Back
बीड जिला अस्पताल में मानवता पर सवाल, आजी झोली में दर्द के साथ तड़पती रहीं
MMMahendrakumar Mudholkar
Jan 22, 2026 08:46:56
Beed, Maharashtra
बीड: विदारक; जिल्हा रुग्णालयात मानवतेला कुलूप, आजी झोळीत विव्हळत पडली..!
ANC - बीड जिल्हा रुग्णालयातील एक माणुसकीला काळीमा फासणारा क्रूरपणा उजेडात आलाय. तिसऱ्या मजल्यावर उपचार घेत असलेल्या एका आजीला सिटी स्कॅनसाठी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तळमजल्यावर झोळीत आणले. मात्र सायंकाळी पावणे सहा वाजताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी संबंधित विभागाला कुलूप ठोकले. निरागस आजी दरवाजाच्या बाहेर झोळीत विव्हळत पडली होती, पण रुग्णालयातील कोणालाही तिच्या वेदनेची दखल घ्यावीशी वाटली नाही. नर्सने चक्क कुलूप लावून तिथून निघून गेल्या. हा सर्व प्रकार सामाजिक कार्यकर्त्यांनी मोबाईल कॅमेरात कैद केला. त्यानंतर सरकारी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे बिंग फुटले आहे. तीन महिन्यांपूर्वी पालकमंत्री अजित पवार यांनी या रुग्णालयाचे मोठ्या थाटामाटात उद्घाटन केले होते. उद्घाटनाच्या वेळी दाखवलेली भव्यता आता रुग्णांच्या वेदनांसमोरी सध्या तरी मावळती ठरत आहे. रुग्णालय प्रशासन आणि आरोग्य विभागाची उदासीनता लक्षात घेता, अशी घटना भविष्यात पुन्हा होऊ नये यासाठी त्वरित कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. चार दिवसापासून लिफ्ट बंद असल्याने रुग्णांना उपचारासाठी हातावर किंवा झोळीत घेऊन जाण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. दरम्यान कर्तव्यात हलगर्जीपणा करणाऱ्या परिचारिकेला तत्काळ तिथून बदलण्यात आले असून संबंधित एका महिला डॉक्टरला देखील नोटीस देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सतीशकुमार सोळंके यांनी दिली आहे.
बाईट: सतीशकुमार सोळंके, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
DPdnyaneshwar patange
FollowJan 22, 2026 10:19:500
Report
VKVISHAL KAROLE
FollowJan 22, 2026 10:18:300
Report
PNPratap Naik1
FollowJan 22, 2026 10:16:390
Report
PNPratap Naik1
FollowJan 22, 2026 10:03:220
Report
PNPratap Naik1
FollowJan 22, 2026 10:02:060
Report
KPKAILAS PURI
FollowJan 22, 2026 09:46:000
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowJan 22, 2026 09:33:010
Report
SNSWATI NAIK
FollowJan 22, 2026 09:22:320
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowJan 22, 2026 09:17:510
Report
SNSWATI NAIK
FollowJan 22, 2026 08:47:180
Report
AKAMAR KANE
FollowJan 22, 2026 08:47:060
Report
SNSWATI NAIK
FollowJan 22, 2026 08:07:020
Report
SKSACHIN KASABE
FollowJan 22, 2026 07:45:460
Report
SNSWATI NAIK
FollowJan 22, 2026 07:45:24Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई ब्रेकिंग
मुंबई महापालिकेतील मनसेचे 6 नगरसेवक आणि नवी मुंबई महापालिकेतील मनसेचा 1 नगरसेवक कोकण भवन येथे दाखल.
मनसेची गट नोंदणी करण्यासाठी मनसे नगरसेवक दाखल.
मनसे नगरसेवकांसोबत मनसे नेते नितीन सरदेसाई देखिल उपस्थित.
0
Report