Back
शिर्डी नगरपालिका सीट के आरक्षण पर गुटबाज़ी, विखे-पाटिल समर्थकों में टकराव की आहट
KJKunal Jamdade
Oct 07, 2025 04:34:06
Shirdi, Maharashtra
नगरपालीकांसाठी आरक्षण जाहीर झाल्याने शिर्डीमध्ये विखे समर्थकाने सुजय विखेंना टोलाणारी बॅनरबाजी केली आहे. शिर्डी नगरपरिषदेत नगराध्यक्ष पदाचे आरक्षण अनुसूचित जातीसाठी जाहीर झाल्यामुळे अनेक इच्छुकांच्या स्वप्नांवर पाणी पडले. शिर्डीचे माजी नगराध्यक्ष तथा विखे पाटलांचे कट्टर समर्थक कैलास कोटे यांनी शिर्डीच्या शिवेवर बॅनरबाजी केली. 'शाळा सुटली, पाटी फुटली. आई मला दादांनी मारलं. आई, दादाचं वाक्य खरं ठरलं' अशा आशयाच्या बॅनरबाजीमुळे शिर्डीतील राजकारण तापलं असून ऐन निवडणुकीच्या तोंडावर गटबाजीत चव्हाट्यावर आली आहे. सुजय विखे यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या भाषणाचा दाखला देत नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असणारे कैलास कोते यांनी ही बॅनरबाजी केली. 'शिर्डी नगरपरिषदेत नगराध्यक्ष आरक्षण एस.सी. महिला जाहीर झालं. लोणी ते शिर्डी पायी पदयात्रा निमित्त सुजय दादा विखे पाटील यांचे हार्दिक स्वागत. दादा तुमच्या भावी कार्यास शुभेच्छा! जय हिंद.. जय महाराष्ट्र' असा उल्लेख करत त्यांच्याच समर्थकाने बॅनरच्या माध्यमातून सुजय विखेंना टोला लगावला. मात्र सुजय विखे यांच्या जुन्या भाषणाचा व्हिडिओ समोर आला असून त्यात 'आदिवासी समाजाला अर्थात अनुसूचित जमातीला शिर्डीसाठी आरक्षण जाहीर झाल्यास लोणी ते शिर्डी पायी चालत येणार' असल्याचं वक्तव्य विखेंनी केलं होता. त्यामुळे चूक लक्षात येताच विखे समर्थकाने रात्रीच हा बॅनर हटवला. सुजय विखे यांचा दोन महिन्यांपूर्वीच्या भाषणाचा व्हिडिओ. सुजय विखे काल सायंकाळी शिर्डीमध्ये एका कार्यक्रमाला येण्यापूर्वीच शिर्डीच्या वेशीवर ही बॅनरबाजी करण्यात आली होती. सुजय विखे यांनी भाषणादरम्यान त्या बॅनरचा उल्लेख करत शिर्डीतील स्थानिक राजकारणावर भाष्य केलंय. 'उपरवाले की लाठी में आवाज नहीं रहती.. बापूंची संधी हुकल्याचे मलाही वाईट वाटलं, मी त्यांना तिकीट देणार होतो पण आता काय करू शकतो?' अशा शब्दांत सुजय विखे यांनी समर्थकाच्या बॅनरबाजीवर मिश्किल भाष्य केलं.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSACHIN KASABE
FollowOct 07, 2025 06:17:130
Report
DPdnyaneshwar patange
FollowOct 07, 2025 06:04:310
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowOct 07, 2025 06:00:370
Report
DPdnyaneshwar patange
FollowOct 07, 2025 05:31:260
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowOct 07, 2025 05:21:100
Report
AKAMAR KANE
FollowOct 07, 2025 05:18:300
Report
AKAMAR KANE
FollowOct 07, 2025 05:18:240
Report
AKAMAR KANE
FollowOct 07, 2025 05:18:130
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 07, 2025 05:03:380
Report
UPUmesh Parab
FollowOct 07, 2025 04:47:410
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowOct 07, 2025 04:45:150
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowOct 07, 2025 04:33:480
Report
AKAMAR KANE
FollowOct 07, 2025 04:15:420
Report
AKAMAR KANE
FollowOct 07, 2025 04:05:500
Report