Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001

घाटी अस्पताल ने एक सप्ताह में 750 शल्य चिकित्सा कर राज्य में नंबर-1 बना

VKVISHAL KAROLE
Nov 19, 2025 03:18:55
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
ANC : छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयाने पुन्हा एकदा राज्यात आपली छाप उमटवली आहे. वैद्यकीय संचालनालयाच्या ताज्या अहवालानुसार, दिनांक ३ ते ८ नोव्हेंबर या आठवड्यात सर्वाधिक म्हणजे तब्बल ७५० शस्त्रांना करून घाटीनं संपूर्ण राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. या क्रमवारीत नागपूर आणि पुणे येथील मेडिकल कॉलेज अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत. गंभीर अपघात, सीझर डिलेव्हरी किंवा हाडांच्या शस्त्रियांच्या बाबतीत घाटी रुग्णालय अजूनही नागरिकांची पहिली पसंती असल्याचं दिसून आलं आहे. घाटीतील अनुभवी डॉक्टर आणि तातडीची सेवा अनेक रुग्णांचे प्राण वाचवत असल्याने नागरिकांचा या रुग्णालयावर मोठा विश्वास आहे. त्यामुळे राज्यातील आघाडीचं रुग्णालय म्हणून घाटीचं वर्चस्व पुन्हा अधोरेखित झालं आहे。
117
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SKSudarshan Khillare
Nov 19, 2025 04:45:37
Yeola, Maharashtra:थंडीची चाहूल लागताच बाजारात सुक्या मेव्याला चांगली मागणी वाढली आहे. मात्र या वाढत्या मागणीसोबत सुक्या मेव्याच्या किमतींमध्ये देखील लक्षणीय वाढ झाली आहे. शरीराला ऊब मिळण्यासाठी घराघरात सुक्या मेव्याचे लाडू बनवले जात असताना, वाढलेल्या किमतींकडे ग्राहकांनी मात्र दुर्लक्ष केलं आहे. अधिक माहितीसाठी पाहूया हा खास रिपोर्ट… व्हॉइसओव्हर (V/O): नाशिकसह संपूर्ण जिल्ह्यात थंडीचा जोर वाढू लागला आहे. थंडीच्या दिवसांत शरीराला ऊर्जा देणारे सुकामेवा व त्यापासून बनणारे लाडू यांची जोरदार मागणी बाजारात दिसत आहे. पण मागणी सोबतच किमतींमध्ये मोठी उसळी दिसून येते आहे. खजूर, जो मागील वर्षी 150 रुपये किलो होता, तो आता थेट 200 रुपये किलो झाला आहे. खोबरे देखील 200 वरून थेट 350 रुपयांपर्यंत पोहोचलं आहे. दररोजच्या वापरातील काजू 750 रुपयावरून 850 रुपये किलो झाला आहे. तर बदामाचे दर 750 वरून 850 रुपये किलो इतके वाढले आहेत. पौष्टिकतेसाठी प्रसिद्ध अंजीर मात्र सर्वाधिक महाग; मागील वर्षी 800 रुपये असलेला अंजीर आता 1000 ते 1200 रुपये किलो दरम्यान विकला जात आहे. आणि बेदाण्याच्याही किमतींमध्ये मोठी उसळी – 220 रुपयांच्या बेदाण्याचा दर आता थेट 550 रुपये किलो झाला आहे. दर वाढले तरी ग्राहकांची खरेदी कमी झालेली नाही. आरोग्यासाठी उपयुक्त असल्याने सुक्या मेव्याची मागणी अधिक असून, थंडीत शरीराला ऊब देण्यासाठी या पदार्थांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Nov 19, 2025 04:32:13
Latur, Maharashtra:लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील चारचाकी, दुचाकी वाहने चोरणाऱ्या टोळीला अखेर पोलिसांनी पकडले... दोन जिल्ह्यात बार आणि दारु दुकाने फोडल्याचेही कबुली... टोळीतील दोघांना पकडले.... वाहने पळविणाऱ्यांना पकडले.... लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चारचाकी–दुचाकी चोरीच्या आणि दारू दुकानात चोरीच्या घटनांच्या वाढीची माहिती नागरिकांमध्ये चिंता निर्माण करत होती. अखेर या गुन्ह्यामागील टोळीला लातूर पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या टोळीतील दोघांना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून तब्बल ४६ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीत १५ गुन्ह्यांचा उलगडा झाल्याची माहिती देण्यात आली. दोन्ही जिल्ह्यांमध्ये वाहनं पळवणे, बार फोडणे आणि दारूची दुकाने लुटणे अशा पद्धतीने ही टोळी काम करत असल्याचं तपासात समोर आलं आहे. पोलिसांच्या वेगवान कारवाईमुळे परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या या टोळीचा पर्दाफाश झाला आहे.
112
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 19, 2025 04:18:59
Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यातील चार नगरपरिषद व एका नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया काल पूर्ण झाली. निवडणूक विभागाने सर्व नगरपरिषदांची अधिकृत आकडेवारी जाहीर केली आहे. छाननीनंतर वैध अर्जांची संख्या निश्चित झाल्याने सर्वच ठिकाणी निवडणुकांची लढत अधिक चुरशीची होणार आहे. वाशिम नगर परिषद अध्यक्षपद: एकूण अर्ज 32, वैध 22, अवैध 10; सदस्यपद: एकूण अर्ज 386, वैध 306, अवैध 80. कारंजा नगर परिषद अध्यक्षपद: एकूण अर्ज 15, वैध 12, अवैध 03; सदस्यपद: एकूण अर्ज 246, वैध 183, अवैध 63. रिसोड नगर परिषद अध्यक्षपद: एकूण अर्ज 13, वैध 10, अवैध 03; सदस्यपद: एकूण अर्ज 187, वैध 160, अवैध 27. मंगरूळपीर नगरपरिषद अध्यक्षपद: एकूण अर्ज 14, वैध 10, अवैध 04; सदस्यपद: एकूण अर्ज 163, वैध 138, अवैध 25. मालेगाव नगर पंचायत अध्यक्षपद: एकूण अर्ज 09, वैध 08, अवैध 01; सदस्यपद: एकूण अर्ज 83, वैध 72, अवैध 11.
119
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 19, 2025 03:52:32
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - अनगर नगराध्यक्ष पदाच्या राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या उमेदवार उज्वला थिटे यांचा अर्ज अखेर बाद, उज्वला थिटे आज न्यायालयात मागणार दाद. अनगर नगराध्यक्ष पदाच्या राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या उमेदवार उज्वला थिटे यांचा अर्ज बाद. सूचकाची सही नसल्यामुळे उज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाल्याची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची माहिती. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यानंतर उमेश पाटील आक्रमक. उज्वला थिटे आज न्यायालयात घेणार धाव. याविषयी अधिक माहिती देण्यासाठी थेट सोलापूरातून आपल्या सोबत जोडले गेले आहेत आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा.
100
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Nov 19, 2025 03:51:45
Satara, Maharashtra:सातारा - सातारा जिल्ह्यातील नऊ नगरपालिका निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेलेले असताना भाजपने विरोधकांना मोठा राजकीय धक्का दिला. मलकापूर आणि सातारा या दोन पालिकांमध्ये एकूण सहा जागांवर निवडणुकीपूर्वीच भाजपचे उमेदवार बिनविरोध विजय झालेले स्पष्ट झाले. अर्ज छाननीच्या प्रक्रियेदरम्यान भाजपने हा 'राजकीय षट्कार' मारला आहे. जिल्ह्यातील नऊ पालिकांसाठी भाजप, राष्ट्रवादी, शिंदेसेना, काँग्रेस, तसेच अपक्षांतून उमेदवारी अर्ज दाखल झाले. या अर्जाची ज्या त्या पालिका क्षेत्रात छाननी झाली त्यात मलकापुरात उमेदवारी अर्जाच्या छाननी वेळी दोन प्रभागांतील चार जागांसाठी चारच अर्ज शिल्लक राहिले. एका प्रभागात दोनपैकी एका उमेदवाराचा अर्ज बाद झाला. त्यामुळे या तीन प्रभागात भाजप चिन्हावर निवडणूक लढविणारे पाच उमेदवार बिनविरोध झाले. सातारा पालिकेच्या प्रभाग क्रमांक २० मधून भाजपच्या आशा पंडित यांनी अर्ज दाखल केला होता या प्रभागात इतर कोणीही अर्ज दाखल केला नाही त्यामुळे नगरसेवक पदाची माळ त्याचा गळ्यात पडली आहे. निवडणुकीपूर्वीच भाजपच्या षट्काराने विरोधकांना राजकीय धक्का दिला आहे. मलकापूर येथे भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे.
109
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Nov 19, 2025 03:48:16
Bhandara, Maharashtra:गोंदिया जिल्ह्यात एका 20 दिवसाच्या बाळाला चोरट्यांनी नेणे चोरून... रावणवाडी पोलिसांत गुन्हा दाखल... आपण आतापर्यंत अनेक चोऱ्या पाहिल्या आहेत. घरात घुसून चोरटे दागिने, पैसे चोरून नेतात पण गोंदिया जिल्ह्याच्या डांगोरली येथे चोरट्यांनी चक्क 20 दिवसाच्या बाळाला चोरून नेले आहे. रिया राजेंद्र फाये हिने गंगाबाई स्त्री रुग्णालयात एका गोडस बाळाला जन्म दिला, रुग्णालयातून सुट्टी झाल्यावर ते आपल्या स्वागवी परतले. डांगोरली येथील राहत्या घरी अज्ञात चोरटे घरात शिरले व 20 दिवसाच्या बाळाला चोरून नेले आहे. याची माहिती होताच घरच्यांनी रावणवाडी पोलिस स्टेशन गाठत तक्रार दिली आहे... तक्रारीच्या आधारे पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहे..
141
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 19, 2025 03:38:46
Dhule, Maharashtra:नंदुरबार जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक झाले असून, ऊसाला योग्य दर मिळत नाही तोपर्यंत ऊस तोडणी बंद राहणार, असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. ऊसाला २,८०० रुपये च्या दर मिळत आहे, मात्र शेतकऱ्यांना हा दर परवडत नसल्याने शेतकऱ्यांनी बैठक घेत जोपर्यंत योग्य दर मिळत नाही, जोपर्यंत ऊस तोडणी करायची नाही, असा निर्धार केला आहे. ऊस तोडणी बंद केल्याने कारखानदारांची डोकेदुखी वाढणार आहे. उसाच्या दर वाढवून देत नाही तोपर्यंत ऊस तोडणी बंद राहणार असल्याच्या निर्णय नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घेतला आहे. एकीकडे बियाणं, खत, मजुरी या सर्वच महागल्या आहेत. मात्र उसाला दर मिळत नसल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घेतलेला पवित्र कारखानदारांना त्रासदायक ठरणार हे मात्र निश्चित आहे. जोपर्यंत ऊसाला योग्य भाव भेटत नाही तोपर्यंत परिसरातील खांडसरी, सहकारी कारखाने, खाजगी कारखाने, यांना कोणीही ऊस देऊ नाही. यासाठी शेतकऱ्यांनी बैठक घेत ऊस तोडणी बंद करण्याच्या एकमताने निर्णय घेतला असल्याने याच्या फटका कारखानदारांना बसणार असल्याने आता कारखानदारांची भूमिका काय राहणार? हे पाहणं आता महत्त्वाच्या ठरणार आहे.
134
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 19, 2025 03:36:07
Nagpur, Maharashtra:नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या धामधूमित नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेसमधील पक्षांतर्गत गटबाज़ी मोठ्या प्रमाणात उफाळून आलीय. अनेक दशक काँग्रेस निष्ठावान राहिलेले नेतेही पक्षाला सोडचिट्ठी देत दुसऱ्या पक्षात जात आहे... प्रदेश सरचिटणीस राजा तिडके यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला आहे.... माजी मंत्री आणि काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या कार्यशैलीवर प्रचंड नाराजी आणि तीव्र टीका त्यांनी केलीय .. ते मौदा येथून भाजपाकडून नगराध्यक्ष पदासाठी मैदानात आहे .... दरम्यान जिल्हात अनेक ठिकाणी काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत नाराजी असून केदार यांच्या मनमानीवर तीव्र नापसंती अनेक नेते व्यक्त करत आहे.... दरम्यान काँग्रेस मधून भाजपावासी झालेले प्रसन्न तिडके यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी
105
comment0
Report
Advertisement
Back to top