Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nagpur440001

नागपुर के कळमना मार्केट में अवकाली बरसात से धान्य के बैग भिगे, नुकसान

AKAMAR KANE
Feb 23, 2026 05:05:39
Nagpur, Maharashtra
नागपूर - रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे कळमना मार्केटला फिल्टर बाहेर ठेवलेल्या धान्यचे पोते भिजल्याने नुकसान झाले. नागपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती कळमना मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणात धान्याची आवक होत असते. या ठिकाणी शेतकऱ्यांचा विक्रीसाठी आणलेल्या धान्याचे पोते उघड्यावर होते. त्यामुळे काल रात्री झालेल्या अवकाळी पावसाच्या पाण्यामुळे पोत्यातील धान्य भिजले आहे. त्यामुळे अवकाळी पावसाचा फटका शेतात असणाऱ्या पिकांनाच नाही, तर बाजारात विकायला आणलेल्या धान्य मालालाही बसलेला आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SMSATISH MOHITE
Feb 23, 2026 06:49:53
Nanded, Maharashtra:कचरा टाकल्याच्या कारणावरून दोन गटात वाद झाला. एका वर दगडफेक करण्यात आली, तसेच घरात घुसून तोडफोड केल्याचा आरोप आहे. रविवारी सायंकाळी नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील ही घटना आहे. देळूब येथील स्वप्नील बोंधारे यांनी फळाचा कचरा रस्त्यावर टाकला होता. त्यावरुन दुसऱ्या गटाने त्याला बोलावून घेउन शिवीगाळ केली. नंतर जमवाने बोंधारे यांच्या घरावर दगडफेक करत घरात घुसून तोडफोड केल्याचा आरोप आहे. याच कारणामुळे दोन गट आमने सामने आले. ईथे मोठा जमाव जमला आणि दोन गटात वाद झाला. एका गटाने धुडगुस घातला. वेळीच पोलीस गावात पोहचले त्यामुळे परिस्तिथी नियंत्रणात आली. या प्रकरणी अर्धापूर पोलीसांनी देळूब गावच्या सरपंचासह 69 जणांवर गुन्हा दाखल केला.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Feb 23, 2026 06:34:27
Akola, Maharashtra:राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूला २८ फेब्रुवारीला एक महिना पूर्ण होत असताना या घटनेबाबत अजूनही अनेक शंका अनुत्तरित असल्याचे त्यांनी म्हटले आहे.मिटकरी म्हणाले की, हा प्रकार अपघात होता की घातपात, हे महाराष्ट्रासमोर स्पष्ट झाले पाहिजे. संबंधित वैमानिक कपूर याच्या भूतकाळाबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले असून, त्याची ‘ड्रंक हिस्ट्री’ असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच हा प्रकार सुसाईड मिशनसारखा तर नव्हता ना, अशी शंका त्यांनी व्यक्त केली.यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येचा उल्लेख करत तुलना केली. तसेच डीजीसीएच्या अहवालानुसार विमानात सहा जण असल्याचे सांगितले जात असताना घटनास्थळी पाचच मृतदेह सापडल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि पारदर्शक चौकशी व्हावी, तसेच सत्य महाराष्ट्राच्या जनतेसमोर यावे, अशी मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Feb 23, 2026 06:32:24
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:कृष्णा नदीतील शेकडो माशांचा मृत्यू, शेरीनाल्याचे सांडपाणी व मयूषित पाण्यामुळे मृत्यूचा आरोप.. सांगलीच्या कृष्णा नदीमध्ये हे मासे मृत्यू मुखी पडल्याची घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. कृष्णा नदीतल्या सांगली बंधारया जवळ शेकडो मासे मृत्यू मुखी पडले आहेत.त्यामुळे नदी काठावर मोठी दुर्गंधी पसरली आहे.कृष्णा नदीची पाण्याची पातळी सध्या खालावली आहे,अशा मध्ये शहरातल्या शेरीनाल्याचे सांडपाणी आणि नदी काठच्या कारखान्यांकडून सोडण्यात येणाऱ्या मळी मिश्रित पाण्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे.कृष्णा नदी पात्रामध्ये वारंवार मासे मृत्युमुखीच्या घटना घडतात मात्र याकडे प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून जाणीपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप देखील करण्यात येत आहे.
0
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Feb 23, 2026 06:18:14
Pune, Maharashtra:पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर आज पुन्हा एकदा गॅस टँकरचा अपघात झाला. अचानकपणे टँकरचा ब्रेक फेल झाला, चालकाने प्रसंगावधान दाखवत टँकरची डोंगराला धडक दिली. सुदैवाने टँकर पलटला नाही. अमृतांजन पुलाजवळ दहाच्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर महामार्ग पोलीस आणि प्रशासनाने तातडीनं घटनास्थळी धाव घेतली अन पुढच्या काही वेळात क्रेनच्या साह्याने टँकर बाजूला घेण्यात आला. काही काळ वाहतूक ठप्प होती खरी मात्र आडोशी बोगड्याजवळ झालेल्या अपघातातून यंत्रणांनी धडा घेतल्याचं दिसून आलं. त्यामुळं यावेळी वाहतूक कोंडी टळली. वेळोवेळी महामार्ग पोलीस आणि प्रशासनावर संताप व्यक्त करणाऱ्या प्रवाश्यांनी यावेळी मात्र त्यांचं कौतुक केलं.
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Feb 23, 2026 06:02:47
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Feb 23, 2026 05:46:12
0
comment0
Report
Advertisement
Back to top