Back
मराठवाडा में बाढ़-आपदा से किसानों को भारी नुकसान, सरकार ने 8708 करोड़ राहत मंजूर
VKVISHAL KAROLE
Nov 28, 2025 02:33:37
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
जून ते सप्टेंबरदरम्यान मराठवाड्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले. ३२ लाख हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली. या नुकसानीच्या भरपाईसाठी शासनाने ८ हजार ७०८ कोटी ४८ लाख रुपयांचा मदतनिधी मंजूर केला. त्यापैकी ५ हजार ७०५ कोटी रुपये ७६ लाख ८८ हजार ८०३ शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा झाले आहेत. हे वाटप डीबीटी प्रणालीद्वारे करण्यात येत आहे. दिवाळीपूर्वी सर्व शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्याचा दावा फोल ठरला असून अद्यापही २९ लाख ६० हजार लाभार्थी अनुदान मिळण्यापासून वंचित आहेत.
विभागीय आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार, एकूण १ कोटी ६ लाख ४९ हजार ५२९ शेतकरी बाधित झाले आहेत. आतापर्यंत ८३ लाख ५१ हजार ६६५ शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड केल्या. त्यातील ६५.५१ टक्के शेतकऱ्यांना अनुदान मिळाले आहे. उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याचे काम सुरू आहे. शासनाने तीन हेक्टरपर्यंतच्या शेतजमिनीसाठी मदत देण्याचे धोरण ठरवले आहे. अनेक मंडळांमध्ये जून, जुलै महिन्यातही अतिवृष्टी झाली. पंचनामे सुरू असतानाच पावसाचा जोर कायम होता.
जिल्हानिहाय अनुदान वाटप :
छत्रपती संभाजीनगर ५५ टक्के,
जालना ५३ टक्के,
परभणी ६५ टक्के,
हिंगोली ६४ टक्के,
नांदेड ६५ टक्के,
बीड ७३ टक्के,
लातूर ७३ टक्के,
तर धाराशिवमध्ये ६५ टक्के अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
TTTUSHAR TAPASE
FollowNov 28, 2025 02:46:2771
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 28, 2025 02:45:5266
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowNov 28, 2025 02:32:54127
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 28, 2025 02:32:3771
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 28, 2025 02:32:03113
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 28, 2025 02:31:37114
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 28, 2025 02:31:18132
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 28, 2025 02:18:2394
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 28, 2025 02:17:48150
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 28, 2025 02:17:30160
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 28, 2025 02:17:14143
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 28, 2025 02:16:54118
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 28, 2025 02:01:46163
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 28, 2025 02:01:02181
Report