Back
किसान परेशान: 50 किमी कपास दिंडी से मांग, सरकार खरीद सीमा बढ़ाओ
JJJAYESH JAGAD
Nov 22, 2025 02:34:53
Akola, Maharashtra
शासनाच्या धोरणांमुळे आणि सीसीआयच्या मर्यादित खरेदीमुळे शेतकऱ्यांना योग्य दर न मिळाल्याच्या निषेधार्थ प्रहार जनशक्ती पक्षातर्फे अकोट ते अकोला असा तब्बल 50 किलोमीटर पायदळ कापूस दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यंदा कापूस उत्पादनात झालेली घट, वाढती खर्चिक परिस्थिती आणि बाजारभावातील घसरण यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. सध्या शेतकऱ्यांना एकरी सरासरी 15 क्विंटल उत्पादन मिळत असतानाही शासन केवळ 5.6 क्विंटलपर्यंतच खरेदी मर्यादा ठेवत आहे. ही मर्यादा वाढवून 11 क्विंटलपर्यंत करण्याची प्रमुख मागणी या पायदळ वारीतून करण्यात आली. तसेच सीसीआयने खरेदीसाठी घालून दिलेल्या कडक नियमांमुळे कापूस विक्री प्रक्रियेत शेतकऱ्यांवर अनेक निर्बंध येत असून त्यांचा मोठ्या प्रमाणात तोटा होत असल्याचा आरोपही करण्यात आला. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष कुलदीप वसु यांच्या नेतृत्वाखाली ही कापूस दिंडी काढण्यात आली. अखेर ही दिंडी अकोल्यातील सीसीआय कार्यालयासमोर दाखल झाली आणि शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीने मान्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
136
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SGSagar Gaikwad
FollowNov 22, 2025 03:33:420
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 22, 2025 03:31:450
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 22, 2025 03:30:210
Report
MAMILIND ANDE
FollowNov 22, 2025 03:17:45113
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 22, 2025 03:17:1250
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 22, 2025 03:16:43115
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 22, 2025 03:03:14107
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 22, 2025 03:02:54113
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 22, 2025 02:48:4199
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowNov 22, 2025 02:47:36213
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 22, 2025 02:45:16160
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 22, 2025 02:34:21210
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 22, 2025 02:33:37185
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 22, 2025 02:19:22173
Report