Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Bhandara441904

भंडारा में पारा गिरकर 9.5°C, ठंड की लहर आने की संभावना

PTPRAVIN TANDEKAR
Nov 19, 2025 02:05:31
Bhandara, Maharashtra
भंडाऱ्यात हुडहुडी... पारा घसरला ९.५ अंश सेल्सिअस! येत्या दिवसात जिल्ह्यात थंडीची लाट पुना वाढणार Anchor : भंडारा जिल्ह्यात थंडीची लाट आली आहे. गेल्या चार दिवसांपासून १२ अंश सेल्सिअसच्या आसपास असलेले किमान तापમાન ९.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे सामान्यपेक्षा १५.५ अंशांनी कमी आहे. तापमानात झालेल्या घसरणीमुळे जिल्ह्यात थंडीची तीव्रता वाढली आहे आणि थंडीची लाट येण्याची भीती आहे. भंडारा जिल्ह्यातील किमान तापमान ९.५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आल्याने, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने जिल्ह्यात थंडीची लाट येण्याच्या शक्यता वर्तविली आहे. नागरिकांना सावधगिरीचा सल्ला देऊन लोकांना थंडीपासून स्वतःचे संरक्षण करा, उबदार कपडे वापरा, थंडीच्या संपर्कात येण्यास टाळा, वृद्धांची आणि मुलांची काळजी घ्या, असे आवाहन केले आहे.
110
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRASHANT PARDESHI
Nov 19, 2025 03:38:46
Dhule, Maharashtra:नंदुरबार जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक झाले असून, ऊसाला योग्य दर मिळत नाही तोपर्यंत ऊस तोडणी बंद राहणार, असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. ऊसाला २,८०० रुपये च्या दर मिळत आहे, मात्र शेतकऱ्यांना हा दर परवडत नसल्याने शेतकऱ्यांनी बैठक घेत जोपर्यंत योग्य दर मिळत नाही, जोपर्यंत ऊस तोडणी करायची नाही, असा निर्धार केला आहे. ऊस तोडणी बंद केल्याने कारखानदारांची डोकेदुखी वाढणार आहे. उसाच्या दर वाढवून देत नाही तोपर्यंत ऊस तोडणी बंद राहणार असल्याच्या निर्णय नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घेतला आहे. एकीकडे बियाणं, खत, मजुरी या सर्वच महागल्या आहेत. मात्र उसाला दर मिळत नसल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घेतलेला पवित्र कारखानदारांना त्रासदायक ठरणार हे मात्र निश्चित आहे. जोपर्यंत ऊसाला योग्य भाव भेटत नाही तोपर्यंत परिसरातील खांडसरी, सहकारी कारखाने, खाजगी कारखाने, यांना कोणीही ऊस देऊ नाही. यासाठी शेतकऱ्यांनी बैठक घेत ऊस तोडणी बंद करण्याच्या एकमताने निर्णय घेतला असल्याने याच्या फटका कारखानदारांना बसणार असल्याने आता कारखानदारांची भूमिका काय राहणार? हे पाहणं आता महत्त्वाच्या ठरणार आहे.
61
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 19, 2025 03:36:07
Nagpur, Maharashtra:नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या धामधूमित नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेसमधील पक्षांतर्गत गटबाज़ी मोठ्या प्रमाणात उफाळून आलीय. अनेक दशक काँग्रेस निष्ठावान राहिलेले नेतेही पक्षाला सोडचिट्ठी देत दुसऱ्या पक्षात जात आहे... प्रदेश सरचिटणीस राजा तिडके यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला आहे.... माजी मंत्री आणि काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या कार्यशैलीवर प्रचंड नाराजी आणि तीव्र टीका त्यांनी केलीय .. ते मौदा येथून भाजपाकडून नगराध्यक्ष पदासाठी मैदानात आहे .... दरम्यान जिल्हात अनेक ठिकाणी काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत नाराजी असून केदार यांच्या मनमानीवर तीव्र नापसंती अनेक नेते व्यक्त करत आहे.... दरम्यान काँग्रेस मधून भाजपावासी झालेले प्रसन्न तिडके यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी
76
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 19, 2025 03:34:47
Dhule, Maharashtra:नंदुरबार जिल्ह्यात भाजप असलेल्या गटबाजीच्या फायदा शिवसेना शिंदे गटाला होणार असा दावा शिंदे सेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केला आहे. नंदुरबार आणि तळोदा भाजपात अंतर्गत गटबाजी उघडपणे दिसून येत असल्याने, याच्या फायदा शिवसेनेला होणार आहे मात्र यां दोन्ही ठिकाणी शिवसेनेला भाजपाच आव्हान राहणार हे देखील तितकच खरं आहे. भाजपासोबत निष्ठावान राहिले लोकांना डावलून बाहेरून आलेल्यांना तळोदा नगरपालिकाेेत उमेदवारी दिल्याची चर्चा आहे. जिल्ह्यात होणाऱ्या नगरपालिका निवडणुकांसाठी शिवसेनेसमोर भाजपाच्या आव्हान असल्याची कबुली आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली, नंदुरबार आणि तळोदा नगरपालिकाेत आम्ही निवडणूक लढत असून आमच्यासमोर भाजपाचे आव्हान राहणार आहे. मात्र भाजपाच्या अंतर्गत गटबाजी आहे. मात्र शिवसेनेत कुठेही गटबाजी नसल्याने याचा फायदा शिवसेनेला होणार आहे. भाजपने नगरपालिकाेत ज्यांना उमेदवारी दिली ते काँग्रेस मधून आलेले आहेत पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले लोकांना बाजूला करून बाहेरून आलेल्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर त्यातील एक उमेदवार फुटून राष्ट्रवादीतून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपात असलेल्या गटबाजीच्या फायदा शिवसेना शिंदे गटाला होणार असल्याचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितलं,
81
comment0
Report
SGSagar Gaikwad
Nov 19, 2025 03:34:29
Nashik, Maharashtra:ट्रॅक्टर ट्रॉली टँकरवर आदळून अपघात नाशिक पुणे महामार्गावरील पौर्णिमा बसथांब्याजवळ वळणावर उभ्या असलेल्या एका ट्रॅक्टर-ट्रॉली-टैंकरला पाठीमागून भरधाव आलेल्या कारने जोरदार धडक दिल्याची घटना काल दुपारच्या सुमारास घडली आहे.... या अपघातात कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून तीन ते चार जण किरकोळ जखमी झाले आहेत...द्वारकेकडून नाशिक रोडच्या दिशेने कारचालक रवींद्र मिस्तरी हे त्यांच्या कारने घराकडे जात असताना पूल ओलांडताच वळणावर कारवरील त्यांचा ताबा सुटला. पुढे रस्त्यालगतच उभ्या असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या ट्रॅक्टर टँकरवर त्यांची कार जाऊन आदळली. या धडकेत कारचा चक्काचूर झाला. सुदैवाने एअर बॅग खुल्या झाल्याने चालक मिस्तरी हे बचावले. तसेच ट्रॅक्टरचालक संतोष गवळी यांनाही दुखापत झाली आहे. घटनेची माहिती अग्निशमन दलालाकळविण्यात आली. तातडीने शिंगाडा तलाव येथील मुख्यालयातून फायरमन हे घटनास्थळी दाखल झाले. यावेळी वाहनांमध्ये कोणीही अडकलेले नव्हते; मात्र दोघे जखमी झाल्याने त्यांना अग्निशमन दलाच्या देवदूत बंबामधून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.....
110
comment0
Report
SGSagar Gaikwad
Nov 19, 2025 03:22:07
Nashik, Maharashtra:घातक हत्यारांसह कोयता गँगला पोलिसांनी केली अटक नाशिकच्या जेल रोड शिवाजीनगर येथे दोघा युवकांना बेदम मारहाण करत परिसरात दहशत माजविणाऱ्या तिघांसह दोन्हा अल्पवयीनांची कोयता गँगला नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाने गजाआड केले. त्यांच्याकडून कोयते, तलवारीसह अन्य घातक हत्यारे जप्त करण्यात आलीये... शिवाजीनगर येथे गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास सात ते आठ संशयितांनी तोंडाला मास्क लावून, म्हसोबा मंदिराजवळ हातात हत्यारे घेऊन, दहशत माजवून वाहनांची तोडफोड केली होती. तसेच भांडणाची कुरापत काढत विक्रेता धनंजय सागवान व त्याचा मित्र तेजस ऊर्फ विकी यांना मारहाण करत जबरी लूट करण्यात आली होती. गुन्ह्यातील हल्लेखोर आरोपी साईनाथनगर येथे येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. तातडीने रिक्षामधून जात परिसरात सापळा रचला. जाऊन साईनाथनगर येथे मोठ्या शिताफीने संशयित राकेश ऊर्फ राका संपत लोंढे, प्रज्ज्वल ऊर्फ पज्या सुरेश गुंजाळ, प्रथमेश ऊर्फ नन्या राजाराम शेलार व दोघा अल्पवयीन मुलांना पकडले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली धारदार हत्यारे व मुद्देमाल जप्त करण्यात आलीये...
60
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 19, 2025 03:21:28
Nagpur, Maharashtra:उच्च न्यायालय के नागपुर खंडपीठ के समक्ष लोकसभा-विधानसभा चुनावों में EVM के साथ VVPAT के उपयोग की संभावना पर स्थिति स्पष्ट की गई। नागपुर लोकसभा निर्वाचन आयोग ने नागपुर खंडपीठ के समक्ष यह उत्तर प्रस्तुत किया कि स्थानीय स्वराज्य संस्थाओं की चुनाव प्रक्रिया में EVM के साथ VVPAT का उपयोग संभव नहीं है। कांग्रेस के राष्ट्रीय सचिव प्रफुल्ल गुडड़े पाटील ने आगामी चुनावों में VVPAT के संबंध में दिए गए सवाल पर निर्वाचन आयोग का उत्तर नागपुर खंडपीठ में प्रस्तुत किया। लोकसभा- विधानसभा चुनावों में ‘सिंगल पोस्ट EVM’ का प्रयोग होता है। स्थानीय स्वराज्य संस्थाओं में एक ही दायरे से 2-4 सदस्य चुने जाते हैं, इसलिए ‘मल्टी पोस्ट EVM’ के लिए VVPAT डिज़ाइन या मशीन उपलब्ध नहीं है। केंद्रीय निर्वाचन आयोग ने भी ऐसी मशीन बनवाई नहीं है। इससे पहले 2017 में नांदेड-वाघाला मनपा चुनावों में VVPAT परीक्षण परियोजना असफल रही थी।
52
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 19, 2025 03:18:55
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:ANC : छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयाने पुन्हा एकदा राज्यात आपली छाप उमटवली आहे. वैद्यकीय संचालनालयाच्या ताज्या अहवालानुसार, दिनांक ३ ते ८ नोव्हेंबर या आठवड्यात सर्वाधिक म्हणजे तब्बल ७५० शस्त्रांना करून घाटीनं संपूर्ण राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. या क्रमवारीत नागपूर आणि पुणे येथील मेडिकल कॉलेज अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत. गंभीर अपघात, सीझर डिलेव्हरी किंवा हाडांच्या शस्त्रियांच्या बाबतीत घाटी रुग्णालय अजूनही नागरिकांची पहिली पसंती असल्याचं दिसून आलं आहे. घाटीतील अनुभवी डॉक्टर आणि तातडीची सेवा अनेक रुग्णांचे प्राण वाचवत असल्याने नागरिकांचा या रुग्णालयावर मोठा विश्वास आहे. त्यामुळे राज्यातील आघाडीचं रुग्णालय म्हणून घाटीचं वर्चस्व पुन्हा अधोरेखित झालं आहे。
51
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Nov 19, 2025 03:16:07
Akola, Maharashtra:अकोला तालुक्यातील सिसा, ऊदेगाव, डोंगरगाव आणि बोंदरखेड परिसरात जंगली डुकरांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. जंगली डुकरांच्या कळपाने तब्बल १० ते १२ एकरांतील हरभरा पिकाची मोठी हानी केली आहे. रब्बी हंगामातील इतर पिकांनाही फटका बसत असल्याने शेतकरी चिंतेत असून, रात्री-दिवस शेतांवर पहारा ठेवूनही नुकसान कमी होत नाही. गावाभोवती कळपाचे कळप फिरू लागल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या वाढत्या उपद्रवावर तातडीने उपाययोजना करून पिकांचे संरक्षण करण्यासाठी वनविभागाने तत्काळ कारवाई करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
106
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 19, 2025 03:06:22
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - अनगर नगरपंचायतीत अर्ज बाद झाल्यानंतर उमेदवार उज्वला थिटे यांची पाहिली प्रतिक्रिया अनगर नगरपंचायतेत अर्ज बाद झाल्यानंतर उमेदवार उज्वला थिटे यांची पाहिली प्रतिक्रिया निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयविरोधात न्यायालयात दाद मागणार अर्ज भरताना सर्व कागदपत्रांची आणि अर्जाची वकिलाकडून तपासणी केली होती सूचक म्हणून माझा मुलगा माझ्या सोबत होता, त्याचीच सही कशी राहू शकते? मी न्यायाल्यावर विश्वास ठेवते, अर्ज कसा बाद झाला यासंदर्भात मी न्यायालयात दाद मागेन अनगर नगरपंचायतच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार उज्वला थिटे यांची प्रतिक्रिया
143
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Nov 19, 2025 03:02:17
Pune, Maharashtra:अहिल्यानगरच्या तोफखाना पोलिसांनी एका सराईत दुचाकी चोराला पकडला आहे त्याच्याकडून चोरीच्या सात दुचाकी देखील जप्त केले आहेत. दीपक वैरागड असं दुचाकी चोराच नाव आहे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे मागील काही महिन्यांपासून शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या आहेत चोरीच्या वाढलेल्या घटना लक्षात घेत शहरातील पोलीस सतर्क राहून दुचाकी चोरांचा शोध घेत होते अशात गस्तीत असलेल्या तोफखाना पोलिसांना शहरातील पृष्ठधाम रोडवर एका जणांकडे नंबर नसलेली दुचाकी दिसली त्याची चौकशी करताना तो उडवा उडवीची उत्तर देत पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतलं त्याची चौकशी केल्यानंतर त्याने सात दुचाकी चोरल्याची कबुली दिली त्याच्याकडे असलेल्या सर्व दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या असून पोलीस वैरागळ याची बसून चौकशी करत आहेत
129
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 19, 2025 03:01:57
Dhule, Maharashtra:धुळे जिल्ह्यात कडाक्याच्या थंडीमुळे सर्वत्र जनजीवन प्रभावित झाल्याच दिसून येत आहे. तापमानाचा पारा सहा अंशापर्यंत खाली आलेला आहे. मात्र या वाढत्या थंडीमध्ये निसर्गाचे विविध रंग देखील समोर येत आहेत. धुळे तालुक्यातील सोनवद धरण क्षेत्रामध्ये वाढत्या थंडीत एक वेगळी अनुभूती अनुभवायला येत आहे. या धरणाक्षेत्रामध्ये निसर्गाच्या विविध छटा अनुभवायला मिळत आहेत. शेतामधली हिरवीगार पीक, वनराई आणि निळं क्षार पाणी हे पर्यावरण प्रेमींना आपल्याकडे आकर्षित करीत आहे. जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे सर्वच धरणांमध्ये मुबलक जलसाठा आहे. पावसानंतर सुरु झालेल्या हिवाळ्याच्या ऋतूमध्ये धरण परिसराणांमध्ये निसर्गाची मुक्त विविध रंगांची मुक्त उधळण अनुभवायला मिळत आहे. हिरवीगार वनराई आणि निळं क्षार पाणी हे निसर्गाच्या मुक्त उधळणीची अनुभूती देत आहेत. धरण क्षेत्रांमध्ये कडाक्याच्या थंडीमध्ये दाट धुकं पर्यावरण प्रेमींना आपल्याकडे आकर्षित करीत आहे.
102
comment0
Report
Advertisement
Back to top