद्र पठारे, सागर लुटे आणि उज्वला होले यांचे पक्षचिन्हावर उमेदवारी अर्ज कायम... राजेंद्र पठारे यांनी पुन्हा साधला बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा... तीन तारखेनंतर सविस्तर बोलेल.. राजेंद्र पठारे यांची प्रतिक्रिया...
85
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 21, 2025 11:00:36
Nagpur, Maharashtra:हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर कंत्राटदारांनी पुन्हा काम बंद आंदोलन सुरू केलेय. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कंत्राटदारांचे 150 कोटी रुपये थकले आहे. यापूर्वीही ही रक्कम मिळावी म्हणून हिवाळी अधिदेशनाच्या कामावर बहिष्कार घालत काम बंद आंदोलन कंत्राटदारांनी केल होते. मात्र अधिकाऱ्यांच्या मध्यस्थेमुळे पुन्हा काम सुरू झाले. मात्र शासनाने केवळ 20 कोटींची निधी देत बोळवणं केल्याचा आरोप करत पुन्हा अधिवेशनाच्या कामावर बहिष्कार टाकलाय, रवी भवन आमदार निवास, हैदराबाद हाऊस, देवगिरी येथील हिवाळी अधिवेशनाचे कामे सर्व कंत्राटदारांनी बंद ठेवत निषेध नोंदवताय आज हैदराबाद हाउस येथे मुख्यमंत्र्यांचे नावे निवेदनही देण्यात आले
101
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 21, 2025 10:46:57
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी पात्र असलेल्या अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज अखेर मागे. अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी पात्र असलेल्या अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज अखेर मागे. अनगर नगरपंचायत तांत्रिकदृष्ट्या बिनविरोध झाली. अनगर मधील 17 नगरसेवक आणि नगराध्यक्ष अखेर बिनविरोध झाले. राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या उमेदवार उज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर आरोप प्रत्यारोप झाले होते. त्यानंतर आज अखेर अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी आज अर्ज मागे घेतला. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या अनगर नगरपरिषद बिनविरोध झालीय. मात्र असं असलं तरी उज्वला थिटे यांनी न्यायालयात धाव घेतल्याने कोर्टाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलेय
160
comment0
Report
Advertisement
Back to top