Back
औसा सभा दौरान छावा का हंगामा, अजित पवार की रैली विवाद घेरे में
VBVAIBHAV BALKUNDE
Nov 22, 2025 05:45:53
Latur, Maharashtra
लातूर ब्रेकिंग न्यूज....
अजित पवारांची औसा येथील सभा छावा संघटना उधळून लावणार... छावा संघटनेचा इशारा.... औसा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांची औसा शहरात जाहीर सभा....
औसा नगरपालिकेच्या निवडणुकीचा जोर चांगलाच वाढला असतानाच आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची औसा शहरात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून परवीण शेख यांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र, या सभेवर मोठं वादळ घोंगावत आहे. छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे यांनी सभा उधळून लावण्याचा इशारा दिला आहे . आजची सभा उधळून लावण्यात येईल आणि सभेत घुसून अजित पवारांना थेट जाब विचारला जाईल असं छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे सांगीतलं आहे....
चार महिन्यांपूर्वी छावा संघटनेच्या विजयकुमार घाडगे आणि कार्यकर्त्यांवर हल्ला झाला होता. हा हल्ला राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह केला होता. त्यानंतर सूरज चव्हाण यांचं निलंबनानंतरही पक्षाने केलं पण काही दिवसानंतर त्यांना बढती देण्यात आली. शेतकऱ्यांच्या मुलांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीस पुन्हा संधी का? याच प्रश्नासाठी सभा उधळून लावणार असल्याचे घाडगे यांनी सांगीतलं आहे. या पार्श्वभूमीवर सभेला तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. औसातील महायुतीचे राजकारण आता थेट आमनेसामने येत असून निवडणुकीची तापलेली हवा आणखी तीव्र होताना दिसत आहे. आजची सभा शांततेत पार पडणार का? की छावा संघटना खरोखरच सभा उधळणार? या कडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
विजयकुमार घाडगे ( छावा संघटना )
98
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 22, 2025 06:16:122
Report
AKAMAR KANE
FollowNov 22, 2025 06:07:1518
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 22, 2025 06:06:0328
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 22, 2025 06:05:5027
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 22, 2025 05:52:0958
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 22, 2025 05:45:2063
Report
AKAMAR KANE
FollowNov 22, 2025 05:20:10140
Report
KPKAILAS PURI
FollowNov 22, 2025 05:17:16210
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 22, 2025 05:16:5772
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 22, 2025 04:49:2399
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 22, 2025 04:48:40112
Report
MKManoj Kulkarni
FollowNov 22, 2025 04:34:4898
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 22, 2025 04:18:4686
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 22, 2025 04:04:38150
Report