Back
अकोट नगर परिषद अध्यक्ष चुनाव: महिला उम्मीदवारों की भिड़ंत, घराणापरंपरा बनाम विकास
JJJAYESH JAGAD
Nov 22, 2025 06:51:02
Akola, Maharashtra
अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपरिषदेच्या अध्यक्षपदासाठी यंदा महिला आरक्षण जाहीर झाल्याने राजकीय वारसा लाभलेल्या आठ महिला उमेदवारांमध्ये जोरदार लढत पाहायला मिळत आहे.दोन कॅबिनेट मंत्र्यांचा राजकीय वारसा असलेल्या अकोट शहरात नेहमीच राजकारणाला विशेष महत्त्व आहे त्यामुळे नगराध्यक्षपदाची ही निवडणूक सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे.अकोट नगर परिषद अध्यक्षिता کان्ग्रेसकडून अलका बोडखे यांना उमेदवारी देण्यात आली अलका बोडखे या माजी मंत्री रामदास बोडखे यांच्या सून असून, त्यांचे पती संजय बोडखे हे माजी नगराध्यक्ष आहेत. शहरातील प्राथमिक गरजा, आरोग्य सुविधा आणि नगरपालिका शाळांचा दर्जा सुधारण्यावर त्यांनी भर दिला आहे. अलका बोडखे, काँग्रेस उमेदवार. मागील विधानसभेत भाजपविरोधात काम केल्याच्या आरोपांनंतर स्वाती चिखले यांचे पती मंगेश चिखले यांच्यावर कारवाई झाली आणि त्यांनी भाजप मधून वंचित बहुजन आघाडीत प्रवेश घेतला. मंगेश चिखले हे भाजपचे माजी नगरसेवक आहेत.महिला आरक्षण लागू झाल्यानंतर स्वाती चिखले आता मैदानात आहेत. शहराच्या विकासासाठी साडेचार हजार कोटी येऊनही ‘विकास कुठे दिसत नाही’ असा सवाल करत त्यांनी भाजपवर भ्रष्टाचार आणि अपयशाचा आरोप केला. महिलांचे शौचालय, रोजगार, शेतकरी प्रश्न सोडवण्यात भाजप अपयशी ठरल्याचंही त्यांनी सांगितलं.माया धुळे, भाजप उमेदवार. भाजपने त्यांच्या माजी नगरसेविका माया धुळे यांच्यावर विश्वास ठेवत नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. त्यांच्यापुढे महायुतीतील दोन्ही मित्र पक्षांचे सुद्धा आव्हान आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( अ.प ) गाजिया बानो मो. बद्रुजन्मा आणि भाजप सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेल्या चंचल पितांबरवाले या देखील भाजपपुढील महत्त्वाचं आव्हान ठरत आहेत.शहराचा सर्वांगीण विकास झाल्याचा दावा करीत त्यांनी विरोधकांच्या सर्व आरोपांना प्रतिवाद केला आहे.
118
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowNov 22, 2025 07:37:080
Report
APAMOL PEDNEKAR
FollowNov 22, 2025 07:32:290
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 22, 2025 07:32:160
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 22, 2025 07:18:3018
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 22, 2025 07:04:45108
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 22, 2025 07:04:3342
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 22, 2025 06:16:12127
Report
AKAMAR KANE
FollowNov 22, 2025 06:07:15166
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 22, 2025 06:06:03154
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 22, 2025 06:05:5090
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 22, 2025 05:52:09125
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 22, 2025 05:45:53123
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 22, 2025 05:45:20186
Report
AKAMAR KANE
FollowNov 22, 2025 05:20:10149
Report