Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune410502

नारायणगांव तमाशा बुकिंग से 7 करोड़ की उलाढाल, तमाशा उद्योग में फिर से मजबूती

HCHEMANT CHAPUDE
Mar 20, 2026 04:45:23
Junnar, Pune, Maharashtra
नरायणगाव हे तमाशाची पंढरी म्हणून राज्यात ओळखले जाते. गुढीपाडव्याच्या निमित्ताने इथे राज्यभरातून गावकरी आपल्या गावच्या यात्रेकरीता तमाशा ठरविण्यासाठी येत असतात. गेल्या अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आहे.. किमान १८९० पासून ही परंपरा असल्याचे तमाशा मधील जाणकार सांगतात. आज या तमाशा पंढरीत जवळ 7 करोडपर्यंत ह्या तमाशा बुकिंगच्या माध्यमातून उलाढाल झाली आहे... त्यामुळे ह्या तमाशा व्यवसायाला पुन्हा एकदा बळकटी येईल अशी आशा या तमाशा फड मालकांना वाटत आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
JMJAVED MULANI
Mar 20, 2026 06:09:36
Rui, Maharashtra:उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडवर..... अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे दिले आदेश ! गेल्या दोन दिवसात महाराष्ट्रात विविध ठिकाणी अवकाळी पावसाने मोठ थैमान घातल आहे यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी तातडीने प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधत अवकाळी ने नुकसान झालेल्या शेती पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेत. विविध ठिकाणी कमी अधिक प्रमाणात या अवकाळी पावसामुळे शेती पिकाच नुकसान झालेल आहे. तातडीने प्रशासनाने याचे पंचनामे karावेत अशा सूचना सुनेत्रा पवारांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 20, 2026 06:08:03
Niphad, Maharashtra:आज जागतिक चिमणी दिवस... मात्र माणसासाठी होत असलेला विकास पशुपक्ष्यांचे जीवन भकास करत चालला असून बेसुमार होत चाललेली वृक्षतोड ,ग्लोबल वार्मिंगमुळे तापमानात झालेली मोठी वाढ याचा सर्वात जास्त फटका इतर पशु पक्षां सोबत चिमण्याना मोठ्या प्रमाणात बसून पाण्याविना तडफडून मारण्याची वेळ त्यांच्यावर आली असल्याचे पाहून आपल्या लाडक्या चिऊताईला वाचविण्यासाठी निफाडच्या वैनतेय प्राथमिक विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थी पुढे सरसावले आणि त्यांनी टाकाऊ वस्तूं पासून तयार केले दाना पाणी साठी आगळे वेगळे फिडर व्हिओ :-प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या कापून त्यांना झाडावर बांधण्याची तयारी करणारे हे आहेत शालेय विद्यार्थी, विद्यार्थीनीं म चिमण्या मानवी वस्तीत वास्तव्याला असतात.मात्र त्यांच्यासाठी आता घरटे उरले नाही आणि त्यांना पाणी देखील मिळत नाही त्यामुळे त्यांच्या जीवावर बेतते पाण्याविना चिऊताईचा मृत्यू होऊ नये यासाठी ही चिमुकले धडपड करीत आहे बाईट :-विद्यार्थीनीं बाईट :-विद्यार्थी व्हिओ ::-चिमण्यांची संख्या घटत चालली असल्यामुळे ‘या चिमण्यांनो,परत फिरा रे..’ अशी साद घालायची वेळ आपल्यावर येऊन ठेपली असून त्यांच्यासाठी पोषक वातावरण निर्माण केले, तर त्यांची घटलेली संख्या नक्की वाढेल असे म्हटले तर वावगे ठरणार नाही सुदर्शन खिल्लारे, निफाड
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 20, 2026 06:07:02
Shirur, Maharashtra:खासदार अमोल कोल्हे यांची कवितेतून फटकेबाजी; रुपाली चाकणकर प्रकरणावर अप्रत्यक्ष निशाणा अमोल कोल्हेंनी थेट टीका न करता आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून एक कविता पोस्ट करत सत्ताधाऱ्यांवर आणि संबंधित घडामोडींवर अप्रत्यक्ष निशाणा साधलाय या कवितेतून त्यांनी सध्याच्या परिस्थितीवर उपरोधिक भाष्य करत प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, त्यांच्या या कवितेतून फटकेबाजीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे, कोणाचेही नाव न घेता केलेली ही टीका अधिकच बोलकी ठरत असून, सोशल मीडियावरही यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.दरम्यान, रुपाली चाकणकर यांच्यावरील आरोपांमुळे आधीच राजकीय वातावरण तापले असताना, अमोल कोल्हे यांच्या या काव्यात्मक प्रतिक्रियेमुळे या प्रकरणाला आणखी एक नवा वळण मिळाल्याचे पाहायला मिळत आहे अमोल कोल्हे - कविता प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया जुन्नर पुणे...
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 20, 2026 06:06:39
Chandrapur, Maharashtra:टायटल:--चंद्रपुरात जागतिक चिमणी दिवसाच्या निमित्ताने सार्ड संस्था तर्फे पक्षी घरटे निर्मिती कार्यशाळेचे आयोजन, चिमणी वाचवा चळवळीला बळकटी देण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना केले प्रेरित अँकर:--- वाढते शहरेकरण, मोबाईल टॉवर्सचे रेडियेशन, कीटकनक्षकांचा अति वापर आणि सिमेंटची घरे यामुळे चिमण्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे. परिसंस्थेचा समतोल साधण्यासाठी आणि जैवविविधता टीकविण्यासाठी या छोटया पक्षांचे संरक्षण करणे आवशक आहे. चंद्रपूरच्या सार्ड संस्था तर्फे जागतिक चिमणी दिवस च्या निमित्ताने या चिमण्याचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने पक्षी घरटे तयार करण्याच्या कार्यशाळेचे आयोजन डॉ. पंजाबराव हायस्कुल चंद्रपूर येथे करण्यात आले. या कार्यशाळेत टाकाऊ खरड्यांच्या पाईपचा वापर करून पक्षांची घरटी तयार करण्यात आली. नागरिकांनी आपल्या घरी, गॅलरीत,बागेत घरटी लावून अन्न आणि पाण्याची व्यवस्था करावी जेणेकरून चिमण्या संख्या वाढविण्यास मदत होईल असे आवाहन सार्ड संस्थेतर्फे करण्यात आले. संस्थेच्या वतीने चंद्रपूर मनपाच्या नवनिर्वाचित स्थायी समिती अध्यक्ष मनस्वी गि-हे यांच्या निवासस्थानी घरटे लावून उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. बाईट १) मनस्वी गि-हे , अध्यक्ष, स्थायी समिती, मनपा बाईट २) भाविक येरगुडे, अध्यक्ष, सार्ड संस्था आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
comment0
Report
GMGajanan MAchindar
Mar 20, 2026 05:45:54
919
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 20, 2026 05:36:41
899
comment0
Report
VNVishal Nagesh More
Mar 20, 2026 05:03:20
Malegaon, Maharashtra:विशाल मोरे, मनमाड (नाशिक) - एके शाळेच्या विद्यार्थ्याला टोळक्याने जबर मारहाणी केली. मारहाणीमध्ये विद्यार्थी गंभीर जखमी. मनमाडच्या HK हायस्कूल परिसरातील घटना. मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल. ANC :-एका शालेय विद्यार्थ्याला टोळक्याने जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना मनमाडच्या HK हायस्कुल परिसरात घडली असून आदिब मिर्जा असे या विद्यार्थ्यांचे नाव आहे. मारहाणीत तो गंभीर जखमी झाला असून त्याला नाशिकच्या खाजगी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली. मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या विद्यार्थ्यांचं शाळेतील एका विद्यार्थ्यां सोबत भांडण झाले होते. त्याने हा प्रकार त्याच्या पालकांना सांगितल्या नंतर त्याचे नातेवाईक शाळेत आले आणि त्यांनी मिर्जाला बेदम मारहाण केल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे..
994
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 20, 2026 05:00:31
998
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Mar 20, 2026 04:36:54
Satara, Maharashtra:सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडी आज पार पडत आहेत. यामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील या दिग्गज नेत्यांचे प्रतिष्ठा इथं पणाला लागली आहे. भाजप जरी सातारा जिल्ह्यात मोठा पक्ष असला तरी भाजपला मॅजिक फिगर गाठता न आल्यामुळे भाजपनं ऑपरेशन लोटस राबवल्याचं बोललं जात आहे. त्याच पद्धतीने भाजपला 33 जागांची मॅजिक फिगर गाठता आली नाही त्यामुळे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी मंत्री शंभूराजे देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांनी जोरदार तयारी सुरू केली होती त्यामुळेच थोड्याच वेळामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडीची प्रक्रिया आता पार पडेल आणि त्यानंतर भाजप या सातारच्या जिल्हा परिषदेवर आपला झेंडा लावतो का याकडे सर्वांचे आता लक्ष लागून राहिला आहे.सातारा जिल्हा परिषदेतून तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी
1100
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 20, 2026 04:16:38
Shirdi, Maharashtra:अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हार गावात देवांचे सोंग नाचवण्याची अनोखी परंपरा अनेक दशकांपासून जपली जातेय.. बिरोबा देवाच्या यात्रेच्या निमित्ताने गुढीपाडव्याच्या दिवशी भरणारी हि यात्रा सर्वांसाठी आकर्षण असते.. गुढीपाडव्यापासून महाराष्ट्रातील ग्रामीण भागात यात्रा जत्रांचा माहोल असतो.. अनेक गावात अनोख्या परंपरा आजही जोपासल्या जात आहेत.. राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द गावात अनेक दशकांपासून देवांचे सोंग नाचवण्याची परंपरा आजही मोठ्या उत्साहाने जोपासली जात आहे.. सुत्रधार, विदूषक, गणपती सरस्वती यांच्या सोंगाने या आखाडीला सुरूवात होते आणी रात्रभर विष्णूचे दशावतार आणी विविध सोंग नाचत येतात.. हि कला बघण्यासाठी जिल्ह्यासह राज्यभरातून नागरिक आवर्जून हजेरी लावतात.
1029
comment0
Report
Advertisement
Back to top