Back
अकोला महापालिका में सत्ता संघर्ष तेज़, उबाठा-भाजप के बीच वार्ता पर विरोधी दावे
JJJAYESH JAGAD
Jan 21, 2026 13:23:45
Akola, Maharashtra
अकोला महापालिकेतील सत्ता स्थापनेवरून सध्या राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे.उबाठा गट आणि भाजप यांच्यात सत्ता स्थापनेसाठी चर्चा झाल्याची जोरदार चर्चा सुरू असताना, या चर्चांवरून आता परस्परविरोधी दावे समोर येत आहेत. उबाठा गटाकडून करण्यात आलेल्या प्रस्तावाला भाजपने अद्याप दुजोरा दिलेला नाही. अकोला महापालिका ची निवडणूक पार पडल्यानंतर आता सत्ता स्थापनेसाठी हालचालींना वेग आला आहे.याच पार्श्वभूमीवर उबाठा गटाला भाजपकडून फोन आल्याची चर्चा शहरात रंगली होती. या चर्चांना भाजपने काही अंशी दुजोरा दिला असला, तरी सत्ता स्थापनेसंदर्भात कोणताही ठोस निर्णय झालेला नसल्याचं स्पष्ट केलं आहे.उबाठा गटाने सत्ता स्थापनेसाठी भाजपसमोर काही नागरी सुविधांचे प्रस्ताव मांडले होते.मात्र या प्रस्तावांवर भाजपकडून अद्याप कोणतंही उत्तर मिळालं नसल्याचं उबाठा गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.प्रस्ताव मान्य झाल्यास भाजपसोबत जाण्याची तयारी असल्याचंही त्यांनी सांगितलं, त्याचप्रमाणे जो कोणी शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असेल त्याच्यासोबत आम्ही जाऊ असही ते म्हणाले. तर उबाठाचे सर्व नगरसेवक सोबत असून कोणीही भाजपच्या संपर्कात नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. नितीन देशमुख, आमदार, उबाठा. दरम्यान, उबाठा गटाच्या जिल्हा प्रमुखांसोबत चर्चा झाल्याचं भाजपचे अकोला महानगराध्यक्ष तथा नवनिर्वाचित नगरसेवक विजय अग्रवाल यांनी मान्य केलं आहे. मात्र या चर्चांमध्ये फक्त पदांबाबत चर्चा झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.नागरी सुविधांबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं सांगत, उबाठा गटाने उपमहापौर पदाची मागणी केल्याचं आणि ती मागणी भाजपने फेटाळल्याचंही विजय अग्रवाल यांनी सांगितलं. नागरी सुविधांचा मुद्दा हा विकासाचा असून, संबंधित कामे भाजपचे खासदार अनुप धोत्रे आणि आमदार रणधीर सावरकर यांच्या माध्यमातून आधीच सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. विजय अग्रवाल, महानगराध्यक्ष तथा नगरसेवक, भाजप. Final Vo : आता दोन्ही पक्षातर्फे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत मात्र सत्यता काय हे काहीच दिवसात स्पष्ट होणार आहे. जयेश जगड, झी मिडिया, अकोला
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSACHIN KASABE
FollowJan 21, 2026 15:16:190
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowJan 21, 2026 14:47:170
Report
PNPratap Naik1
FollowJan 21, 2026 14:05:350
Report
DPdnyaneshwar patange
FollowJan 21, 2026 13:22:200
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowJan 21, 2026 13:21:160
Report
PNPratap Naik1
FollowJan 21, 2026 12:50:550
Report
ABATISH BHOIR
FollowJan 21, 2026 12:49:230
Report
DPdnyaneshwar patange
FollowJan 21, 2026 12:36:340
Report
SKSACHIN KASABE
FollowJan 21, 2026 12:00:580
Report
SMSarfaraj Musa
FollowJan 21, 2026 11:39:270
Report
SNSWATI NAIK
FollowJan 21, 2026 11:21:180
Report
VKVISHAL KAROLE
FollowJan 21, 2026 11:21:010
Report
JMJAVED MULANI
FollowJan 21, 2026 11:01:310
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowJan 21, 2026 10:51:480
Report