Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Beed431122

बीड में RTI कार्यकर्ता के मित्र पर उपसरपंच के पति का हमला, वीडियो फिल्माया गया

MMMahendrakumar Mudholkar
Nov 28, 2025 02:32:54
Beed, Maharashtra
बीड: माहिती मागणाऱ्या आरटीआय कार्यकर्त्याच्या मित्राला उपसरपंचाच्या पतीकडून लाथा बुक्क्यांनी मारहाण, मारहाणाचा व्हिडिओ मोबाईल कॅमेरात कैद..! ANC - ग्रामपंचायतीच्या विकास कामा संदर्भात माहिती अधिकारात, मागितलेली माहिती घेण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात गेलेल्या तरुणाच्या मित्राने मोबाईल वर शूटिंग केली. आणि याचाच राग अनावर झाल्याने उपसरपंचाच्या पतीने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घटना केज तालुक्यातील कुंबेफळ येथील ग्रामपंचायत कार्यालयात घडली आहे. मारहाण करणारा उपसरपंच असलेल्या महिलेचा पती आहे. विष्णू थोरात असे त्याचे नाव आहे. ग्रामपंचायत कार्यालयातील महिला ग्रामसेवकाच्या समोरच ही मारहाण झालीय. याप्रकरणी केज पोलिसांत उपसरपंच महिलेच्या पतीसह अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीच्या घटनेने बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
TTTUSHAR TAPASE
Nov 28, 2025 02:46:27
Satara, Maharashtra:सातारा - भाजप मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी रहिमतपूर येथील सभेत मित्र पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी वर सडकून टीका केली आहे. सध्या घड्याळाची वेळ काही चांगली नाही. देशात फक्त वेळ कमळाची चांगली आहे. बाकीच्यांना आपल्या सोबत येण्याशिवाय पर्याय नाही. हातातलं घड्याळ वेगळं असतं पण चिन्ह जे घड्याळ आहे ते काय आपण गळ्यात घालून फिरू शकत नाही अशी खोचक टीका शिवेंद्रसिंहराजे यांनी केली आहे. राष्ट्रवादी मध्ये असताना आमचा वापर हा जिल्हा बँक, जिल्हा परिषद, खासदार, आमदार निवडून आणण्यासाठी होत होता मात्र ज्या वेळी संधी देण्याची वेळ असायची त्यावेळी आम्हाला डावललं जायचं अशी खंत मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या व्यक्त झाली आहे.
71
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 28, 2025 02:45:52
Washim, Maharashtra:अँकर:राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, वाशिम नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ ते भाजपच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनिल केंदळे तसेच भाजप नगरसेवकांच्या समर्थनार्थ जाहीर सभा घेणार आहेत.ही सभा दुपारी १:३० वाजता आयोजित करण्यात आली आहे.विशेष म्हणजे, राज्यात महायुती असली तरी वाशिममध्ये महायुतीतीलच काही उमेदवार एकमेकांविरुद्ध रिंगणात उभे असल्याने स्थानिक राजकारणात वेगळीच रंगत निर्माण झाली आहे.अशा परिस्थितीत मुख्यमंत्री फडणवीस आपल्या सभेत वाशिमच्या विकासात्मक धोरणांविषयी काय भूमिका मांडतात आणि विरोधकांवर कोणत्या मुद्द्यांवर टीका करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे。
66
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 28, 2025 02:33:37
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:जून ते सप्टेंबरदरम्यान मराठवाड्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले. ३२ लाख हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली. या नुकसानीच्या भरपाईसाठी शासनाने ८ हजार ७०८ कोटी ४८ लाख रुपयांचा मदतनिधी मंजूर केला. त्यापैकी ५ हजार ७०५ कोटी रुपये ७६ लाख ८८ हजार ८०३ शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा झाले आहेत. हे वाटप डीबीटी प्रणालीद्वारे करण्यात येत आहे. दिवाळीपूर्वी सर्व शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्याचा दावा फोल ठरला असून अद्यापही २९ लाख ६० हजार लाभार्थी अनुदान मिळण्यापासून वंचित आहेत. विभागीय आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार, एकूण १ कोटी ६ लाख ४९ हजार ५२९ शेतकरी बाधित झाले आहेत. आतापर्यंत ८३ लाख ५१ हजार ६६५ शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड केल्या. त्यातील ६५.५१ टक्के शेतकऱ्यांना अनुदान मिळाले आहे. उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याचे काम सुरू आहे. शासनाने तीन हेक्टरपर्यंतच्या शेतजमिनीसाठी मदत देण्याचे धोरण ठरवले आहे. अनेक मंडळांमध्ये जून, जुलै महिन्यातही अतिवृष्टी झाली. पंचनामे सुरू असतानाच पावसाचा जोर कायम होता. जिल्हानिहाय अनुदान वाटप : छत्रपती संभाजीनगर ५५ टक्के, जालना ५३ टक्के, परभणी ६५ टक्के, हिंगोली ६४ टक्के, नांदेड ६५ टक्के, बीड ७३ टक्के, लातूर ७३ टक्के, तर धाराशिवमध्ये ६५ टक्के अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले.
207
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 28, 2025 02:31:18
Washim, Maharashtra:वाशिम नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीची सभा विशेष लक्षवेधी ठरली. पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या अंजली आंबेडकर यांनी या सभेतून थेट अनुभवी नेत्यांवर टीका करत तरुण नेतृत्वाला संधी देण्याची गरज अधोरेखित केली. वंचितच्या वाशिम नगरपरिषदेच्या २२ वर्षांच्या तरुण उमेदवार वैभव उलेमाले यांच्या समर्थनार्थ बोलताना त्या म्हणाल्या, 'तुमच्याकडे लाखो लोक प्रचारासाठी येतात, पण येथे तरुण मुले आहेत. त्यांना काय अनुभव आहे, असा सवाल करणाऱ्यांनी हे समजून घ्यावे की अनुभव देण्याची संधी आम्हीच देणार आहोत. तुमच्या अनुभवाचा काही उपयोग झाला नाही. त्यामुळे आता नव्या विचारांना आणि नव्या उर्जेला संधी देण्याची वेळ आली आहे.' त्या पुढे म्हणाल्या की, 'आमचं भविष्य आता या तरुणाच्या हातात देणार आहोत.' वंचित बहुजन आघाडीकडून राज्यातील सर्वात तरुण उमेदवार म्हणून वैभव उलेमाले उभे असून त्यांच्या सभेला युवा वर्गाचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे स्पष्टपणे जाणवले.
132
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 28, 2025 02:18:23
94
comment0
Report
SKSudarshan Khillare
Nov 28, 2025 02:17:48
Yeola, Maharashtra:येवला नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये एकीकडे प्रमुख राजकीय पक्षांनी कंबर कसून प्रचाराचा धुराळा उडवला आहे तर दुसरीकडे अपक्षांनी देखील राजकीय पक्षांपुढे मोठे आव्हान उभ करत जोरदार प्रचार करून रॅली व सभांना मोठी गर्दी जमवली आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून तिकीट न मिळाल्यामुळे येवला शहरातील प्रभाग क्रमांक १२(ब) नगरपरिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून उभे असलेल्या सागर (बंटी) दिलीप परदेशी यांच्या प्रचाराला सध्या चांगलीच गती मिळाली असून, स्थानिक पातळीवर त्यांना मोठ्या प्रमाणावर मतदारांचा पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. या रॅलींमध्ये युवकांसह ज्येष्ठ नागरिक, महिलांचा सहभाग लक्षणीय दिसून येत आहे. या संदर्भात आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी.
150
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Nov 28, 2025 02:17:30
Bhandara, Maharashtra:रस्त्यावर वाघाची दबंग एन्ट्री! किटाडी–मासळ मार्ग ठप्प; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल किटाडी ते मासळ मार्गावर सायंकाळी अचानक पट्टेदार वाघ रस्त्यावर उतरल्याने नागरिकांचा आणि वाहनचालकांचा काही काळ मार्ग पूर्णतः बंद झाला. हा रोमांचक आणि थरारक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. वाहन् चालकांनी रस्ता ओलांडण्यापूर्वीच वाघ समोर दिसताच आपली वाहने तत्काळ थांबवली. दरम्यान,वाघाने शांतपणे रस्ता ओलांडताना अनेकांनी हा प्रसंग मोबाईलमध्ये कैद केला. काही क्षणांतच हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला असून तो चांगलाच व्हायरल होत आहे. या भागात वन्यजीवांची वर्दळ वाढत असल्याने नागरिक आणि वाहनधारकांनी सतर्क राहण्याचे आवाहनही स्थानिकांनी केले आहे. वन विभागालाही याबाबत माहिती देण्यात आली असून पुढील काळात गस्ती वाढविण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
160
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 28, 2025 02:16:54
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:तोतया आयएएस कल्पना भागवतचे कनेक्शन पाकिस्तान, अफगाणिस्तानपर्यंत पोहोचले असतानाच, आता या प्रकरणाला केंद्रीय गृहमंत्री कार्यालयाचेही गंभीर वळण लागले आहे. हेरगिरीचा संशय असलेल्या या प्रकरणात तिच्या मोबाईल मध्ये ओएसडी टू होम मिनिस्टर असा एक नंबर होता तो नंबर बोगस असल्याचा पुढे आला आहे, या महिलेने अमित शहा यांचे खासगी सचिव अभिषेक चौधरी यांच्या नावाचा गैरवापर केल्याचेही पुढ आलाय.. दरम्यान तोतया महिला आयएएस कल्पना भागवतने केलेला आर्थिक व्यवहार आणि संपर्काची साखळी उलगडण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. त्यांनी कल्पना भागवतशी संबंधित २८ जणांना चौकशीसाठी हजर राहण्याच्या नोटीसा बजावली आहे. यात कल्पनाच्या खात्यावर पैसे पाठवणाऱ्या व्यक्तींचाही समावेश असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे。
118
comment0
Report
Advertisement
Back to top