Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Akola444001

अकोला के पटूर रोड के खेत में रात के समय आग लगने से भारी नुकसान नहीं, किसी की जान नहीं गई

JJJAYESH JAGAD
Mar 20, 2026 03:48:58
Akola, Maharashtra
अकोला शहरातील पटूर रोड परिसरात एका शेतातील वाळलेल्या गवताला रात्री आग लागल्याची घटना घडली आहे. रात्री अवकाळी पावसासोबत जोरदार वारे वाहत असल्यामुळे ही आग काही वेळातच मोठ्या प्रमाणात पसरली होती. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाला कळविण्यात आले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मोठ्या प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आणली.दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VNVishal Nagesh More
Mar 20, 2026 05:03:20
Malegaon, Maharashtra:विशाल मोरे, मनमाड (नाशिक) - एके शाळेच्या विद्यार्थ्याला टोळक्याने जबर मारहाणी केली. मारहाणीमध्ये विद्यार्थी गंभीर जखमी. मनमाडच्या HK हायस्कूल परिसरातील घटना. मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल. ANC :-एका शालेय विद्यार्थ्याला टोळक्याने जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना मनमाडच्या HK हायस्कुल परिसरात घडली असून आदिब मिर्जा असे या विद्यार्थ्यांचे नाव आहे. मारहाणीत तो गंभीर जखमी झाला असून त्याला नाशिकच्या खाजगी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली. मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या विद्यार्थ्यांचं शाळेतील एका विद्यार्थ्यां सोबत भांडण झाले होते. त्याने हा प्रकार त्याच्या पालकांना सांगितल्या नंतर त्याचे नातेवाईक शाळेत आले आणि त्यांनी मिर्जाला बेदम मारहाण केल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे..
0
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 20, 2026 05:00:31
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Mar 20, 2026 04:36:54
Satara, Maharashtra:सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडी आज पार पडत आहेत. यामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील या दिग्गज नेत्यांचे प्रतिष्ठा इथं पणाला लागली आहे. भाजप जरी सातारा जिल्ह्यात मोठा पक्ष असला तरी भाजपला मॅजिक फिगर गाठता न आल्यामुळे भाजपनं ऑपरेशन लोटस राबवल्याचं बोललं जात आहे. त्याच पद्धतीने भाजपला 33 जागांची मॅजिक फिगर गाठता आली नाही त्यामुळे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी मंत्री शंभूराजे देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांनी जोरदार तयारी सुरू केली होती त्यामुळेच थोड्याच वेळामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडीची प्रक्रिया आता पार पडेल आणि त्यानंतर भाजप या सातारच्या जिल्हा परिषदेवर आपला झेंडा लावतो का याकडे सर्वांचे आता लक्ष लागून राहिला आहे.सातारा जिल्हा परिषदेतून तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी
970
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 20, 2026 04:16:38
Shirdi, Maharashtra:अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हार गावात देवांचे सोंग नाचवण्याची अनोखी परंपरा अनेक दशकांपासून जपली जातेय.. बिरोबा देवाच्या यात्रेच्या निमित्ताने गुढीपाडव्याच्या दिवशी भरणारी हि यात्रा सर्वांसाठी आकर्षण असते.. गुढीपाडव्यापासून महाराष्ट्रातील ग्रामीण भागात यात्रा जत्रांचा माहोल असतो.. अनेक गावात अनोख्या परंपरा आजही जोपासल्या जात आहेत.. राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द गावात अनेक दशकांपासून देवांचे सोंग नाचवण्याची परंपरा आजही मोठ्या उत्साहाने जोपासली जात आहे.. सुत्रधार, विदूषक, गणपती सरस्वती यांच्या सोंगाने या आखाडीला सुरूवात होते आणी रात्रभर विष्णूचे दशावतार आणी विविध सोंग नाचत येतात.. हि कला बघण्यासाठी जिल्ह्यासह राज्यभरातून नागरिक आवर्जून हजेरी लावतात.
1023
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Mar 20, 2026 04:16:11
Amravati, Maharashtra:वीज थकबाकीदारांना स्मार्ट मीटरची शिक्षा; वसुलीसाठी महावितरण आक्रमक, जुने मीटर काढायला सुरुवात अँकर :- वीज बिल थकवणाऱ्या ग्राहकांवर महावितरण ने कडक भूमिका घेत वसुली मोहिमेला गती दिली आहे. थकबाकी वाढत असल्याने अशा ग्राहकांचे थेट वीज मीटर काढण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. महावितरणकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती परिमंडळातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक मिळून लाखो ग्राहकांकडे कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे थकबाकी वसुलीसाठी आता आक्रमक पावले उचलली जात आहेत. कारवाई अंतर्गत थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करून मीटर काढले जात असून, पूर्ण थकबाकी आणि पुनर्जोडणी शुल्क भरल्याशिवाय पुन्हा वीजपुरवठा सुरू केला जाणार नाही. याशिवाय संबंधित ठिकाणी स्मार्ट मीटर बसवण्याचे निर्देशही देण्यात आले आहे. ज्यामुळे पुढील थकबाकी टाळण्याचा प्रयत्न आहे. दरम्यान, काही ठिकाणी अनधिकृत वीज वापराचे प्रकारही समोर आले असून अशा प्रकरणांवर कडक कारवाईचा इशारा देत, वीज चोरी करणाऱ्यांवर कायदेशीर गुन्हे दाखल करण्याची तयारी महावितरणने दर्शवली आहे.
1072
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 20, 2026 04:05:22
927
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 20, 2026 03:50:08
Nagpur, Maharashtra:नागपूर - शिक्षकांना उन्हाळी सुट्टीत जनगणनेचे कामे, त्यामुळे सुट्टीत कामे केल्याच्या बदल्यात विशेष सुट्टीची मागणी - १६ मे ते १५ जूनदरम्यान शिक्षकांना जनगणनेच्या कामासाठी हजर राहण्याचे आदेश - डिजिटल जनगणनेसाठी शिक्षकांचे प्रशिक्षणही होणार - सुट्टीत मुख्यालय सोडता येणार नाही, शिक्षण अधिकाऱ्यांचे निर्देश - ३० एप्रिलला शैक्षणिक सत्र समाप्त, २ मेपासून सुट्ट्या सुरू, २६ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात - उन्हाळी सुट्टीतही शिक्षकांना कामावर हजर राहावे लागणार, निवडणुकांनंतर पुन्हा शासकीय कामात शिक्षक गुंतणार - सुट्टीतील कामाच्या बदल्यात विशेष रजेची शिक्षकांची मागणी, बाहेरगावी जाण्याचे नियोजन बिघडल्याने शिक्षकांमध्ये नाराजी - जनगणना कामासाठी शिक्षकांना सज्ज राहण्याचे आदेश
972
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 20, 2026 03:49:51
1071
comment0
Report
Advertisement
Back to top