Back
पातूर तहसील परिसर में अज्ञात ड्रोन गिरा; बच्चों के विज्ञान प्रकल्प की वजह सामने आई
JJJAYESH JAGAD
Dec 04, 2025 11:38:31
Akola, Maharashtra
अकोला जिल्ह्यातील पातूर तहसील कार्यालय परिसरात आज एक अनोळखी ड्रोन कोसळल्याने काही काळ मोठी खळबळ उडाली. कार्यालयात कामानिमित्त आलेल्या नागरिकांनी अचानक आकाशातून खाली पडलेली वस्तू पाहताच परिसरात गर्दी केली. नेमका हा ड्रोन कुठून आला आणि कोणाचा आहे, याबाबत उपस्थितांमध्ये चर्चा सुरू झाली. ड्रोन कोसळल्याची माहिती मिळताच तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सावधगिरीचा उपाय म्हणून परिसराची पाहणी केली. काही क्षणांसाठी भीतीच्या वातावरणामुळे नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला. मात्र काही वेळाने ड्रोनविषयीचा गैरसमज दूर झाला. चौकशीअंती हा ड्रोन शाळकरी मुलांनी विज्ञान प्रकल्पासाठी तयार केलेला असल्याचे स्पष्ट झाले. ड्रोन खाली पडताच संबंधित मुलांनीच तेथून ते उचलून नेल्याची माहिती मिळाली. ड्रोन शालेय प्रकल्पाचा असल्याचे उघड होताच नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. काही वेळ निर्माण झालेला तणाव निवळल्यानंतर परिसरात पुन्हा एकदा नेहमीची स्थिती परतली.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JMJAVED MULANI
FollowDec 04, 2025 12:32:000
Report
JMJAVED MULANI
FollowDec 04, 2025 12:16:460
Report
JMJAVED MULANI
FollowDec 04, 2025 12:15:420
Report
JMJAVED MULANI
FollowDec 04, 2025 12:09:1357
Report
JMJAVED MULANI
FollowDec 04, 2025 12:08:24102
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 04, 2025 11:15:40115
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 04, 2025 11:15:19115
Report
SNSWATI NAIK
FollowDec 04, 2025 10:53:1539
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 04, 2025 10:46:2339
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 04, 2025 10:36:1699
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 04, 2025 10:18:53144
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 04, 2025 10:18:31167
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 04, 2025 10:12:17173
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowDec 04, 2025 10:08:2083
Report