Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Beed431122

बीड नगरपरिषद में 19 उम्मीदवार नगराध्यक्ष पद के लिए मैदान में, 52 सीटों के लिए 288 उम्मीदवार

MMMahendrakumar Mudholkar
Nov 22, 2025 02:18:04
Beed, Maharashtra
बीड़ नगरपरिषदेत 19 उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढणार तर 52 जागेवर 288 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात भाजपასა आणि दोन्ही राष्ट्रवादीत होणार अटीतटीची लढत बीड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी 26 उमेदवार वैध ठरले होते. त्यापैकी 7 उमेदवारांनी आज निवडणुकीतून माघार घेतलीय. त्यामुळे एकूण 19 उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक रिंगणात असणार आहेत. तर 26 प्रभागात 52 जागेसाठी 288 उमेदवार निवडणük लढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. ज्या उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. केवळ त्याच उमेदवाराने आज शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
88
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VKVISHAL KAROLE
Nov 22, 2025 03:03:14
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने ८ हजार ७०८ कोटींचे अनुदान जाहीर केले. त्यातील ५ हजार २८७ कोटी रुपये ७० लाख ९२ हजार ७३४ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले. ई-केवायसी किंवा अग्रिस्टॅक नोंद नसलेल्या ४० टक्के शेतकऱ्यांना रक्कम वाटपाची अजूनही प्रतीक्षा आहे. सुमारे ६ लाख ७८ हजार ३५९ शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रलंबित आहे. त्यामुळे ४१२ कोटींचे अनुदान अडकले आहे. जिल्हानिहाय वाटप पाहता बीड जिल्ह्यात सर्वाधिक १३ लाख ३१ हजार ८६५ शेतकरी बाधित झाले. त्यांना ९८४.४९ कोटींचे अनुदान मिळाले. नांदेडमध्ये ११ लाख ३१ हजार ३५६ शेतकऱ्यांना ९११.३८ कोटी, लातूरमध्ये ११ लाख ५० हजार ७६३ शेतकऱ्यांना ७५५.७० कोटी, धाराशिवमध्ये ७लाख ९० हजार ६०५ शेतकऱ्यांना ६८७.११ कोटी, परभणीत ८ लाख ३३ हजार ९२७ शेतकऱ्यांना ५५३.१८ कोटी, छत्रपती संभाजीनगरमध्ये ७लाख ६५ हजार ४७५ शेतकऱ्यांना ५९९.१३ कोटी, जालन्यात ५ लाख ९२ हजार १७७ शेतकऱ्यांना ४०४.७३ कोटी, हिंगोलीत ४ लाख ९६ हजार ५६६ शेतकऱ्यांना ३९१.८१ कोटींचे अनुदान मिळाले. एकूण ७० लाख ९२ हजार ७३४ शेतकऱ्यांना ५ हजार २८७.५६ कोटींचे अनुदान बँक खात्यात जमा झाले आहे...
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 22, 2025 03:02:54
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्तीसगड, दिल्लीच्या टोळ्यांसोबत हातमिळवणी करून संभाजी नगर शहरातील पाच उच्चशिक्षित तरुणांनी बोगस ऑनलाइन गेमिंग, सट्टेबाजीचे सेंटर उघडले. मात्र, हे रॅकेट पूर्णपणे ते चालवत नव्हते. दुबई व देशाच्या मुख्य सूत्रधारांकडून या जुगाराच्या वेबसाइटची टक्केवारीवर फ्रेंचायजी मॉडेल चालवण्यासाठी दिले जाते. अशा विविध वेबसाइट, अॅपद्वारे अब्जावधी रुपयांची उलाढाल होते. हा सर्व व्यवहार हवालामार्फत चालतो, अशी माहिती आता पुढे आली आहे... अनेकदा देशविघातक कृत्यासाठी या माध्यमाचा वापर केला जातो. परिणामी, केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून अशा वेबसाइटचे काम करणारे, वापरले जात असलेल्या बँक खात्यांचा शोध सुरू करण्यात आल्यानेच आता असे रॅकेट उघडकीस येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. कुंभेफळ येथे स्वतःला सॉफ्टवेअर इंजिनीअर सांगून भाडेतत्त्वावर रो-हाऊस घेऊन २४ तास देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध ४० खेळांसह गेम्सद्वारे डिजिटल जुगार खेळवला जात होता. महिन्याभरापूर्वी सुरू झालेल्या या सेंटरवर पोलिसानी 2 दिवस पूर्वी छापा घालून 5 जणांना अटक केलीय..
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Nov 22, 2025 02:48:41
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या बाबाजी दाते महिला सहकारी बँकेतील 242 कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार ज्या गुन्हे दाखल झाले त्या अधिकारी, कर्मचारी व संचालकांना पोलिसांनी राजकीय दबावापोटी अभय दिले आहे असा आरोप बँकेचे सभासद अतुल जगताप यांनी केला आहे. विशेष म्हणजे या घोटाळ्यात ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत ते कर्मचारी बँकेत कार्यरत राहून महत्त्वाची कागदपत्रे हाताळतात व इतर आरोपी देखील राजरोसपणे मोकाट असल्याचे पुरावे देखील जगताप यांनी दाखविले. पोलीस मात्र आरोपींना सोडून तक्रारदारांनाच मानसिक त्रास देत असल्याचा आरोप देखील जगताप यांनी केला. बँक घोटाळ्यातील आरोपींना नेमके संरक्षण कोणाचे असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
52
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Nov 22, 2025 02:47:36
Pune, Maharashtra:Headline : तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकित १९ जागा बिनविरोध, ९ जागांवर रंगणार चुरस. Anchor: तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी मोठी घडामोड झाली. एकूण ३२ उमेदवारांनी माघार घेतली असून, याआधी ७ अर्ज मागे घेतले होते. त्यामुळे एकत्रित ३९ अर्जांची माघार नोंदली गेल्याने १९ जागा बिनविरोध ठरल्या आहेत. परिणामी, तळेगावमध्ये आता केवळ ९ प्रभागांमध्येच प्रत्यक्ष मतदानाची लढत होणार आहे. तर नगराध्यक्षपदावर तिरंगी लढत स्पष्ट. नगराध्यक्ष पदासाठीची स्पर्धाही निर्णायक रूप धारण केली. दोन उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर तिरंगी सामना होणार आहे. अंतिम लढत पुढीलप्रमाणे संतोष हरिभाऊ दाभाडे (महायुती – राष्ट्रवादी/भाजप युती) (file no.02) किशोर छबुराव भेगडे (अपकम – भाजप बंडखोर) (file no.03) रंजना रघुनाथ भोसले (अपकम – काँग्रेस बंडखोर)(file no.04) या तिन्ही उमेदवारांमुळे नगराध्यक्षपदाची निवडणूक अधिकच रंगतदार होणार आहे.
118
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 22, 2025 02:45:16
108
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Nov 22, 2025 02:34:53
Akola, Maharashtra:शासनाच्या धोरणांमुळे आणि सीसीआयच्या मर्यादित खरेदीमुळे शेतकऱ्यांना योग्य दर न मिळाल्याच्या निषेधार्थ प्रहार जनशक्ती पक्षातर्फे अकोट ते अकोला असा तब्बल 50 किलोमीटर पायदळ कापूस दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यंदा कापूस उत्पादनात झालेली घट, वाढती खर्चिक परिस्थिती आणि बाजारभावातील घसरण यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. सध्या शेतकऱ्यांना एकरी सरासरी 15 क्विंटल उत्पादन मिळत असतानाही शासन केवळ 5.6 क्विंटलपर्यंतच खरेदी मर्यादा ठेवत आहे. ही मर्यादा वाढवून 11 क्विंटलपर्यंत करण्याची प्रमुख मागणी या पायदळ वारीतून करण्यात आली. तसेच सीसीआयने खरेदीसाठी घालून दिलेल्या कडक नियमांमुळे कापूस विक्री प्रक्रियेत शेतकऱ्यांवर अनेक निर्बंध येत असून त्यांचा मोठ्या प्रमाणात तोटा होत असल्याचा आरोपही करण्यात आला. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष कुलदीप वसु यांच्या नेतृत्वाखाली ही कापूस दिंडी काढण्यात आली. अखेर ही दिंडी अकोल्यातील सीसीआय कार्यालयासमोर दाखल झाली आणि शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीने मान्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
136
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 22, 2025 02:34:21
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी महापालिका प्रशासनाने मतदार याद्या जाहीर केल्या. इच्छुक उमेदवारांनी मतदार याद्यांचा अभ्यास सुरू केला. त्यामध्ये प्रचंड चुका असल्याचे समोर येत आहे. एका प्रभागातील हजार ते दीड हजार मतदार पलीकडील तिसऱ्या प्रभागात दर्शविण्यात आले आहेत. त्यामुळे शुक्रवारी ७ जणांनी निवडणूक विभागात आक्षेप दाखल केले. आक्षेप घेण्यासाठी ७ दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. निवडणूक विभागाने शुक्रवारी प्राप्त हरकतींची फेरतपासणी सुरू केली आहे. हरकती- सूचनांवर सुनावणी घेतल्यानंतर अंतिम मतदार यादी ५ डिसेंबरला निवडणूक आयोगाला पाठवली जाईल. नवीन मतदान केंद्रांची पाहणी करण्यासाठी प्रशासनाने अभियंत्यांची स्वतंत्र टीम तयार केली आहे...
210
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 22, 2025 02:33:37
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सहा नगरपरिषद आणि १ नगरपंचायतीसाठी दाखल केलेले अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १६१ सदस्यांनी मैदान सोडले. यात नगरसेवक पदासाठी १४९, तर नगराध्यक्षपदाच्या १२ उमेदवारांसह एकूण १६१ जणांचा समावेश आहे. निवडणूक मैदानात ६५९ उमेदवार शिल्लक राहिले आहेत. यात नगराध्यक्षपदासाठी ४२, तर नगरसेवकपदासाठी ६१७ उमेदवार आमने-सामने लढणार आहेत. जिल्ह्यात कुठेही बिनविरोध निवडणूक झालेली नाही. काहींनी न्यायालयात धाव घेतल्याने २६ नोव्हेंबरपर्यंत त्यावर सुनावणी झाल्यानंतर निवडणूक मैदानात असलेल्यांचा अंतिम आकडा समोर येणार आहे. तूर्तास ६५९ उमेदवारांमध्ये राजकीय दंगल होणार आहे. छाननीनंतर नगरपरिषद, नगरपंचायतीत आपल्याला सहज विजय मिळावा म्हणून विरोधकांचे अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. यात काहींना यशही आले. २१ नोव्हेंबरअखेरीस निवडणूक मैदानात ६५९ उमेदवार आपले राजकीय भाग्य अजमावणार आहेत.
185
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Nov 22, 2025 02:18:52
Bhandara, Maharashtra:नेहमी परिवारवाद म्हणणाऱ्या भाजपा स्वतः परिवार वादात अडकली आहे.... म्हणून परिवर्तनाची लाट आपल्याला पाहायला मिळणार आहे. असे नाना पटोले म्हणाले आहे..... भंडारा जिल्ह्यातील साकोली नगर परिषदेत सर्वांचे लक्ष लागलेलं आहे. कारण काँग्रेस नेते नाना पटोले यांचा मतदार संघ आहे. त्यामुळे सर्वांच केंद्रबिंदू ठरत आहे.. भंडारा जिल्ह्यातून गल्ली पासून दिल्ली पर्यंत आपली छाप सोडणाऱ्या नाना पटोले यांचा साकोली विधानसभा मतदार संघ आहे याच मतदार संघातील साकोली नगर परिषदेकरिता निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. साकोली मतदार संघात भाजपची एकहाती सत्ता होती पण भाजपने विकास केला नाही अशी ओरड स्वतः मित्र पक्षातून होत आहे.. नेहमी परिवारवाद अशी काँग्रेसवर भाजपाने टीका केली आहे. पण नगर परिषद निवडणुकीत भाजपने स्वतः माजी आमदार हेमकृष्ण कापगते यांच्या सुनेला मैदानात उतरविला आहे. त्यामुळे नेहमी परिवार वादात अडकली आहे.. सर्वच राजकीय पक्ष स्थानिक समस्या घेऊन निवडणुकीत जात आहे. नगर परिषदेत गुलाल आपलाच अशी भूमिका सर्वच राजकीय पक्षांची आहे... देवश्री कापगते, भाजपा उमेदवार भारती लंजे, राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा असं पक्ष आहे. की एक दुसऱ्यावर आरोप लावत आहे. पण त्यांना माहिती नाही की एक बोट दुसऱ्याकडे केलं तर चर बोट आपल्याकडे असतात. नीतिमत्तेमध्ये भाजप राहिलेली नाही. कशाच प्रकारे सत्ता सत्तेतून भ्रष्टाचार अशी भाजपा राहिली आहे. सर्वसामान्य लोकांचा सन्मान व लोकांच्या हिताचं काम काँग्रेस करतं आहे. म्हणून परिवर्तनाची लाट आपल्याला पाहायला मिळणार आहे. असे नाना पटोले म्हणाले आहे. नाना पटोले, आमदार काँग्रेस
185
comment0
Report
SKSudarshan Khillare
Nov 22, 2025 02:02:34
:सिन्नर के नायगाव में गावगुंडों का हैदोस: इलेक्ट्रिकल व्यवसायी को खंडणी की धमकी। सिन्नर तालुक्यातील नायगाव परिसर में गावगुंडांनी पुन्हा हैदोस घातल्याची घटना समोर आली आहे। एका इलेक्ट्रिकल व्यवसायी को मारहाण करके और सीधे दुकान को जलाने की धमकी देकर खंडणी माँगने का मामला सिन्नर MIDC पुलिस थाने में दर्ज किया गया है। आरोपी ने व्यवसायी को पचास हजार देने के लिए कहा, नहीं तो दुकान जलाने की धमकी दी। नायगाव में गावगुंडांचा बढ़ता उपद्रव और हैदोस के कारण नागरिकों में भय का वातावरण है। इस गंभीर प्रकरण में सिन्नर MIDC पुलिस थाना में संबंधित आरोपियों के खिलाफ खंडणी का अपराध दर्ज किया गया है。
169
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Nov 22, 2025 02:01:04
185
comment0
Report
Advertisement
Back to top